थाळीतला चंद्र

Subscribe

10 रुपयांत पूर्ण थाळी...स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही पूर्ण जेवण हे आपलं स्वप्न असावं...किती उदात्त विचार आहे हा, रोटी कपडा और मकान....या रोटीवर रोटी, रोटी की किमत, असले बॉलिवुडात खोर्‍याने सिनेमे येऊन गेलेत. सात दशकांनंतरही ही रोटी इतकी महत्त्वाची आहे. मुंबईतल्या कापड गिरण्यांच्या जागेवर उभारलेल्या टॉवरनंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांपेक्षा कपड्याच्या फॅशनचं बोललं की आधुनिक झाल्यासारखं वाटतं...काय आहे ना? आता आम्ही उच्चभ्रू वर्गात मोडतो. एसआरएच्या खोलीच्या चिंचोळ्या गल्लीत जुन्या सायकलींच्या जागी आता आमच्या कार्स पार्क केलेल्या असतात. हा विकास तुम्हाला दिसतच नाही मुळी...कसं होणार तुमचं? 10 रुपयात थाळी मिळत असताना तुम्ही करंटे आर्थिक मंदींचं काय घेऊन बसलात? तिकडे पहा मराठी माणसाचा वडापावही आता १२ रुपयांच्या खाली मिळत नाही, तिथं आम्ही आख्खी थाळी 10 रुपयात देणार आहोत, तर यालाच विकास म्हणावा...मागील सात दशके भूक, भाकरी आणि भोजनाच्या पलीकडे आपली लोकशाही गेलेली नाही. जिथं ४५ रुपयांत पिझ्झा मिळतो. ६० रुपयांत बर्गर मिळतं, त्याच मुंबईत 10 रुपयात अख्खी थाळी, ही किती मोठी मजल आपण मारली आहे.

भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली… म्हणणारे चंद्र चांदण्यांपलीकडे गेलेले नारायण सुर्वे यंदाच्या निवडणुकीतील आश्वासने ऐकून मनोमन सुखावले असतील, भाकरीचा चंद्रापासून सुरू झालेला शोध खर्‍याखुर्‍या चंद्रावरच्या पाण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. याचं त्यांना समाधानच असेल. खराखुरा चंद्र शोधण्यासाठी यान पाठवलं गेल्यानंतर त्याचं कौतुक न करण्याचा करंटेपणा आपण याआधी केलेला आहेच? डोक्यावरंच जावळ काढण्यापासून ते माथ्याचा चंद्र होईपर्यंतच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षांच्या प्रवासात आपण कित्येकदा महागाई, नोटाबंदी, इंधन तेल दरवाढ असे ‘दिन में तारे’ पाहिलेले आहेत. तुम्ही चांद्रयानाचं कौतुक करत असतानाच रस्त्यावर आता चंद्र आणण्यात आला असल्याची बातमी पेपरात छापून आलेली आहे. आता खर्‍याखुर्‍या चंद्राचा अनुभव नाक्यावरच्या रस्त्यावरच मिळत असताना तुम्हाला त्याचं कौतुकच नाही. इथं खर्‍याखुर्‍या चंद्राची चर्चा सुरू असताना तुम्हाला तुम्ही त्या भाकरीच्या चंद्राचं काय मोठं कोडकौतुक घेऊन बसलात? आता तर भाकरीच्या चंद्राचीही चर्चा करण्याची गरज नाही. 10 रुपयातली थाळी समोर आली की, भाकरीत चंद्र शोधावा लागणार नाही आणि चंद्रातही चपाती शोधण्याची गरज असणार नाही.

10 रुपयांत पूर्ण थाळी…स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही पूर्ण जेवण हे आपलं स्वप्न असावं…किती उदात्त विचार आहे हा, रोटी कपडा और मकान….या रोटीवर रोटी, रोटी की किमत, असले बॉलिवुडात खोर्‍याने सिनेमे येऊन गेलेत. सात दशकांनंतरही ही रोटी इतकी महत्त्वाची आहे. मुंबईतल्या कापड गिरण्यांच्या जागेवर उभारलेल्या टॉवरनंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांपेक्षा कपड्याच्या फॅशनचं बोललं की आधुनिक झाल्यासारखं वाटतं…काय आहे ना? आता आम्ही उच्चभ्रू वर्गात मोडतो. एसआरएच्या खोलीच्या चिंचोळ्या गल्लीत जुन्या सायकलींच्या जागी आता आमच्या कार्स पार्क केलेल्या असतात. हा विकास तुम्हाला दिसतंच नाही मुळी…कसं होणार तुमचं? 10 रुपयात थाळी मिळत असताना तुम्ही करंटे आर्थिक मंदींचं काय घेऊन बसलात? तिकडे पहा मराठी माणसाचा वडापावही आता १२ रुपयांच्या खाली मिळत नाही, तिथं आम्ही आख्खी थाळी 10 रुपयात देणार आहोत, तर यालाच विकास म्हणावा…मागील सात दशके भूक, भाकरी आणि भोजनाच्या पलीकडे आपली लोकशाही गेलेली नाही. जिथं ४५ रुपयांत पिझ्झा मिळतो. ६० रुपयांत बर्गर मिळतं, त्याच मुंबईत 10 रुपयात अख्खी थाळी, ही किती मोठी मजल आपण मारली आहे. त्यानंतर उद्या १०० रुपयांत प्राथमिक शिक्षण, दिडशे रुपयांत डिग्री आणि दोनशे रुपयांत डॉक्टरेट मिळवायला आपण मोकळे आहोतच. तसा सरकारी धोरणांनी आपल्याकडे शिक्षणाचा अधिकार दिलेला आहेच. त्यामुळे मोफत शिक्षण देणार्‍या आदिवासींच्या आश्रमशाळेतल्या आवारात यापुढे एखाद्या इंटरनॅशनल स्कूलसारखी गर्दी व्हायला वेळ लागणार नाही. अंगणवाड्यातल्या खिचडींचं काय घेऊन बसलात? चिक्की आणि बिस्किटांचे पुडेच्या पुडे रिकामे करून आर्थिक मंदीची झळ बसलेल्या बिस्कीट कंपनीला किती मोठा नफा झालाय हे तुम्हाला दिसतच नाही…तुम्हाला मुळी विकासाची दृष्टीच नाही.

- Advertisement -

राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना आर्थिक विकासाचा दर राखण्याची कसरत करावी लागत असताना आणि जगात आपल्या संस्कृतीचा डंका वाजवला जात असताना तुम्ही मात्र रस्त्याच्या खड्ड्यांवरच बोलत आहात, यातून तुमचं ‘जागतिक दर्जाचं’ अज्ञानच समोर येतंय. ऐन दिवाळीच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या शेजारच्यांची आपल्याकडे घुसखोरी होत असताना तुम्हाला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटतच नाही. तुम्ही बँकेच्या दिवाळखोरीची चर्चा करत बसला आहात, तुम्हाला मुळी विकासाची दृष्टीच नाही. किती अज्ञानी आहात तुम्ही सामान्य जन…मेट्रो, बुलेट ट्रेन येत असताना तुम्हाला नेहमी तुमच्या लोकलचं रडगाणंच आठवतं, त्या लोकलच्या गर्दीतून सामाजिक ऐक्याचे किती मोठं उदाहरण जगासमोर ठेवतो आपण? एकाच सीटवर दाटीवाटीने बसलेले सर्व जात धर्मीय लोक म्हणजे आपल्या राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षतेचे किती मोठं तत्व आपण पाळतो, हे संपूर्ण विषमता नाहीशी झालेल्या या देशातल्या तुम्हा पामरांच्या ध्यानातही येत नसावे. नाही…नाही…आता तुम्हाला आधुनिक व्हावच लागेल. रस्त्यातील खड्डे, पाणी टंचाई, भूक, निवारा, बँकेतल्या ठेवी, महागाई, आर्थिक मंदी, लोकलगर्दी या विषयांपेक्षा मंदिर मशिदीचा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला आता लक्षात यायलाच हवं.

स्वातंत्र्याची सत्तर वर्षे आपण साजरी केलेली आहेत. तेव्हा आता आपण खर्‍या अर्थाने आधुनिक व्हायलाच हवे. 10 रुपयांत थाळी पेक्षा त्याच पैशांत पिझ्झाची मागणी आपण करायला हवी होती. त्यासाठी मोर्चे आंदोलने करायला हवी होती, झालंच तर एखादं उपोषण करून पिझ्झाचा त्रिकोणी तुकडा आणि कोल्ड्रींक्सची बाटली तोंडाला लावून उपोषण सोडण्याचं सुख तरी अनुभवता आलं असतं, पण सामान्य गरजांमध्येच अडकून पडलेले तुम्ही खर्‍या अर्थाने कधी ग्लोबल होणार कोणास ठाऊक?

- Advertisement -

मेट्रो आणि बुलेट ट्रेनमधली चौथी सीट कशी मिळवायची या रोजच्या जगण्यातल्या महत्त्वाच्या विषयात आपण अडकायला नको. आपल्या पक्षात घेऊन एकमेकांना पावन करण्याच्या राजकीय पक्षांकडून आपण सर्वसमावेशकतेचे धडे शिकायला हवेत. दुष्काळमुक्त, जलयुक्त भारतचे स्वप्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. वर्ल्ड हंगर इंडेक्सच्या अहवालानुसार ११७ देशांमध्ये भारताचा क्रमांक भूकेच्या बाबतीत १०२ आहे. त्यामुळे उपासमारीत आपण पाक आणि बांगलादेशलाही मागे टाकले आहे. देशातील अनेक भागात भयानक कुपोषणाचे चित्र असताना आणि चाईल्ड वेस्टींग रेटसुद्धा २०.८ असा संबंधित यादीतील इतर देशांच्या तुलनेत अधिक असताना आलेल्या 10 रुपयातल्या थाळीचे महत्त्व आपल्याला नसेल तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -