घरफिचर्सम्युचुअल फंड भांडवली नफा कर

म्युचुअल फंड भांडवली नफा कर

Subscribe

अल्पमुदतीचा भांडवली नफा कर आणि दीर्घमुदतीचा भांडवली नफा कर आपल्या देशात उत्पन्न -कमाई-नफा ह्यावर ‘कर’ -‘आयकर’ भरावा लागतो.अनेक प्रकारच्या गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर कर हा भरावाच लागतो.उत्पन्न लपवले किंवा कर-कलमातून पळवाटा शोधून काढल्या की कर-चुकवण्याचा प्रयत्न केला जातो.पण अशी कर-बुडवेगिरी जेव्हा उघडकीस येते,तेव्हा दंडात्मक कारवाई होऊ शकते.अशाप्रकारे कर चुकवणे हा गुन्हा ठरू शकतो.तरीही आपल्या देशात ‘काळा पैसा’ निर्माण होतो आणि पर्यायी अर्थव्यवस्था कार्यरत राहते.कर-सवलती देऊन कर न भरणे किंवा अनधिकृतरीत्या कमावलेली कमाई कर-चौकटी बाहेर ठेवण्याचे प्रयत्न करणे किंवा लपवण्याचा प्रयत्न करणे हे विघातक प्रकार आहेत. आपली कर-प्रणाली हळू-हळू का होईना प्रागतिक होते आहे.कर चुकवण्यापेक्षा कर नित्य-नेमाने भरत राहणे अशी मानसिकता सर्व नागरिकांची असायला हवी.त्याकरिता भरावे लागणारे कर आणि त्यांची तपशीलवार माहिती आपण करून घेतली पाहिजे. याच हेतूने आज आपण पाहणार आहोत अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफा करविषयक माहिती.

पार्श्वभूमी – अशाप्रकारचा एक आयकर म्हणजे उत्पन्नावरील कर हा अनेक देशांत घेतला जातो.ह्याचे कारण असे कि तुम्ही-आम्ही पैसे गुंतवतो हे लाभ व्हावा,आर्थिक कमाई व्हावी म्हणून.त्यातून जे अतिरिक्त उत्पन्न निर्माण होते,हे अर्थातच कर-पात्र समजले जाते.हा एक प्रकारचा आर्थिक व्यवहार आहे, कमाईमधील काही टक्के वाटा हा सरकराने व्यक्तिगत करापोटी मागितला तर बिघडले कोठे? असे आर्थिक खरेदी -विक्री व्यवहार उघडपणे केले जावेत आणि गुंतवणूकदाराने त्यात लाभ मिळवावा.कोठेही अनधिकृतपणे पैसे टाकू नयेत आणि फसवणुकीचा -लुबाडणुकीच्या व्यवहारांपासून दूर रहावे हाच मुख्य हेतू. काळा पैसा ,दहशतवादी संघटनांना होणारा अर्थ-पुरवठा,बनावटी व्यवहार आणि उलाढाली रोखण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी असे उपाय योजावे लागतात.शिवाय लोकांकडे आलेल्या पैशाला योग्य गुंतवणुकीकडे वळवावे हे एक ध्येय असते. जसा व्यक्तिगत उत्पन्नावर ‘आयकर’ असतो, तसा अतिरिक्त कमाई -वैध मार्गे कमावलेले उत्पन्न हे कराच्या जाळ्यात येते.नवनवीन गुंतवणूक साधने जस-जशी निर्माण होतात,तस-तशी कमाईची दालने विस्तारीत होत राहतात.आणि अशा उत्पन्नावर कर लावला जातो.हेतू हाच की आर्थिक बाजारपेठेत तुम्ही उलाढाल करून खरेदी-विक्री पैसा कमवा आणि ‘काही वाटा’ सरकारच्या तिजोरीतदेखील भरा !!

- Advertisement -

जागतिक पातळीवर एक दृष्टीक्षेप – जगातील अनेक देशात म्हणजे विकसित आणि विकसनशील देशांमध्ये अशा प्रकारचा भांडवली कर आकारला जातो.प्रत्येक देशात त्याचे टक्के -आकारणी भिन्न प्रकारची आहे.ती अर्थातच लोकसंख्या,गुंतवणूक साधने आणि आर्थिक उलाढाल अशा काही मूलभूत घटकांवर अवलंबून असते.

