करोना…एकदा वाचा..परिस्थिती कळेल..!

Poland
coronavirus in india
करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना

मी युरोपची परिस्थिती खूप जवळून बघतोय… जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, स्विझर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांच्या न्यूजवर माझे बारीक लक्ष आहे. वेगवेगळ्या देशांमधील मित्रांशी संपर्क साधतोय… माझ्या कंपनी कामासंदर्भातल्या डायरीवर मी काही गोष्टी लिहून ठेवतोय… त्यांचं काय चुकलं, त्यानंतर त्यांनी काय केलं हे सर्व मी बघतोय… बर्लिन तसं माझं आवडत शहर, पण आज ते पूर्ण स्तब्ध झालंय… आज ते काय परिस्थितीतून जात आहेत हे सर्व मी बघतोय… जे कोणी बाहेर फिरताना दिसतील त्यांना ३०० ते ५०० युरो म्हणजे २४,००० ते ४०,००० पर्यंत दंड आकारला जातोय… घरातून कोणी बाहेर पडायला तयार नाहीये… जर्मनीला काल ४६०० पेशंट पॉझिटिव्ह सापडले… एकूण आता २०००० झाले… हात लावेल त्या जागेवर विषाणू बसले आहेत असंच समजा… घराघरात कोरोनाचे पेशंट तयार झाले आहेत… आई, बाप, भाऊ, बहीण, बायको, मुलगा, मुलगी, प्रेयसी कोण कुठे अ‍ॅडमिट आहेत… जिवंत आहे कि मेले हे सुद्धा कळायला त्यांना मार्ग राहिला नाहीये… जे मेले त्यांच्या घरच्यांनाही माहित नाही कि आपला बाप-आई, मुलगा-मुलगी, बायको मेले कोरोनात… ही परिस्थिती आपल्याकडे येऊ नये त्यामुळे मी महाराष्ट्रातील माझ्या मित्र परिवाराला वारंवार काळजी घेण्याची विनंती करतोय… युरोपची परिस्थिती सांगतोय…

महाराष्ट्रापेक्षाही हे छोटे देश आहे आणि ३ ते ४ कोटी लोकसंख्या आहे.. तरीही आज अशी भयानक परिस्थिती त्यांच्यावर आहे… आपल्या महाराष्ट्रात १३ ते १५ कोटी लोकसंख्या आहे, विचार करा आपली काय अवस्था होईल… असं बोलायला नाही पाहिजे, पण विचार करा, म्हणून सांगतो, जर लोकांनी बंद पाळला नाही तर आपली अवस्था यांच्यापेक्षाही बिकट होईल, दुदैवाने कोरोनात कोणी मृत्युमुखी पडलंच तर घरातल्या लोकांना त्याचे तोंडही बघता येणार नाही… अंत्यसंस्कारही करता येणार नाहीत मित्रांनो… आपल्याकडील लोकांना अजून परिस्थितीचं गांभीर्य नाहीये… म्हणून सांगतो घरी शांत बसा… पाया पडून हात जोडून विनंती करतो… मी कोरोनाला खूप गांभीर्याने घेतोय, कारण मी सगळं लाईव्ह बघतोय कसे हे कोरोनाच्या विळख्यात सापडत गेले…

युरोपियन लोकांचं काय चुकलं हे सांगायचं झालं तर अतिशहाणपणा आणि मुजोरपणा नडला… प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली होती, जनतेला सतर्क केलं होतं, हॉस्पिटल सज्ज केले होते… पण जेव्हा प्रशासन सांगत होतं कि घराबाहेर पडू नका तेव्हा यांनी ऐकलं नाही… ते लोक पब, क्लब, थिएटर, बीचवर जाऊन बसले… हे लोक स्वभावाने चांगले आहे… पण यांच्यावर कोणी जबरदस्ती केलेली यांना आवडत नाही… हे यांच्या मनाप्रमाणे ऐकणारे लोक… बापाचं ऐकत नाहीत, तेव्हा प्रशासन लांबच… त्याचेच परिणाम आज हे भोगत आहेत… सांगायला माझ्याकडे खूप डेटा आहे… सर्व नोट करतोय… बघतोय अनुभवतोय… पण याच अनुभवाचा फायदा माझ्या महाराष्ट्राला व्हावा म्हणून मी तुमच्यापुढे हे सर्व मांडतोय… कधी कधी वाटतं लाईव्ह येऊन सगळी परिस्थिती सांगावी… पण काही कारणास्तव मी तसे करू शकत नाही… मी हे सगळं सांगतोय, याच कारण एवढंच कि या देशांची एक चूक झाली आणि ती पुढे कशी घातक झाली हे मी अनुभवतोय आणि ती परिस्थिती महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून मी सगळं सांगतोय… जीव तोडुन… ऐका माझं… तुमच्या आई, वडील, बायको, मुलांसाठी तरी ऐका… शिवरायांनी आणि अनेक मावळ्यांनी रक्त सांडून उभा केलेला आपला महाराष्ट्र आपल्याला जगवायचा आहे मित्रांनो…

सगळ्या एअरलाईन्स एअरपोर्ट बंद झाले आहेत, तिकीट बुकिंग होत नाहीये… मला भारतात काही दिवस येताही येणार नाही, पुढे काय होईल हे सर्व मला दिसतंय तरीही माझं मन खंबीर आहे अजून… कारण लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंपासून घेतलेली आहे… रायगडाची माती कपाळाला लागली आहे… मी इथली परिस्थिती का जीव तोडून तुम्हाला सांगतोय हे लक्षात घ्या… आणि सतर्क वागा…

एक प्रतिक्रिया

Comments are closed.