CoronaVirus Outbreak ‘आत्ता रोखू शकलो नाही तर मग उशीर होईल’

Mumbai
corona-virus
प्रातिनिधिक छायाचित्र

जेएनपीटी बंदरातील एका कामगाराचे मुख्यमंत्र्यांना अनाहुत पत्र

राज्यातल्या सर्व जिल्ह्नाच्या सीमा बंद, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबानी संपूर्ण महाराष्ट्रात संचार बंदी लागू केली आहे, तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबाना सर्व आरोग्य यंत्रणा जाणतेच्या सेवेसाठी तत्पर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्या सरकार / शासन याना सहकार्य करताना दिसून येत आहे, अभूतपूर्व अशी स्थिती असून सुद्धा नियंत्रणात आहे हे महत्वाचे.

केंद्र सरकार सुद्धा मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना विषाणू विरुद्ध लादण्यास सज्ज असून वेळोवेळी राज्य सरकारनं दिशा निर्देश देऊन कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यास सज्ज झालेली दिसून येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार कामगारांना घरी बसून काम करण्यास मुभा देण्यात आलेली आहे, कामगार आपल्या काम करत असलेल्या आस्थापनेत जर बाहेर काम करत असतील तर तसे काम शासनाने बंद केले आहेत तसेच अत्यावश्यक सेवा तत्परतेने सुरु आहेत, मुखमंत्री व गृहमंत्री इतर मंत्र्यांच्या साथीने सध्य परिस्थिती व्यवस्थित हातळीत आहेत व गरजेला कठोर निर्णय घेण्यास धजवणार नाहीत व महाराष्ट्राला ह्या कठीण परिस्थितून बाहेर काढतील असा विश्वास व दृढनिश्चय त्यांचा देहबोलीतून दिसून येत आहे.

कोरोना विषाणू हाहाकार पसरवत असताना उरण मधील कामगार क्षेत्रात कामगारांची झालेली कुचंबणा व शोषण कोणाला दिसून आलेला नाही हे मोठे दुर्दैव. उरण मधील जवळपास ३६ कंटेनर फ्रेट स्टेशन आहेत जे कस्टम बोन्डेड आहेत (म्हणजे सीमा शुल्क विभाग) मध्ये कस्टमने कधी काम बंद केले आहे, तर कधी सुरु ठेवले आहे, व परिस्थिती व होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन काम चालू बंद करत आहेत व पर्यायाने कामगारांच्या जीविताशी खेळात आहेत. परंतु, CFS मालक कामगारांना कामावर येण्याची सक्ती करत आहेत व आपण अत्यावश्यक सेवेत मोडतो असे नमूद करून भावनिक ब्लॅकमेलिंग करून किंवा दमदाटी करून कामावर येण्यास भाग पडत आहेत. CFS व त्यावर अवलंबून असलेल्या इतर उद्योगामध्ये जवळपास २५,००० ते ३०,००० कामगार संघटित व असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. जर ह्या क्षेत्रात कोरोनाची लागण झाली तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीणच नाही तर कोरोना विषाणू पसरणे पासून रोखणे मुश्किल होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जवाहरलाल नेहरू पोर्ट मध्ये आनंदी आनंद असून सर्व काम नित्यनेमाने सुरु आहेत व कोरोना विषाणू JNPT पोर्ट मध्ये पसरणार नाही याची खात्री पोर्ट चे अध्यक्ष संजीव सेठी याना असून त्यांनी पोर्ट अहो रात्र सुरु ठेवणाचे निर्देश त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दुबई पोर्ट, GTI पोर्ट व सिंगापूर पोर्ट (चवथा पोर्ट) याना दिलेले आहेत. पोर्ट मध्ये काम करणारे QC ऑपरेटर, चेकर व सर्वेयर, लॅशेर हे सरळ परदेशातून आयात केलेल्या कंटेनर जहाजा वर काम करतात व त्या जहाजातील नाविकांशी सरळ संपर्कात असतात, सदर कंटेनर हे जगभर फिरून आलेले असतात,  चेकर व सर्वेयर, लॅशेर याना जर कोरोना विषाणूची लागण झाली तर काय JNPT पोर्ट प्रशाशन याची जबाबदारी घेणार आहे का ?
दुबई पोर्ट मध्ये नोटीस लावण्यात अली आहे तशीच नोटीस GTI पोर्ट मध्ये व सिंगापूर पोर्ट मध्ये लावण्यात अली आहे, सदर नोटीस मध्ये “आपण अत्यावश्यक सेवेत आहोत व सदर अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येऊ शकत नाही” अश्या आशयाचे मजकूर आहे हे का ? कामगारांची ने आन करण्यासाठी असलेल्या वाहनावर सुद्धा अत्यावश्यक सेवा असे बोर्ड लावलेत ते का, किंवा ते बोर्ड कायदेशीर आहेत का, याची चर्चा सध्या उरणच्या चौक चौकात चर्चेचा विषय आहे. आणि हो ह्या पोर्ट वाल्यांची सेवा कधीपासून अत्यावश्यक झाली व का,  अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांना कोरोना विषाणूची लागण होत नाही का हो?

महाराष्ट्राचे मुख्य कामगार आयुक्त श्री महेंद्र कल्याणकर यांनी शासनाच्या निर्देशानुसार परिपत्रक जारी केले आहे हा परिपत्रक साध्य वायरल होत आहे, का ह्या परिपत्रकाला केराची टोपली हे पोर्ट वाले दाखवत आहेत, ह्यांची अशी हिम्मत होतेच कशी?

शेवटी पोर्ट व पोर्ट वर आधारित व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना विषाणूची लागण होण्याची १०० टक्के शक्यता असताना हा पोर्ट सुरु ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी व कोणासाठी, पोर्ट वर आधारित इतर उद्योग त्यामुळे सुरु ठेवणे त्या त्या उद्योगावर बंधनकारक आहे. JNPT मधील सर्व पोर्ट वाले मालक हे सर्व विदेशी आहेत व आपापल्या पोर्ट मध्ये होणार फायदा ते आपापल्या देशात घेऊन जाण्यासाठी उरणच्या स्थानिक कामगारांना वेठीस धरून आपल्या पोळ्या शेकत आहेत. आपले स्थानिक कामगार धोक्यात असून पोर्ट प्रशासनाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही असेच दिसून येत आहे.

*कामगार हि एकाद्या आस्थापनेची मूलभूत गरज असते व त्यास जपणे हे त्या संबंधित आस्थापनेचे प्रथम कर्तव्य असते, सध्य स्थितीत सर्व आस्थापना त्यापासून परावृत्त होऊन आपले हितसंबंध जपण्यात धन्यता मानत आहेत. आस्थापना कामगारांना कोणतीही माहिती देत नाहीत व सारासार विवेकबुद्धीचा वापर न करता कामगारांना वाऱ्यावर सोडून देत आहेत असे दिसून येत आहे त्यामुळे अनागोंदी पसरन्याची शक्यता आहे. सदर पत्राद्वारे CFS व त्यावर आधारित इतर असंघटीत व संघटित व्यसायातील कामगारांना आम्ही आव्हान करतो कि, आजच्या परिस्थितीत जर कोणत्या मालकाने विहित दिवसांचा वेतन नाकारल्यास किंवा कमी वेतन दिल्यास आम्हाला संपर्क करा, आम्ही आपल्याला मदत करण्यास बांधील आहोत.*

 जेएनपीटी बंदरातील एका कामगाराचे मुख्यमंत्र्यांना अनाहुत पत्र