अपवादात्मक नऊ देश –जिथे गुंतवणुकीवर भांडवली कर नाही !!- हो विश्वातील काही मोजक्या देशात असा करच अस्तित्वात नाही. म्हणजे तुम्ही हवी तशी, हवी तिथे गुंतवणूक करा आणि नफा बिनधास्तपणे घेवून जा ! एक गंमत म्हणून आपण त्यादेशांची नावे पाहूया.स्वित्झर्लंड,सिंगापूर,केमन आयलंड,मोरोक्को,बेल्जिअम,मलेशिया,न्यूझीलंड आणि बेलिझे असे हे काही देश आहेत जिथे कोणी पैसे गुंतवले तर सीजीटी म्हणजेच कोणत्याही प्रकारचा क्यापिटल गेन टयाक्स द्यावा लागत नाही.

- Advertisement -

भांडवली नफा  –मुळात भांडवली नफा म्हणजे काय? आणि तो कसा होतो?हे आधी पाहणार आहोत.आपण जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये पैसे गुंतवतो आणि त्यात वाढ होते,तेव्हा भांडवली नफा तयार होतो.मालमत्ता म्हणजे केवळ स्थावर-जंगम -इस्टेट नव्हे,तर विविध प्रकारची गुंतवणूक गृहीत धरली जाते.आणि अर्थातच रिअल इस्टेट -जमीन /ब्लॉक्स/शेती-बागायती जमीन/फार्म हाऊस इत्यादी
उदाहरणार्थ :-1 कागदी /डीम्याट ऊशारींस्वरूपातील -शेअर्स /बॉण्ड्सरोखे/
2 मौल्यवान धातूंमध्ये केलेली गुंतवणूक
दोन मुख्य प्रकार – अल्पकालीन आणि दीर्घकालीन
1 अल्पकालीन भांडवली नफा – आपण गुंतवलेल्या पैशांवर अल्प कालावधीत मिळालेल्या नफ्यावर आकारला जातो. 12 महिन्यापेक्षा कमी कालावधी
2 दीर्घकालीन भांडवली नफा- आपण केलेल्या 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीवरील हा कर आकारला जातो
म्युचुअल फंडावरील एलटीसीजी – आपण जेव्हा इक्विटी म्युचुअल फंडात पैसे गुंतवतो,ज्यात इक्विटीचे प्रमाण हे 65 टक्के किंवा अधिक असते ,तेव्हा एका वर्षात रु एक लाखाच्यावर उत्पन्न /कमाई गेल्यास आपल्याला 10 टक्के 10.4 टक्के इतका इतका दीर्घकालीन भांडवली कर हा भरावा लागतो. आपण आपले युनिट्स विकायला काढतो ,तेव्हा हा कर लावला जातो.पूर्वी असा कर नव्हता ,एप्रिल,2018पासून लादला गेला.कारण उघड आहे की जेव्हा गुंतवणूकदार एका नवीन साधनांत आपले पैसे अधिक प्रमाणात गुंतवले जातात,ज्यावर कर लागत नाही,तेव्हा सरकारच्या लक्षात येते की इथे कर लावल्यास सरकारला चांगले उत्पन्न मिळू शकेल आणि त्यातून हा नवा कर जन्माला आला.करापासून थोडी सुटका मिळवण्यासाठी आपण म्युचुअल फंडाचा डायरेक्ट प्लानमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो.तसा रेग्युलर प्लान असतो ,पण त्यात एक्स्पेन्सेस रेशिओ ढएठ अधिक असल्याने आपल्या पैसे वाचवण्यासाठी तितकासा उपयोग होत नाही.
डायरेक्ट प्लानची वैशिष्ठ्ये
1 फंड देखभाल -व्यवस्थापन खर्च कमी असतो
2 देखभाल खर्च म्हणजे टी
आर कमी असल्याने अधिक पैसा गुंतवला जातो
3 अधिक गुंतवल्यामुळे अधिक उत्पन्नाची सोय

डायरेक्ट प्लानचे फायदे –
1 आपल्या आर्थिक गरजांबाबत उपयोग होतो
2 कर देण्यासाठी सोय होते.
3 अधिक वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास निश्चित अधिक कमाई होऊ शकते
रिअल इस्टेट व्यवहारात लागणारा कर -भांडवली नफा –
मालकीचे घर विकल्यावर हा आकारला जातो ,साधारण नफ्यावर 2० टक्के इतका.जर तुम्ही तोच नफा नवीन मालमत्ता /घर घेण्यासाठी वापरला तर हरकत नाही मात्र त्यासाठी कायद्याने दिलेला कालावधीची मुदत पाळणे जरुरीचे आहे.जर आपण नफा पुन्हा मालमत्ता खरेदीसाठी वापरला नाही, तर मात्र खालील मार्गाने गुंतवता येतो
1 क्यापिटल गेन बॉन्ड्समध्ये उरळिींरश्र ॠरळप इेपवी गुंतवणे -अनेक सरकारी कॉर्पोरेशन्स पायाभूत सोयी-सुधारणा तसेच राष्ट्रोपयोगी प्रकल्प हाती घेतात,त्यांना निधी पुरवठा व्हावा म्हणून कर्जरोखे -बॉण्ड्स विक्रीला काढले जातात.ह्यात पैसे गुंतवल्यास आपला फायदा होतो तसेच राष्ट्रीय उपक्रमास हातभार लागल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते.
वैशिष्ठ्ये –
1 घर विकून आलेल्या नफ्याच्या रकमेवर लागणारा कर वाचवण्यासाठी मदत होऊ शकते
2 हे बॉण्ड्स सहसा दीर्घ मुदतीचे असतात , किमान पाच वर्षाचा लॉक-ड इन असतो,म्हणजे किमान पाच वर्षे तुम्ही हे विकू शकत नाहीत.
3 मिळणारे व्याज हे बँक किंवा तत्सम गुंतवणुकीपेक्षा अधिक टक्के असते.
4 विक्री झाल्याच्या तारखेनुसार अवघ्या सहा महिन्यात आलेला नफा गुंतवावा लागतो.
5 जास्तीत जास्त रक्कम – रु 50 लाख आहे
उदाहरणार्थ – असे महाकाय प्रकल्प राबवणारे- खालीलप्रमाणे :-
झेुशी ऋळपरपलश उेीिेीरींळेप / ठरळश्रुरू ऋळपरपलश उेीिेीरींळेप ङींव/ठएउ-र्ठीीरश्र एश्रशलीींळषळलरींळेप उेीिेीरींळेप/कळसहुरू र्-ीींहेीळीूं ेष खपवळर
2 विशिष्ठ योजनेत पैसे गुंतवणे
हा कर वाचवण्यासाठी साधारणपणे काही मार्ग सुचवले जातात ,अर्थात हे पुन्हा वैयक्तिक कर आणि उत्पन्न अश्या काही महत्वपूर्ण बाबींवर अवलंबून असते.
घर किंवा मालमत्ता विकल्यावर मूळ किंमतीवर जो नफा कमावला जातो ,त्यावर हा कर आकारला जातो.वाचवण्यासाठी काही मार्ग /उपाय-
1 प्रोपर्टी सहसा न विकणे
2 दान करणे किंवा देणगी म्हणून जाहीर करणे
3 मालकी हक्क ट्रान्सफर करणे
घर -मालकीची जागा आणि त्याच्या विक्रीतून आलेला पैसा-नफा हा मोठा विषय आहे,याकरिता पुढे कधीतरी विस्तृत माहिती देता येईल. आपल्या गुंतवणुकीवर असलेला हा कर ह्याकडे शाप म्हणून पाहू नका कारण आपण जितकी कमाई करतो ,त्यातील काही टक्के कर-रुपाने द्यायचे असतात.‘कमाई वाढवा ! कर भरा !!’ हाच आजच्या काळाचा अर्थ-मंत्र आहे.

राजीव जोशी
(लेखक अर्थ-बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -