घरफिचर्समायमहानगर ब्लॉगचार्ली हेब्दो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्मांधता

चार्ली हेब्दो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्मांधता

Subscribe

मुस्लीम धर्मात प्रेषित मोहम्मद पैंगबर यांचा चेहरा किंवा त्यांची प्रतिमा दाखवली जात नाही. याबाबतीत जगभरातील सर्वभाषिक मुस्लीम खूपच संवेदनशील आहेत. मुस्लिमांचे असे म्हणणे आहे की, अल्लाहच्या स्वरुपाची कल्पना करणे हे मनुष्याच्या मेंदूला जमू शकणार नाही. अल्लाहची प्रतिमा बनवू शकेल असा कोणताही मनुष्य या जगात नाही. अल्लाहचे चित्र रेखाटण्याचा कुणी प्रयत्न जरी केला तर त्याला अल्लाहच्या कोपाला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच जेव्हा शार्ली एब्दोने पुन्हा पुन्हा पैंगबरांचे व्यंगचित्र रेखाटले, तेव्हा त्यांच्यावर जीवघेणे दहशतवादी हल्ले झाले आहेत. अनेक मुस्लीम राष्ट्रे या हल्ल्यांचे समर्थन करत आहेत.

जगभरात सध्या अनेक मोठमोठ्या घटना घडत आहेत. कोरोनाचे थैमान आता कुठे शांत व्हायला लागले. त्यातच जगाने पुन्हा आपल्या मूळ स्वभावाकडे वाटचाल सुरू केली. राजकारण, युद्ध, दहशतवाद, लोकशाहीची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी… या मनुष्याला प्रिय असलेल्या विषयाकडे आता जगाने पुन्हा एकदा वाटचाल करायला सुरुवात केली आहे. भारतातही कोरोनाचा प्रभाव कमी होताच, निवडणूक, राजकारण, सीमावाद, अर्थव्यवस्था हे विषय डोके वर काढू लागलेत. तर जगाचा विचार केल्यास सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र या सर्वांमध्ये एक विषय आणखी आहे, ज्याची चर्चा फार कमी होताना दिसतेय. तो म्हणजे फ्रान्समधील शार्ली एब्दो या साप्ताहिकावर पुन्हा एकदा झालेला हल्ला. शार्ली एब्दोने छापलेले पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखिवल्यामुळे इस्लामी कट्टरवाद्यांनी 16 ऑक्टोबर 2020 रोजी संबंधित शिक्षकाचे डोके धडापासून वेगळे केले. त्यानंतर 29 आणि 31 ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील दोन चर्चवर हल्ले झाले. त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला.

फ्रान्समधील व्यंगचित्राचा हा वाद नवा नाही. 2011 साली शार्ली एब्दोने पहिल्यांदा मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढले होते. तेव्हाही शार्ली हेब्दो कार्यालयावर हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर 2012 साली शार्ली एब्दोने पैगंबरांचे व्यंगचित्र काढलं. मात्र 2015 साली शार्ली एब्दोच्या कार्यालयावर झालेला हल्ला सर्वात मोठा होता. या हल्ल्यात कार्यालयातील 12 व्यंगचित्रकार, पत्रकारांचा मृत्यू झाला होता. 2012 च्या हल्ल्यानंतर जगाने शार्लीची दखल घेतली. या हल्ल्यानंतर या घटनेचे विश्लेषण करणारे दोन गट पडले होते. एक गट अर्थातच मुस्लीम अल्पसंख्यांकाचा ज्याचे मत होते की, पैगबरांचे व्यंगचित्र काढून शार्लीने गुन्हा केला आहे, त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. दुसर्‍या गटाचे म्हणणे आहे की, या साप्ताहिकाने असे व्यंगचित्र छापणे आणि त्यांच्यावर हल्ला होणे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तर तिसर्‍या गटाचे मानने आहे की, साप्ताहिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला हा दहशतवादाचे प्रतिक आहे.

- Advertisement -

शार्ली एब्दोच्या घटनेचे पडसात भारतातही पडलेले दिसतात. सोशल मीडियावर उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून पुरोगाम्यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात येतोय. भारतातील पुरोगामी हे धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) गटाचे पाठीराखे आहेत. त्यांच्याबाबत नेहमीच आवाज उठवण्याचे काम पुरोगामी करतात. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असो किंवा बलाढ्य राष्ट्रांकडून इस्लामिक देशांवर होत असलेला अन्याय असो. पुरोगामी नेहमी उजव्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहतात. मात्र शार्लीच्या निमित्ताने भारतातील पुरोगाम्यांमध्ये कमालीची शांतता दिसली, असा आरोप सोशल मीडियावर होत आहे. भारतातील पुरोगाम्यांनी एखादा मेणबत्ती मोर्चा काढला का? किंवा ट्विटरवर या हल्ल्याच्या निषेधार्थ एखादा हॅशटॅग चालविला का? असेही प्रश्न उभे राहत आहेत.

मुळात शार्ली हेब्दोच्या विषयावर भाष्य करण्याआधी त्याची उत्पत्ती जाणून घेतली पाहिजे. डाव्या विचारांचे हे फ्रेंच साप्ताहिक 1969 च्या आसपास सुरू झाले होते. 1960 साली जॉर्ज बेर्नियर आणि फ्रँकाईस कॅव्हान यांनी हाराकिरी या नावाने सुरुवातीला साप्ताहिक सुरू केले होते. सरकार, सरकारमधील मंत्री, अधिकारी, न्यायाधीश, सेलिब्रिटी, कॅथॉलिक, इस्लाम, ज्यू आणि उजव्या विचारसरणीवर टिप्पणी करण्याचे काम हाराकिरीने केले. मात्र वर्षभरातच हाराकिरीच्या उद्योगामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर 1969 साली पुन्हा ‘हाराकिरी एब्दो’ या नावाने हे साप्ताहिक सुरू झाले. 1970 साली फ्रान्सचे अध्यक्ष चार्लस द गॉल यांची एका नाइट क्लबमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यावेळीही एब्दोने व्यंग केले. ज्यामुळे त्यांच्यावर दुसर्‍यांदा बंदी घालण्यात आली होती. अखेर 1992 साली पुन्हा एकदा शार्ली एब्दो सुरू झाले. एब्दो हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ होतो साप्ताहिक. तर शार्ली हे नाव प्रसिद्ध व्यंगचित्र पात्र शार्ली ब्राउन यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. पीनट या व्यंगचित्राच्या सिरीजमध्ये शार्ली ब्राउन नावाचे पात्र होते. आपल्याकडे जसा आर. के. लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’ लोकप्रिय केला होता. प्रत्येक बुधवारी प्रकाशित होणार्‍या या व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक आहेत गेरार्ड बियार्ड.

- Advertisement -

शार्ली एब्दोसारखे साप्ताहिक जगातील इतर कोणत्याही देशात असते, तर इतके वर्ष ते चालू शकले असते का? मात्र फ्रान्सची बातच निराळी. 1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून फ्रान्समध्ये व्यंगचित्रावर आधारीत पत्रकारितेचा इतिहास आहे. तेव्हा फ्रान्समधील राजेशाही, राजघराण्यातील लोक, त्यांची लपवली गेलेली प्रकरणे, वाद-विवाद यावर व्यंग छापण्याची जुनी परंपरा राहिलेली आहे. राजेशाहीचा अस्त होऊन जेव्हा लोकशाही आली, तेव्हाही राजकारणी, प्रशासन, न्यायपालिका, राष्ट्रीय संस्था यावरही ताशेरे ओढण्याचे काम तेथील पत्रकारितेने केले. फ्रान्स हा नव्या विचारांचा नेहमीच पुरस्कर्ता राहिलेला आहे. तिथे लेखक, कवी, चित्रकार आणि कलाकारांच्या कलेला खुल्या मनाने स्वीकारले जाते. मात्र तरीही शार्ली एब्दोवर एवढे प्राणघातक हल्ले का होत आहेत? हे जाणून घेण्यासाठी इस्लाम आणि पैंगबर यांचे नाते लक्षात घ्यावे लागेल.

इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मद पैंगबर यांचा चेहरा किंवा त्यांची प्रतिमा दाखवली जात नाही. याबाबतीत जगभरातील सर्वभाषिक मुस्लीम खूपच संवेदनशील आहेत. मुस्लिमांचे असे म्हणणे आहे की, अल्लाहच्या स्वरुपाची कल्पना करणे हे मनुष्याच्या मेंदूला जमू शकणार नाही. अल्लाहची प्रतिमा बनवू शकेल असा कोणताही मनुष्य या जगात नाही. अल्लाहचे चित्र रेखाटण्याचा कुणी प्रयत्न जरी केला तर त्याला अल्लाहच्या कोपाला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच जेव्हा शार्ली एब्दोने पुन्हा पुन्हा पैंगबरांचे व्यंगचित्र रेखाटले, तेव्हा त्यांच्यावर जीवघेणे दहशतवादी हल्ले झाले आहेत. अनेक मुस्लीम राष्ट्रे या हल्ल्यांचे समर्थन करत आहेत.

इस्लाम धर्मात चिकित्सेला वाव नाही. या मुद्यावरुन युरोप आणि अमेरिकेत सध्या असुरक्षित वातावरण आहे. या देशांतील मुस्लीम नागरिक सुशिक्षित आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म किंवा मूलतत्त्ववाद हे विषय त्यांना माहीत नाही, असे होणार नाही. तरीही त्यांच्यातीलच एखादा टोकाची भूमिका घेऊन शार्ली एब्दोसारख्या संस्थेवर किंवा चर्चवर हल्ला करतो. मुडदे पाडतो. हे चित्र नव्या जगासाठी तरी आशादायक नाही. तर दुसरीकडे शार्ली एब्दोवरही आरोप होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वैगरे ठीक आहे. पण एखाद्या अल्पसंख्याक समुदायाच्या भावनांशी किती वेळा खेळ करायचा? असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. इस्लाममध्ये एखादी गोष्ट निषिद्ध असेल तर त्याच गोष्टींचा उहापोह वारंवार का करायचा? असे प्रश्न इस्लामिक देशांतून विचारले जात आहेत.

शार्ली एब्दोचे माजी संपादक स्टीफन चारबोनियर यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, उद्या समजा बौद्ध धर्मीय म्हणाले अमुक तमुक गोष्टीला आमचा विरोध आहे, बंद करा ते. शाकाहारी म्हणाले मांस खाणे बंद करा. तर काय होईल? इस्लाम धर्मीय तालिबानला जोपर्यंत माझी कला समजत नाही, तोपर्यंत मी चित्र काढायची नाहीत का? तुमच्या धर्मातील गोष्टीवर इतरांनी व्यक्त व्हायचे नाहीच का? हाच न्याय संपूर्ण जग आणि भारतालाही लागू होतो. समांतर सेन्सॉरशिप भारतातही काही प्रमाणात अस्तित्त्वात आहे. आमच्या भावना दुखावल्या त्यामुळे ‘हे बंद करा, ते बंद करा’, असा धोशा लावला जातो. यामध्ये कधी कधी चांगली कला लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर कधी कलाकारच जाणूनबुजून प्रसिद्ध होण्यासाठी कळ काढत असतो. फक्त जमेची बाजू अशी की, भारतात विरोध करण्यासाठी अद्याप हिंसेचा मार्ग अवलंबला गेलेला नाही.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -