घरफिचर्सम्युचुअल फंड आणि शेअरबाजार : नातेसंबंध

म्युचुअल फंड आणि शेअरबाजार : नातेसंबंध

Subscribe

म्युचुअल फंड गुंतवणुकीचा शेअर्सशी संबंध असतो हे आपल्याला माहित आहे. म्हणूनच शेअरबाजारातील घडामोडी आणि त्याचा फंड-गुंतवणुकीवर होणारे भले-बुरे परिणाम आपण पाहणार आहोत. शेअरबाजार म्हणजे अत्यंत उलाढाल, सातत्याने चढ-उतार होत असतात आणि त्यांचा अनुकूल-प्रतिकूल परिणाम सर्वच असे नाही पण काही शेअर्सवर होत असतो. खरेदी आणि विक्रीचा ओघ हा त्यावरच अवलंबून असतो. म्हणून तर आपण शेअरबाजारातील हालचाली आणि त्यांचा म्युचुअल फंड योजना यांच्यावर होणारा परिणाम काय नि कशाप्रकारे होऊ शकतो. हे जाणून घेणार आहोत.

म्युचुअल फंड -शेअर्समधील गुंतवणूक
आपण जेव्हा म्युचुअल फंडाच्या एखाद्या योजनेत पैसे गुंतवतो आणि ते फंड-मॅनेजर्समार्फत विविध प्रकारच्या सेक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात कि जेणेकरून त्यावर अधिक व्याजरूपी उत्पन्न मिळू शकते आणि तो नफा आपल्याला लाभांश म्हणून दिला जातो. त्यांचे आर्थिक बाजाराचे ज्ञान, अर्थव्यवस्था-शेअरबाजार ह्यातील बदल आणि अनुभव ह्यांच्या नजरेतून अनेकविध गुंतवणूक साधनांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.दररोज होणारे बदल,अनेक राजकीय-सामाजिक स्थित्यंतरांचा होणारा परिणाम नोंदला जातो.त्यातून संभाव्य कल ट्रेंड किंमतींवर होणारा परिणाम ,नफा-तोटा होण्याची शक्यता हे सर्व आजमावले जाते.आणि ह्यासर्व परीपाकातून सर्व गुंतवणूकदारांनी विश्वासाने ठेवलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवून भांडवल कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशन करण्याचा व्यावसायिकपणे प्रयत्न केला जातो.

नेमके किती पैसे शेअर्समध्ये गुंतवले जातात ? आपण गुंतवलेल्या म्युचुअल फंड युनिटसमधील पैसे हे कोणकोणत्या सेक्युरिटीजमध्ये गुंतवले कशाप्रकारे गुंतवले जातात हे कळू शकते.ही मोलाची पारदर्शकता ट्रान्स्फरन्सी म्युचुअल फंडबाबत अनुभवास येते. तसे म्युचुअल फंडाचे अनेक प्रकार असतात, काहीमध्ये इक्विटी म्हणजे शेअर्स ,तर काही फंड संमिश्र स्वरूपाचे असतात.गुंतवणूकदारांच्या इच्छेनुसार, अपेक्षेनुसार आणि जोखीम घेण्याच्या कुवतीनुसार विशिष्ठ प्रकारच्या योजनेत पैसे इन्व्हेस्ट करण्याची मुभा आपल्याला असते.

- Advertisement -

उदाहरणार्थ –

लिक्विड फंड – यातील निधी हा प्रामुख्याने नाणेबाजारातील गुंतवणूक साधनांमध्ये म्हणजेच मनी (मार्केट इन्स्ट्रमेन्ट्स अल्प)-मुदतीकरिता गुंतवले जातात.

विशेष फंड (स्पेशल फंड) – हा इतर म्युचुअल फंडापेक्षा वेगळ्या प्रकारात निधी गुंतवतो.उदाहरणार्थ – सोन्यात केली जाते म्हणून त्याफंडाला सुवर्णाधीष्ठित फंड (गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड) असे संबोधतात तर काही फंड चांदी किंवा तत्सम मौल्यवान धातूंमध्ये पैसे गुंतवतात,म्हणून असे फंड हे वेगळे मानले जातात.

- Advertisement -

ब्यालंस फंड – नावातच समतोल साधला जातो म्हणजे एकाचवेळी काही प्रमाणात शेअर्स,रोखे आणि कर्जरोखे अशा विविध साधनात पैसे गुंतवले जातात.असे केल्याने केवळ शेअरबाजार किंवा रोखे असा एकतर्फी मामला रहात नाही आणि गुंतवणूकदाराला समतोलपणाचे आश्वासन मिळते.दीर्घकालीन कालावधीसाठी असे फंड मोलाचे असतात.

डेब्ट फंड (गव्हरमेंट बॉन्ड्स, सीपी-डेबेन्चर्स, कमर्शियल पेपर्स)- यातील जमलेला निधी हा शेअर्समध्ये गुंतवला जात नाही. सरकारी रोखे, कर्जरोखे आणि कमर्शिअल पेपर्स अर्थात पतपत्रे यात गुंतवले जातात. इथे शेअरबाजारइतकी अस्थिरता -दोलायमान अवस्था नसते. म्हणूनच शेअर्स हे ज्यांना जोखमीचे वाटतात. त्यांना हा सुरक्षित पर्याय वाटतो.

शेअरबाजारातील घटनांचे पडसाद -नेमका काय व कसा परिणाम होतो,ते आपण पाहूयात.

1. शेअरबाजार निर्देशांक वाढणे किंवा कोसळणे – कोणत्याही कारणांनी शेअरबाजार सेन्सेक्स म्हणजेच निर्देशांक जर का आकस्मिकपणे कोसळला तर ज्या म्युचुअल फंड योजनेतील निधी शेअर्समध्ये गुंतवलेला असतो. त्यावर साहजिकच परिणाम होतो. अर्थात हा काही कायमचा नसल्याचे,त्याबाबत विशेषतः चिंता नसली तरी फंड म्यानेजरला सावधपणे लक्ष द्यावे लागते. अजिबात गाफील राहून चालत नाही. आणि जेव्हा निर्देशांक अचानकपणे उसळी घेतो तेव्हादेखील तत्परता दाखवावी लागते. आपण देखभाल करीत असलेल्या फंडात कमी-अधिक काही होत असले तर त्यावर हुकुम दुरुस्ती करणे आणि फंड शाबूत राहून अधिक कमाई कशी होईल वा नुकसान कसे रोखले जाईल याकरीता काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते.

कोणत्या कारणांनी अशी परिस्थिती उदभवली हे जाणून घेवून उपाय आणि खबरदारी घेणे अपेक्षित आहे. व्यावसायिक फंड म्यानेजर म्हणून ते त्याचे कर्तव्यच आहे. त्याचे दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा हा असंख्य गुंतवणूकदारांना आणि एकूण त्याम्युचुअल फंड कंपनीला नुकसानकारक ठरू शकते.

2. खरेदी-विक्रीचा निर्णय- योग्यवेळी योग्य शेअर्सबाबत किती व कशी खरेदी किंवा विक्री करायची हेदेखील जागरूकपणे ठरवावे लागते आणि त्यानुसार जलदपणे कार्यवाही करणे महत्वाचे असते.

3. शेअर्स असलेल्या कंपन्या आणि उद्योग-क्षेत्रावर लक्ष ठेवणे – केवळ बाजाराचा निर्देशांक पाहून काम होत नाही तर आपल्या पोर्टफोलिओतील शेअर्स -त्यांचा उद्योग आणि त्यातील घटनांचा सातत्याने अभ्यास होणे गरजेचे असते. कारण एखादी इंडस्ट्री सतत ‘मंदीत’ असेल तर दुर्लक्ष करून चालणार नाही.

उदाहरणार्थ –
1. युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास काय होऊ शकेल? याचा अदमास घेणे. आयात आणि निर्यातीवर कसा आणि किती प्रमाणात परिणाम होऊ शकेल हे तपासणे.
2. डॉलर किंवा युरो किंवा तत्सम विदेशी चलनाच्या किंमतीवर होणारा परिणाम आणि त्याकारणाने आपल्या आयात किंवा निर्यात व्यवहारांवर होणारे सकारात्मक वा नकारात्मक परिणाम पडताळणे.
4. फंडाच्या आर्थिक आरोग्याचा वारंवार आढावा घेत राहणे. आणि त्यानुसार प्रोएकटीव्ह स्वरुपात बदल घडवत राहणे
5. उद्योग-व्यवसायाबाबत सरकारी धोरणे तपासणे आणि आढावा घेत राहणे
6. राजनीती आणि सरकारचे स्थेर्य, राजकीय परिस्थिती याबाबत होणार्‍या घडामोडी ऑब्झर्व्ह करून योग्य असा निर्णय घेणे आणि सुसंगत बदल करणे.

म्युचुअल फंड आणि शेअर्स यांंचे थेट नाते असतेच असे नाही. परंतु अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक म्हणून शेअरबाजाराकडे लक्ष देणे आणि त्यातील चढ-उतार पाहून लागलीच प्रभावी अशी कृती करणे हे प्रोफेशनली अतिशय गरजेचे आहे. असे काही घटक आहेत ज्याचा मोठ्या स्वरुपात परस्परांशी संबंध असतो. म्हणूनच यात काही छोटे-मोठे बदल मग भले ते तात्कालिक असोत किंवा दीर्घकालीन. त्याकडे लक्ष पुरवणे आवश्यक असते. कुशल -व्यवसायिक फंड म्यानेजर्स हे काम योग्य सफाईने करत असतात. आपणदेखील एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून या नातेसंबंधाकडे लक्ष दिले पाहिजे. कारण कोणतीही गुंतवणूक असली तरी त्याबाबत गाफील राहून चालत नाही. अधून-मधून त्याकडे पहाणे, सल्ला घेणे आणि योग्य निर्णय घेत खरेदी-विक्री करणे हे अपेक्षित असते. फारपूर्वी आपण एका गोष्टीतून ऐकलेले असते- भाकरी का करपली? घोडा का बसून राहिला ? त्यामागे एकच ‘कॉमन कारण’ असते कि दुर्लक्ष होणे आणि कृती न करणे, स्थिती न बदलणे. गुंतवणुकीबाबत हेच सूत्र ध्यानात ठेवायचे, पैसे ठेवले नि विसरून गेलो ! अशी भूमिका घेऊन चालत नाही. सतत पाहणी करत राहणे आणि आढावा घेत राहणे जरुरीचे असते.

-राजीव जोशी

(लेखक अर्थ आणि बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -