घरफिचर्समायमहानगर ब्लॉगयंदाचे लाभार्थी आहेत...

यंदाचे लाभार्थी आहेत…

Subscribe

2014 ला शिवसेना-भाजप राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी सलग 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत होते. त्यानंतर पाच वर्षात सत्तेचा विजनवास वाट्याला आल्यामुळे पक्षातील सत्तापिपासू, लोभी मंडळी भाजपच्या धावत्या घोड्यावर स्वार झाली. 2019 निवडणुकीनंतर पवारांच्या संकल्पनेतून आलेल्या सरकारने याचा सर्वाधिक फायदा हा शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष यांनाच झालाय. शरद पवारांनीही आपल्या सहकार्‍यांकडून नेटानं काम करून घेताना अशी बैठक जमवलीय की त्यात पवार कुटुंबापासून त्यांच्या मित्रपरिवारापर्यंत आणि हितचिंतकांपासून पक्षापर्यंत सगळ्यांना सत्तेचा लाभ पोचतोय याची नीट काळजी घेतलेली आहे.

आज 31 डिसेंबर. अर्थात वर्षाचा शेवटचा दिवस. गेल्या वर्षभरात घडलेल्या घटना आणि त्या घटनांचे हिरो यांच्यावर जर धावता कटाक्ष टाकला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, राष्ट्रीय पातळीवर शरद पवार-तेजस्वी यादव, क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली आणि दिल्लीच्या सीमेवर हाडं गोठवणार्‍या थंडीत मनमानी कारभार करणार्‍या मोदी सरकारचा धूर काढणारा बळीराजा यांचा उल्लेख करावा लागेल. यापैकी शरद पवार सर्वात बुजुर्ग तर विराट आणि तेजस्वी तरुणांचे आयडॉल. त्यातल्या प्रत्येकाने आपापल्या परीने जी कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेच्या दर्जेदारपणा शिक्कामोर्तबच झाले आहे.

गेलं संपूर्ण वर्ष हे राष्ट्रीय राजकारणासाठी विशेषतः महाराष्ट्रासाठी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना खूपच फलदायी गेल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर कोविडमध्ये राज्यात प्रशासनाची सगळी सूत्रं नेत्यांपेक्षा अधिकार्‍यांच्या हातात गेली. गेल्या पाच दशकात पवारांनी, नोकरशाही आणि अधिकार्‍यांबरोबर जे संबंध जपलेले आहेत ते पाहता अधिकारी निर्णयांची ‘पहिली प्रत’ ही पवारांकडे पाठवू लागले. इतकंच काय तर निर्णयांची कल्पनाही पवारांकडून येऊ लागली. सत्तेचा रिमोट कंट्रोल शरद पवारांकडे गेला नव्हे तो पवारांनी योजनापूर्वक हिसकावला.

- Advertisement -

2014 ला शिवसेना-भाजप राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी सलग 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत होते. त्यानंतर पाच वर्षात सत्तेचा विजनवास वाट्याला आल्यामुळे पक्षातील सत्तापिपासू, लोभी मंडळी भाजपच्या धावत्या घोड्यावर स्वार झाली. 2019 निवडणुकीनंतर पवारांच्या संकल्पनेतून आलेल्या सरकारने याचा सर्वाधिक फायदा हा शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष यांनाच झालाय. शरद पवारांनीही आपल्या सहकार्‍यांकडून नेटानं काम करून घेताना अशी बैठक जमवलीय की त्यात पवार कुटुंबापासून त्यांच्या मित्रपरिवारापर्यंत आणि हितचिंतकांपासून पक्षापर्यंत सगळ्यांना सत्तेचा लाभ पोचतोय याची नीट काळजी घेतलेली आहे. हे करत असताना पक्षाच्या कार्यालयात दरबार भरवून जनतेला ‘आम्ही तुमचं ऐकतोय’ हा फील द्यायलाही ते विसरलेले नाहीत.

आपण राज्याचा मुख्यमंत्री बसवला आहे सहाजिकच त्याच्यावर पहिला हक्क आणि अधिकार आपला असल्याच्या अविर्भावात राष्ट्रवादीची छोटी-छोटी नेतेमंडळी राज्यभरात वावरत आहेत. आणि त्यामुळेच पंचवीस वर्षं भाजपकडे असणारा पुण्याचा विधान परिषदेचा शिक्षक मतदारसंघ असू द्या किंवा भाजप नेते नारायण राणे यांनी खासदार म्हणून दत्तक घेतलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गांव असू द्या. राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मोठ्या खुबीनं आपल्या पक्षाची उपस्थिती आणि विजय या दोन्ही गोष्टी अधोरेखित करण्यात यश मिळवत आहेत. पुण्यात निवडणूक जिंकणारे राष्ट्रवादीचे अरुण लाड असुद्या किंवा सिंधुदुर्गचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत असू द्या. सामंतांच्या कार्यक्षेत्रातील कुडाळच्या वालावल गावात नारायण राणेंचं प्राबल्य. सेना आमदार वैभव नाईकांच्या मतदारसंघात हा वालावल गाव येतो.

- Advertisement -

या गावातील एका दहावीच्या विद्यार्थिनीला अंधारात अभ्यास करावा लागतो म्हणून अमित सामंत यांनी या मुलीच्या घरात सोलर सिस्टिमवर प्रकाशाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. हे जेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांना कळलं तेव्हा त्यांनी लगोलग गावात आणि परिसरात राष्ट्रवादीचे बॅनर पवारांच्या फोटोसह लावून टाकले. इथे सांगायचा मुद्दा हा आहे, घटना छोटी असो वा मोठी. भाजपचा मतदारसंघ हिरावून घेणं असुद्या किंवा एखाद्या गरजू विद्यार्थिनीला अभ्यासासाठी मदत करणं असू द्या. केलेल्या गोष्टीचं श्रेय पक्षाला कसं मिळणार याची एक वेगळी व्यवस्था पवारांनी गेल्या काही वर्षांत बनवून घेतली आहे. त्यामुळे सरकारमध्ये असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा सत्तेचा सर्वाधिक लाभ पवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या पक्षाला मिळतोय या विधानाला पुष्टी मिळते.

शिवसेनेमध्ये मात्र मातोश्रीतील काही मंडळी आणि त्यांना आवडणारे मोजके जण सोडले तर तळाच्या कार्यकर्त्यांना विशेष काम शिल्लक राहिलेलं नाही. काँग्रेसची तर्‍हा यापेक्षा वेगळी नाही. शरद पवारांनी ही गोष्ट हेरुन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासारख्या दुखावलेल्या मंडळींनाही पंखाखाली घ्यायची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय पाटील-आशिष शेलार( संजय नाईकांच्या रुपात) असले तरी तिथेही रिमोट कंट्रोल पवारांचाच चालतो. त्यासाठी पवारांनी सत्तरी गाठलेल्या नियमांची धजिया उडवणार्‍या वर्षाला लाखो रुपयांच्या वेतनासह भत्ते घेणार्‍या आपल्या सी. एस. नाईक या दूताकरवी सूत्रं हाती ठेवली आहेत. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त्यांमध्ये वर्णी न लागलेल्या मिलिंद नार्वेकर यांना मुंबई प्रिमियर लीगच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

सत्ता ही फक्त आपल्या कुटुंबापुरतीच मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या मंडळींनाही त्यात सोयीनं कसं वाटेकरी करून घ्यायचं हे शिकावं तर ते पवारांकडूनच. कारण आमदारकीच्या राज्यपाल नियुक्त यादीत समावेश नसलेले नाराज नार्वेकर तापदायक ठरु नयेत हाच त्यातला उद्देश. जी गोष्ट उद्धव यांना मुख्यमंत्री करून पवारांनी राज्यात साधली तीच गोष्ट राष्ट्रीय पातळीवर साधण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून बिहार निवडणुकीमध्ये सुरू झाला होता. पवारांनी तेजस्वी यादवला आर्थिक रसद पुरवून बीजेपीच्या नाकी तोंडी फेस आणला होता. त्याच वेळी राहुल गांधी आणि काँग्रेसने कच खाल्ली नसती तर कदाचित बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. जी गोष्ट पवारांनी सत्तेचा दर्प आलेल्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना झटका देऊन मोदींना दाखवून दिली तीच गोष्ट पवार नितीश कुमारांना धक्का देऊन देशाला दाखवू इच्छित होते. मात्र काँग्रेसने त्यांच्यावर मर्यादा आणल्या. त्यापाठोपाठ युपीएच्या अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची पुडी सोडून गेल्या वर्षभरातील राजकीय कॅनव्हासवर पवारांनी स्वतःला जे केंद्रित करून घेतलं ते विलक्षणच होतं.

सत्ता हा एक विलक्षण खेळ आहे हे अनेकांच्या लक्षात आलेलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवती मुख्यमंत्री असताना नागपूरपासून मुंबईपर्यंत जी मंडळी पोलिसांच्या कड्यांमध्ये फिरत होती ती सत्ता गेल्यानंतर वर्षभरातच चर्चगेटसह दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या भागात सामान्य नागरिकांप्रमाणे विस्कटलेल्या चेहर्‍यांनी फिरताना दिसतायत. इतकंच कशाला मुख्यमंत्री कार्यालयात असलेले उध्दव ठाकरे यांचे सध्याच्या मोसमात खास असलेले सुधीर नाईक महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्याकडे राणीबाग प्राणीसंग्रहालयाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती.

उध्दव ठाकरेंची मंजुरी असूनही तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी भेटीसाठी आलेल्या सुधीर नाईकांना लॉबीतल्या अभ्यागतांच्या प्रतीक्षा बाकांवर तासनतास बसवून ठेवल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्याचा तेव्हा अनेकांना आनंदही झाला होता. पण त्याच सुधीर नाईक यांनी अल्पावधीतच बाजी पलटवून मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे निवृत्त झालेल्या सुधीर नाईक यांचा प्रशासनातला भाव अचानक वधारला आहे. शेवटी करिश्मा सत्तेच्या खुर्चीचा असतो. ती खुर्ची सहाव्या माळावरच्या मुख्यमंत्र्यांची असू द्या, त्यांच्या दालनातल्या सुधीर नाईकांची असू द्या किंवा या दोघांनाही कार्यरत करणार्‍या शरद पवारांची असू द्या. पन्नास वर्ष सक्रिय राजकारणात आणि संसदीय कार्यक्षेत्रात असणार्‍या शरद पवारांना याचं नेमकं भान आहे.

जग हे फक्त यशाला आणि तुमच्या करिष्म्याला सलाम करतं. हे परवा ऑस्ट्रेलियातल्या क्रिकेटच्या मैदानावरही पाहायला मिळालं. कसोटी सामन्यातील नेतृत्वाची धुरा कोहलीऐवजी अजिंक्य रहाणेकडे आल्यानंतर त्याने मेलबर्न कसोटी सामना जिंकून दिला. आणि जगभरात अजिंक्य राहणेच्या नेतृत्वगुणांवर आणि फलंदाजीच्या कौशल्यावर स्तुतीसुमनं उधळली गेली. या विजयाच्या आदल्या दिवशी आयसीसीच्या मानांकनात अव्वल असलेल्या विराट कोहलीकडे दुर्लक्ष करायलाही चाहत्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. विराटने कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 क्रिकेट मध्ये 10 वर्षांत ( 1 जाने. 2011 ते 7 ऑक्टो. 2020 या काळात) 20,396 धावा केल्या. पण ही त्याची वैयक्तिक कामगिरी होती. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिली कसोटी भारताने गमावली होती. रहाणेने दुसरी कसोटी आपल्या नेतृत्व गुणाने आणि फलंदाजीने जिंकून दिली. साहजिकच क्रिकेटप्रेमींना जिंकणारा ‘अजिंक्य’ पसंतीस उतरला. राजकारणासह सर्वत्र तसंच घडत. याची शरद पवारांना नेमकी कल्पना असल्यामुळेच ते आपल्या ‘सहस्त्रचंद्र दर्शन’ वर्षात एखादी मास्टर इनिंग खेळून मोकळे होतील कुणी सांगावं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -