घरफिचर्समायमहानगर ब्लॉगरुर्बन अभियानाने बदलला केंद्रशासित प्रदेश लडाखचा चेहरामोहरा - डॉ. आर.रमेश

रुर्बन अभियानाने बदलला केंद्रशासित प्रदेश लडाखचा चेहरामोहरा – डॉ. आर.रमेश

Subscribe

जम्मू-कश्मीरमधील रुर्बन क्लस्टरचा जलदगतीने विकास होत असताना, लेहजवळील स्पिटुक क्लस्टरने सामाजिक-आर्थिक परिणामांना एका नवीन स्तरावर नेले आहे.

नव्याने तयार झालेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह जिल्हा अलीकडच्या काळात पूर्णपणे वेगळ्या कारणास्तव मुखपृष्ठावरील बातमीत झळकत आहे. लेहपासून सुमारे आठ कि.मी. अंतरावरील श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन अभियानाद्वारे (एसपीएमआरएम) विकसित झालेला आणि ‘स्पिटुक क्लस्टर’ म्हणून ओळखला जाणारा ग्रामपंचायतींचा समूह हा मुळात शहरी वातावरणातील सुविधा आणि संधीनी विकसित होत आहे. जम्मू-कश्मीरमधील रुर्बन क्लस्टरचा जलदगतीने विकास होत असताना, लेहजवळील स्पिटुक क्लस्टरने सामाजिक-आर्थिक परिणामांना एका नवीन स्तरावर नेले आहे.
आर्थिक वाढीची संभाव्यता, पर्यटकांचा प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि उपजिविकेला प्रोत्साहन देण्यासारख्या इतर गोष्टींसाठीसुद्धा हे क्लस्टर्स ओळखले गेले आहेत. स्थानिक शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्या बनवून, वाचनालयांचा विस्तार करून आणि ई-वाचनालय स्थापित करून शिक्षण सुविधांच्या विकासा व्यतिरिक्त मनोरंजन उद्याने, रस्ते, पार्किंग क्षेत्राचा विकास, एलईडी पथदिवे, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक उद्याने, केंद्रीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रणाली यासारख्या पर्यटन संवर्धनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश लडाखमधील स्पिटुक क्लस्टरमध्ये मागील २ ते ३ वर्षात आलेल्या विविध प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे. लडाखच्या या भागामध्ये मुबलक प्रमाणावर आढळणाऱ्या विलायती जर्दाळूसारख्या बागायती पिकांसाठी कोठार आणि वितरण केंद्र म्हणून नवीन गोदाम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.

आर्थिक वाढीस उत्तेजन देण्याच्या उद्देशाने २०१६ मध्ये, भारत सरकारच्या ‘रुर्बन अभियानाद्वारे’ पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्यात एकात्मिक क्लस्टर कृती योजना सुरू करण्यात आली. खेड्यांचे तीन क्लस्टर्स तयार झाले आहेत; पहिला आहे तो जम्मू (गोले गुजरल); दुसरा काश्मीरमधील (खुमरियाळ); आणि लडाख (स्पुतक) हा नव्याने बनलेल्या केंद्र शासित प्रदेशातील तिसरा क्लस्टर. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाख हा केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर अभियानाच्या कामांना महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे.

- Advertisement -

समुद्र सपाटीपासून सुमारे ३५००  मीटर उंचीवरील मुळात रमणीय घनदाट भूप्रदेश असलेल्या शीत वाळवंटात स्पिटुक क्लस्टर वसलेले आहे. यात तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. चोगलामासर – I आणि II आणि क्लस्टर मधील मुख्य गाव स्वतः स्पिटुक. स्पिटुक क्लस्टरची लोकसंख्या १२,९७३ आहे (जनगणना, २०११).

क्लस्टर कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्पिटुक क्लस्टरला ६४.९२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ३२.२३ कोटी रुपयांची कामे यापूर्वीच पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. स्पिटुक क्लस्टरसाठी भर देण्यात येत असलेल्या रुर्बन अभियानाचा विचार करता केंद्रशासित प्रदेश लडाखमधील सर्वात जलद शहरीकरण होणाऱ्यात लेहचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत पुरेसे आर्थिक आणि तांत्रिक आधार घेऊन लडाखमधील वैविध्यपूर्ण जीवनमान आणि वाढत्या आर्थिक उपक्रमांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन व्यवस्थित नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्पिटूक क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वीच्या जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांमध्ये वैयक्तिक आकांक्षा आणि सामूहिक आशावादाचा पाया याद्वारे रचला जात आहे. आधीच पूर्णत्वास गेलेले प्रकल्प (आणि त्यापैकी काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत) याप्रमाणे:

- Advertisement -

पथदिवे: फॉरेस्ट बाग, चोगलामसर ते टी-पॉईंट आणि बुल फार्म ते एमईएस पॉवरहाऊस मार्गावर उंचावरील एलईडी पथदिवे देण्यात आले आहेत. हे २०२० अखेरपर्यंत संपूर्ण स्पिटुक क्लस्टरच्या सर्व प्रमुख जंक्शन आणि गावांपर्यंत याचा विस्तार केला जाईल. रस्ते जोडणी: बाजारपेठ आणि शहरी केंद्रांना जोडण्यासाठी अनेक रस्ते प्रकल्प तयार केले आहेत. यापैकी १२० लाख रुपये खर्चाचे सहा महत्वाचे ग्रामीण रस्ते प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

स्मार्ट वर्गखोल्या आणि ई-वाचनालय: सध्याच्या पिढीतील मुले अविकसित शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर करू नये म्हणून, स्पिलियुकडुम्रा आणि ताशीथॉन्ग्समॉन, चोगलमसार मधील शाळांमध्ये १११.२४ लाख रुपये खर्च करून आयसीटी-सक्षम स्मार्ट वर्गखोल्या आणि डिजिटल वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

फळबागा विकास: लडाख हा विलायती जर्दाळू फळांसाठी प्रसिद्ध आहे आणि तो प्रदेशाचा समानार्थी शब्द आहे. या अभियानाने फळबागांच्या विकासामध्ये दडलेल्या प्रचंड संभाव्यता ओळखल्या. व्यापारी आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आणि त्या सभोवतालच्या स्थानिक आर्थिक कार्याला चालना देण्यासाठी वैयक्तिक शेतकर्यांतना फळबागा लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. हे अभियान १० युनिट्ससाठी १.२० लाख रुपये खर्च करून आवश्यक सक्षमता प्रदान करते. यात शासनातर्फे ५० टक्के अनुदान / प्रोत्साहन समाविष्ट आहे.

पर्यटन प्रोत्साहनः रुर्बन अभियानांतर्गत क्लस्टरमध्ये चोगलामसर येथे अंदाजे ६३० लाख रुपये खर्च करून एक करमणूक उद्यान तयार करण्यात येत आहे. रु. चोगलमसर येथे ६३० लाख. हे सिंधू नदीच्या काठी आहे. या उद्यानात टॉय ट्रेन, ड्रॅगन रोलर कोस्टर, स्ट्राइकिंग कार / बम्बर कार, रॉक क्लाइंबिंग वॉल इत्यादींचा समावेश असेल. उद्यान विकसित करण्याचे काम, तसेच त्या ठिकाणी जाण्यासाठी पुलाची कामे अंशतः पूर्ण झाली असून पुढील कामे प्रगतीपथावर आहेत.

चिल्ड्रन्स पार्क: चोगलामसर येथील ताशीगटसल येथे १५ लाख रुपये खर्चून चिल्ड्रन्स पार्क बनविण्यात आले आहे. परिसरातील मुलांमध्ये हे पार्क आधीपासूनच आवडते ठिकाण आहे. सार्वजनिक सभागृह: मोक्याच्या ठिकाणी सामुदायिक स्वच्छतागृहांच्या निर्मितीबरोबरच स्पिटुक गावात ६४ लाख रुपये खर्चून बहुउद्देशीय आदर्श सार्वजनिक सभागृह तयार करण्यात आले आहे.

शिधावाटप दुकान: चोगलामसर गावात बर्याेच वर्षांपासून खूप जुन्या आणि खराब झालेल्या इमारतीत शिधा साठवला जात होता. १७ लाख रुपये खर्च करून या दुकानाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन: लडाखमधील हे पहिलेच घनकचरा संसाधन व्यवस्थापन केंद्र (एसआरएमसी) डिसेंबर २०१७ मध्ये चोगलामसर येथे कार्यान्वित झाले. घरोघरी जाऊन नियमितपणे कचरा संकलन केले जाते आणि संकलित केलेला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापित केला जातो. चोगलामसर एसआरएमसीच्या यशामुळे लेहमधील नुब्रा, खलत्सी, निमू, पांगोंग आणि चुचोटी अशा ठिकाणीसुद्धा अशाप्रकारची केंद्रे तयार झाली आहेत.

हे फक्त जम्मू-काश्मीरमधील बदल आणि लडाखच्या नव्याने तयार झालेल्या केंद्रशासित प्रदेशात होणारे सखोल परिवर्तन दर्शवितात. अशा प्रकारचे उपक्रम व्यापक प्रमाणावर सुरु आहेत. अशाप्रकारे, रुर्बन अभियानाने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये शहरीकरणाच्या मार्गावर विकास क्लस्टरमार्फत आपली छाप सोडली आहे. फेब्रुवारी, २०१६ मध्ये सुरू झालेल्या या अभियानाने देशातील २८ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशात पद्धतशीरपणे ३०० रुर्बन क्लस्टर तयार केले आहेत. या क्लस्टरच्या विकासासाठी २७,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंजूर झाली असून अंदाजे ८७७२ कोटी रुपयांची (सुमारे ३२ टक्के) गुंतवणूक केली गेली आहे ज्यामुळे स्थानिक आर्थिक विकास केंद्रे म्हणून उदयास येण्याची ग्रामीण भागाची संभाव्यता दृष्टीपथात आली आहे.

खेडेगावाचा बाज कायम ठेवत शहरी सुखसुविधा या ग्रामीण क्लस्टर्सना पुरविण्यासाठीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन लडाखमध्ये प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. सुधारित शहरासारख्या पायाभूत सुविधा, चांगली रस्ते सुविधा, वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, पर्यटकांच्या सुविधा, कौशल्य प्रशिक्षण आणि सुधारित आर्थिक उपक्रमांचा फायदा या क्लस्टर्सना होत आहे. रुर्बन अभियानाची कल्पना प्रत्यक्ष कृतीत साकारली जात आहे. ज्याप्रमाणे लडाखमध्ये नव भारताचे स्वप्न सत्यात उतरत आहे त्याप्रमाणे, ते देशाच्या इतर भागातही साकार होईल कारण आजमितीस ३०० क्लस्टर्सचे काम रुर्बन अभियाना अंतर्गत सुरु आहे.


लेखक डॉ. आर. रमेश – सहयोगी प्राध्यापक, सीआरआय

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था (एनआयआरडी आणि पीआर), हैदराबाद – 500 030
ई-मेल: [email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -