घरफिचर्सभारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…

Subscribe
एकीकडे चीन-पाकिस्तान मिळून भारतावर आक्रमण करण्याची योजना आखत आहेत, लडाक येथे चीनने एकेक करत आता अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत, देशावर बाह्य संकट घोंघावत असतानाच जागतिक महामारी कोरोनाचा कहर देशात काही कमी होताना दिसत नाही. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी देशात कोरोनाच्या बळींची संख्या ५० हजाराच्या घरात होती, अशा प्रकारे देशांतर्गत संकटही वाढत आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मोदींसाठी पुढील कालखंड सोपा नाही, जागतिक स्तरावर जे संघर्षमय वातावरण निर्माण झाले आहे, त्यात भारत आधीचा ओढला गेला असून अनायसे तो केंद्रस्थानी आला आहे, चीनने भारताविरोधात उघडलेली आघाडी या त्याचाच प्रत्येय असून अमेरिकेनेही भारताच्या मदतीसाठी अण्वस्त्रवाहू विमाने पाठवली आहेत, हे भविष्यातील मोठ्या संभाव्य कलहाचे संकेत आहेत, त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना बाह्य आणि देशांतर्गत या दोन्ही संकटाना सामोरे जाण्यासाठी देशाला सक्षम बनवावे लागणार आहे. 

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना शक्य तितका देशवासियांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोग्यावर सर्वाधिक भर देत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या योजनेची घोषणा केली. देशात कोरोनावरील लसीवर सुरु असलेल्या संशोधनाची माहिती देत नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. श्रीराम मंदिर विवाद सुरु झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून श्रीराम मंदिराचा उल्लेख कुणी केला नाही. कारण या ठिकाणावरून श्रीराम मंदिराविषयी बोलणे येथे जातीयवादी ठरवले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी यांच्या कालखंडात श्रीराम मंदिराचा विषय सर्वमान्य बनला, त्यामुळेच मोदी यांना हे शक्य झाले. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून शेजारील देशांना अनोखे आवाहन केले, ज्याचा कुणाला अंदाज नव्हता, ते म्हणाले आपल्या देशाची भूमी शेजारील देशांना जोडली म्हणून आपण शेजारी होत नाहीत तर त्यांच्याशी आपली मने जुळलेली असतात. तेंव्हा दहशतवाद आणि विस्तारवाद याच्याशी एकत्र होऊन लढुया, अशा शब्दांत त्यांनी शेजारील देशांना आवाहन केले. त्याचवेळी एलओसी आणि एलएसीशी हे दोन शब्द एकत्र बोलून पंतप्रधानांनी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना कडक संदेश दिला. भारत ७४व्या स्वातंत्र्यदिनी विस्तारवादी देशांसमोर एक आव्हान बनला आहे, लडाकमध्ये भारतीय सैन्यांनी ते दाखवून दिले आहे. अशा प्रकारे भारत त्यांना पूर्ण निर्धाराने उत्तरे देत आहे, असे पंतप्रधानांनी ठणकावले. अशा प्रकारे पंतप्रधानांनी या माध्यमातून एकीकडे बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांना चीनपासून सावध राहण्याचे संकेत दिले, तसेच चीन-पाकिस्तानला दम  भरला.

पंतप्रधानांनी भाषणात स्वावलंबी भारत अर्थात मेक इन इंडियासह मेक फॉर वर्ल्ड हे स्वप्न भारतीयांसमोर ठेवले. तसेच राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू करण्याची घोषणा केली. त्यायोगे पंतप्रधानांनी ग्रामीण भारताला आधुनिक भारताशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले. त्यामाध्यमातून येत्या एक वर्षात देशातील सर्व ६ लाख गावांना हाय स्पीड इंटरनेट देण्यात येणार आहे. प्रथमच पंतप्रधानांनी आरोग्याच्या बाबतीत नवीन क्रांती घडवून आणण्याची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या योजनेची घोषणा केली. या योजनेची चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड मिळेल. ज्याद्वारे नागरिकांना रुग्णालयात स्लिप मिळवण्यासाठी लांबच लांब रांगेपासून मुक्तता मिळेल. तसेच डॉक्टरांचे शुल्क व उपचाराचा खर्चही या कार्डाद्वारे भरता येईल. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात वैयक्तिक आरोग्याची नोंद असेल. यात नागरिकांचे वय, रक्तगट, ऍलर्जी आणि शस्त्रक्रिया यासारखी माहिती असेल. तसेच, संबंधित नागरिकाला असलेला रोग कधी झाला? त्यावर कोणते उपचार दिले गेले आणि कोणत्या डॉक्टर किंवा रुग्णालयात त्याचे उपचार झाले. अशी सर्व माहिती नोंदविली जाईल. ज्यामुळे डॉक्टरांना आरोग्याचा इतिहास जाणून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे सोपे होईल. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील डॉक्टर जे पीजी झालेले असतील, ते स्वत:ची नावे नोंदवू शकतील. त्यानंतर ते रुग्णांना ऑनलाइन सल्ला देवू शकतील. चौथे वैशिष्ट्य आरोग्य सुविधा नोंदणीकृत असेल. यामध्ये हॉस्पिटल, क्लिनिक लॅब आणि आरोग्य सेवांशी संबंधित इतर सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध असतील. यासाठी सरकार अ‍ॅप तयार करत आहे. तथापि, अद्याप या अ‍ॅपच्या नावाचा निर्णय झालेला नाही. आता प्रश्न असा आहे की देशातील सर्व नागरिकांचे डिजिटल रेकॉर्ड कसे तयार केले जाईल? या योजनेंतर्गत रुग्णालये, दवाखाने व डॉक्टर मध्यवर्ती सर्व्हरला जोडले जातील. लोकांचा वैद्यकीय डेटा देखील समान सर्व्हरवर उपस्थित असेल. आपल्याला आपल्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर मिळेल. डिजिटल हेल्थ कार्ड बनवताना तुम्हाला एकच अनोखा आयडी मिळेल. ज्याद्वारे आपण आपले रेकॉर्ड स्वतः अद्ययावत करू शकाल. जेव्हा आपण डॉक्टर किंवा दवाखान्यात जाल, तेव्हा आपल्याला आधीच्या उपचारांशी संबंधित प्रिस्क्रिप्शन आणि रिपोर्ट्स सोबत घेऊन जावे लागणार नाही.

- Advertisement -

आपल्याला फक्त आपला अनोखा आयडी डॉक्टरांना सांगावा लागेल, त्याद्वारे डॉक्टर तुमच्या सर्व वैद्यकीय नोंदी कुठूनही पाहू शकतील. ही योजना देशातील नागरिक आणि रुग्णालयांना ऐच्छिक असेल. म्हणजेच या योजनेत सामील व्हावे की नाही याविषयी ते स्वत: निर्णय घेतील. दुर्गम भागातील खेड्यात राहणार्या लोकांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होईल. जे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात न जाता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवू शकतील. संपूर्ण देशाची डिजिटल आरोग्य व्यवस्था निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. हि योजना भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणणार असल्याचा विश्वास पंतप्रधांना वाटत आहे.

सध्या देशात कोरोनावर तीन लसी वेगवेगळ्या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत. पहिल्या लसीचे नाव आहे को-व्हॅक्सिन (को-व्हॅक्सीन), हि लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी तयार केली आहे. या लसीची पहिली चाचणी देशातील १२ केंद्रांवर पूर्ण झाली असून दुसर्‍या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहेत. दुसर्‍या लसीचे नाव आहे झिककोव्ह-डी (झायकोव्ह-डी), ड्रग फार्मा कंपनी ऑफ इंडिया (झाइडस कॅडिला) यांनी ६ ऑगस्टपासून या लसीच्या दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. तर तिसर्‍या लसीचे नाव आहे कोवी-शील्ड (कोवी-शील्ड), ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर तयार करण्यात आलेल्या या लसीवर पुणे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे कार्यरत आहे. या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस ही लस उपलब्ध होऊ शकते. वैज्ञानिकांद्वारे या तीनपैकी कोणत्याही लसीला मंजुरी मिळाली तर त्या लसीचे तात्काळ उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. म्हणजेच ही लस सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचीही संपूर्ण योजना सरकारने आधीच तयार केली आहे.

- Advertisement -

यंदाच्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचा प्रभाव दिसला. मागील वर्षी लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमास सुमारे १० हजाराहून अधिक लोक उपस्थित होते आणि आजूबाजूचा संपूर्ण भाग तिरंगाने रंगला होता. परंतु यावेळी मर्यादित संख्येने लोक या कार्यक्रमात सहभागी होते. पंतप्रधान मोदी दर वर्षी भाषण संपल्यानंतर प्रोटोकॉल तोडून तिथे उपस्थित मुलांना भेटत असत. पण या वेळेस तसे झाले नाही. यावेळी कोरोना संक्रमणाच्या जोखमीमुळे मुलांना बोलावन्यात आले नाही. त्यांच्या जागी ५०० एनसीसी कॅडेट बोलावले होते. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत या कार्यक्रमास येणार्‍या पाहुण्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली होती. मागील वर्षी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची संख्या २० टक्के होती. परंतु यावेळी सुमारे १५०० कोरोना वॉरियर्सना आमंत्रित करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी लोकांना उभे राहण्याची जागाही मिळाली नाही, यावेळी लोक सामाजिक अंतराचा नियम अनुसरण  उभे होते. सुरक्षा दलांनाही विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. मर्यादित संख्येने जवानांनीही सोशल डिस्टेंसिंगचे अनुसरण केले.  मागील वर्षी याच ठिकाणी २० हजाराहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले होते.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -