घरदेश-विदेश'मायकल' आज भी जिंदा है!

‘मायकल’ आज भी जिंदा है!

Subscribe

मायकल जॅक्सन जाऊन अनेक वर्षे लोटली आहेत. आजही अनेक तरूणांसाठी तो गळ्यातला ताईत आहे. म्हणूनच 'मायकल अभी भी लोगोंके दिलो मे जिंदा है' असेच म्हणावे लागेल.

इंग्लिश पॉप साँग हे हल्लीच्या मुलांचे कल्चर आहे. पण कितीही नवे पॉप सिंगर आले तरी ‘मायकल जॅक्सन’चे नाव या क्षेत्रात अजरामर आहे. मायकलला जाऊन आज ९ वर्षे झाली. आजही त्याची गाणी, त्याचा मून वॉक, त्याची अदाकारी तरुणांना भुरळ पाडते. विशेष म्हणजे मायकल जॅक्सन जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्याला ओळखत नाही, असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. म्हणूनच ‘मायकल अभी भी लोगोंके दिलो मे जिंदा है’ असेच म्हणावे लागेल.

या गाण्याने लावले वेड

मायकल स्टेज परफॉर्म करायला आला की, अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकायचा. ‘थ्रिलर’ या गाण्याने त्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आजही हे गाणे लागले तर आपोआप पाय थिरकतात. त्यानंतर त्याची आलेली प्रत्येक गाणी तुफान गाजली. ‘डेंजरस’, ‘बीट इट’, ‘स्मुथ क्रिमिनल’, ‘दे डोंट केअर अवाऊट अस’, ‘अर्थ साँग’ ही गाणी आजही ऐकली जातात. त्याची गाणी आजच्या काळाची वाटतात. म्हणूनच की, ती आजही आपलीशी वाटतात.

- Advertisement -

- Advertisement -

(सौ. युट्युब) 

मूनवॉक म्हणजे मायकल?

मायकलच्या डान्स मुव्हज या एकमेवाद्वितीय होत्या. मूनवॉक म्हटला की, आपल्याला फक्त मायकल जॅक्सन आठवतो. त्याच्या प्रत्येक डान्स मुव्हज या फक्त त्याच्याच होत्या. ४५ अंशात झुकण्याची स्टाईल त्याने त्याच्या डान्समधून कित्येकवेळा दाखवली होती. असे अनेक प्रयोग स्टेज परफॉर्मन्स करताना करणारा मायकल हा एकमेव पॉप सिंगर होता.

(क्वालालंपूरमध्ये झालेल्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये मूनवॉक आणि सिग्नेचर स्टेप्स करताना मायकल. सौजन्य- मुनवॉकर टीव्ही) )

स्टाईलही होती हटके

काळा किंवा पांढरा कोट आणि पँट, डोक्यावर काळी टोपी हा मायकलचा पेहराव खूप गाजला. गोल टोपीतून डोकावणारे त्याचे कुरळे केस, अशी त्याची स्टाईल स्टेटमेंटच झाली होती. स्टेज परफॉर्मन्ससाठी तो जे कपडे घालायचा ते लोकांच्या आकर्षणाचा भाग झाले होते. त्याने वापरलेले डिझायनर सिक्वेन्स कपडे अजूनही राखून ठेवण्यात आले आहे.

designer wear of Michael jackson
मायकल जॅक्सनने घातलेले सिक्वेन्स जॅकेटस आजही अमेरिकेतील संग्रहालयात ठेवण्यात आले होते. (सौ. पिनट्रेस्ट)

मायकलचा भारत दौरा

संपूर्ण जगाला वेड लावणारा मायकल ३० ऑक्टोबर १९९६ साली भारतात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आमंत्रण स्विकारुनच मायकल मुंबईत आला होता.  मुंबईत त्याचे स्वागत अगदी परंपरेनुसार करण्यात आले. मुंबईतल्या अंधेरी स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये त्याचा लाईव्ह इव्हेंट झाला होता. त्यासाठी तब्बल २० गाड्या भरून सामान आले होते. त्याच्या या दौऱ्यात त्याने भारतीय जेवणाचा आनंदही लुटला. मसाला डोसा, आलू पराठा, चिकन तंदुरी, मसालेदार भाज्या अशा पदार्थांचा त्याने आनंद लुटला.

Micheal meet Thackeray family
मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंसोबत मायकल जॅक्सन ( सौजन्य- मिड डे)


(सौजन्य- युट्युब)

मायकलने केल्या इतक्या सर्जरी

हल्ली प्लास्टिक सर्जरी हे एक फॅड झाले आहे. पण स्वत:चा संपूर्ण चेहरा अशा पद्धतीने बदलणारा मायकल जॅक्सन हा पहिलाच असेल. त्याने कपाळ, नाक, गाल, ओठ, हनुवटी सगळे काही बदलले होते. नाकावर त्याने तब्बल ९ सर्जरी केल्या होत्या. शिवाय त्याने स्वत:चा रंगही बदलला. यामुळेही त्याच्यावर टीकाही झाली. त्यामुळे मायकलच्या चेहऱ्यावरील सर्जरी चांगल्याच गाजल्या आहेत. या संदर्भात त्याच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले. पण तरीही याचा परिणाम त्याच्या फॅन्सवर कधीच झाला नाही. विशेष म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा मायकल हा आदर्श होता.

michael jackson face transformation
मायकल जॅक्सनच्या चेहऱ्यात झालेले बदल (सौ. पिनट्रेस्ट)

लैंगिक अत्याचाराचे आरोप

यशाच्या पायऱ्या चढत असताना मायकल त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहिला. २०१३ साली त्याच्यावर एका कोरियोग्राफरने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.

मायकलचा मृत्यूही संशयास्पद

मायकल अनेक कारणामुळे प्रकाशझोतात राहिला. त्याचा मृत्यूही संशयास्पदच होता. औषधांच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली. अशा अनेक अफवांना त्यावेळी उधाण आले होते. डॉक्टरांनीच त्याचा खून केला, असेही काही लोकांचे म्हणणे होते. असे असले तरी मायकल आज भी जिंदा है अस आवर्जून म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -