घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअझरभाईजान, आर्मेनिया युद्धाने भारताला काय दिले?

अझरभाईजान, आर्मेनिया युद्धाने भारताला काय दिले?

Subscribe

आर्मेनियाच्या लष्कराने अझरभाईजान आणि तुर्कस्तानची ७ हॅलिकॉप्टर, १५ ड्रोन, १० रणगाडे नेस्तनाबूत केले. १०० पेक्षा जास्त सैनिक मारले आहेत. अझरभाईजान आणि तुर्कस्तानच्या लष्करासाठी हा मोठा धक्का होता. अझरभाईजान अद्याप त्या धक्क्यातून सावरलेला नाही. तर पाकिस्तानलाही त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे सैनिक प्रत्यक्ष लढत नसताना पाकिस्तानला त्यामुळे धक्का कसा बसू शकतो, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. त्याला कारणही तसेच आहे. आर्मेनियाने हा पराक्रम गाजवला तो भारताच्या रडार यंत्रणेमुळे. हो! भारतात विकसित झालेली रडार यंत्रणा आणि भारताकडून व्यावसायिकदृष्ठ्या आर्मेनियाला विकण्यात आलेल्या या रडार यंत्रणेमुळे आर्मेनिया हे मोेठे शौर्य गाजवू शकला आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

आशियाई देश आर्मेनिया आणि अझरभाईजान या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. त्याबाबत आपल्यापर्यंत पुरेशा बातम्या येत नसल्या तरी हे दोन देश एकमेकांना भिडले असून मध्य आशियाई आणि आशियाई देशांनी या युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अप्पर करभाख किंवा नागोरनो करभाख या भागात या दोन देशांच्या फौजा एकमेकांविरुद्ध आग ओकत आहेत. अझरभाईजान हा देश मुस्लीम प्रजासत्ताक देश आहेत. तर आर्मेनिया हा ख्रिश्चन देश आहे. त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला तो जमिनीच्या एका तुकड्यावरून. आर्मेनिया आणि अझरभाईजानच्या या दोन देशांच्या सीमा निश्चित नसलेल्या भागात हे दोन्ही देश त्या प्रांतात आपआपला हक्क सांगत आहेत. अझरभाईजान हा पाकिस्तान आणि तुर्कस्तानच्या नादी लागून कट्टरपंथीय इस्लामकडे वळू लागला आहे.

पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी अझरभाईजानला आर्मेनियाविरुद्ध भडकवले. खिलाफत पुन्हा प्रस्थापित करू पाहणार्‍या तुर्कस्तानला ख्रिस्ती देश आर्मेनियाला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तुर्कस्तान आणि पाकिस्तान सध्या अझरभाईजानला मदत करत आहेत. मात्र, आर्मेनियाही तितकाच इरेला पेटला असून तोही माघार घ्यायला तयार नाही. या दोन राष्ट्रांच्या संघर्षामुळे इतर मुस्लीम राष्ट्रे मात्र चिंतेत आहेत. इराणने अझरभाईजान आणि आर्मेनियाला लढाई थांबवून चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका या युद्धावर बारीक लक्ष ठेऊन आहे. लवकरच त्यातून मार्ग काढण्यात येईल, असे म्हटले आहे. इतर देशांनीही आर्मेनिया आणि अझरभाईजान या दोन देशांनी युद्ध टाळून चर्चेतून मार्ग काढण्याचा सबुरीचा इशारा या देशांना दिला असताना पाकिस्तानला मात्र अझरभाईजानची बाजू योग्य वाटतेय. नागोरनो करभाख हा भाग अझरभाईजानचाच असून त्यावर आर्मेनियाने कब्जा केला आहे. त्यामुळे आम्ही अझरभाईजानच्या बाजूने असणार असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तुर्कस्ताननेही पाकिस्तानची री ओढली आहे. पाकिस्तान आणि तुर्कस्तानच्या मते अझरभाईजान हा शांतिदूतांचा देश आहे. तो इस्लामिक कायद्याची तंतोतंत अमलबजावणी करतो तसेच तुर्कस्तानच्या खलिफाला मानतो म्हणून अझरभाईजानला मदत करणे हे प्रत्येक इस्लामिक देशांचे कर्तव्य आहे, असे तुर्कस्तान आणि पाकिस्तान संपूर्ण इस्लामिक राष्ट्रांना घसा फाटेपर्यंत सांगत आहेत. आर्मेनिया हा गैर इस्लाम म्हणजे पाकिस्तान आणि तुर्कस्तानच्या मते काफिरांचा देश आहे. त्यामुळे दहशतवादी पाकिस्तान आणि तुर्कस्तानच्या मते काफिरांना जगण्याचा अधिकार नसल्यामुळे अझरभाईजानचे शांतिदूत सतत आर्मेनियाच्या काफिरांचा तिरस्कार करतात. त्यातून या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू असतो. अझरभाईजानला आर्मेनियावर कब्जा करायचा आहे. आर्मेनिया हा देश, त्यांची संपत्ती आणि विशेष म्हणजे आर्मेनियातील महिलांवर कब्जा करायचा आहे. अझरभाईजानमध्ये राहणार्‍या व्यक्तींचे व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक अकाऊंट चेक केले तर त्यांच्या पोस्ट हा बहुतेक करून आर्मेनियन स्त्रियांबद्दल, त्यांच्यावर कब्जा करण्याबाबत असतात हे स्पष्ट दिसून येईल. अनेकदा अझरभाईजानमधील शांतीदूत त्याचा जाहीरपणे उल्लेखही करतात. एका बाजूला अझरभाईजान अशाप्रकारे आर्मेनियावर कब्जा करण्याची स्वप्ने पहात असताना तुर्कस्तान आणि पाकिस्तान त्याला खतपाणी घालत आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती तैयब एर्दोगान यांनी आपल्याला इस्लामिक जगाचा स्वयंघोषित खलिफा म्हटले आहे. आपण खलिफा आहोत आणि इस्लामिक देश आपले आदेश पाळतात, हे दाखवून देण्यासाठी तुर्कस्तान अनेकदा अझरभाईजानसारख्या लहान देशांना हाताशी धरू लागला आहे.

स्वत:चे खलिफापद सिद्ध करण्यासाठी एर्दोगान इस्लाम देशांना फूस लावत आहे. अझरभाईजान या देशालाही तुर्कस्तानने फूस लावली आहे. एका बाजूला तुर्कस्तानने लष्करी मदतीचे आश्वासन दिले असताना अण्वस्त्रधारी पाकिस्तान बाजूने उभा राहिल्यामुळे अझरभाईजनचे साहस वाढले. त्यामुळे अझरभाईजानने सरळ आर्मेनियाविरुद्ध युद्ध पुकारले. अर्थात अझरभाईजान हा एकटा आर्मेनियाविरुद्ध लढत नाही, तर त्याच्यासोबत तुर्कस्तानचे सैनिक, शस्त्रास्त्र आणि इतर युद्धसामुग्री सज्ज आहे. दुसर्‍या बाजूला आर्मेनिया मात्र एकटाच किल्ला लढवत आहे. आर्मेनियामध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. त्यांचे सैन्य आघाडीवर आहे. एका बाजूला तीन राष्ट्रे आणि दुसर्‍या बाजूला एकटा आर्मेनिया तरीही हा देश या तीन राष्ट्रांवर भारी पडू लागला आहे. युद्ध छेडताच आर्मेनियाने अझरभाईजानला मोठा धक्का दिला. आर्मेनियाच्या लष्कराने अझरभाईजान आणि तुर्कस्तानची ७ हॅलिकॉप्टर, १५ ड्रोन, १० रणगाडे नेस्तनाबूत केले. १०० पेक्षा जास्त सैनिक मारले आहेत.

- Advertisement -

अझरभाईजान आणि तुर्कस्तानच्या लष्करासाठी हा मोठा धक्का होता. अझरभाईजान अद्याप त्या धक्क्यातून सावरलेला नाही. तर पाकिस्तानलाही त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे सैनिक प्रत्यक्ष लढत नसताना पाकिस्तानला त्यामुळे धक्का कसा बसू शकतो, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. त्याला कारणही तसेच आहे. आर्मेनियाने हा पराक्रम गाजवला तो भारताच्या रडार यंत्रणेमुळे. हो! भारतात विकसित झालेली रडार यंत्रणा आणि भारताकडून व्यावसायिकदृष्ठ्या आर्मेनियाला विकण्यात आलेल्या या रडार यंत्रणेमुळे आर्मेनिया हे मोेठे शौर्य गाजवू शकला आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. असा देश जो कधी काळी आपल्या जवानांसाठी बर्फात युद्ध करताना त्यांचे पाय सुरक्षित राहू शकतील असे बूटही तयार करू शकत नव्हता, आज तो देश रडार यंत्रणा विकसित करतो आणि जागतिक स्तरावर अव्वल ठरणारी ही यंत्रणा विकून त्याद्वारे आर्मेनियासारखा एक लहान देश शौर्य गाजवून तीन-तीन देशांना पुरून उरतो. भारताच्या या रडार यंत्रणेची दखल आता संपूर्ण जगाने घेतली आहे. युद्ध अझरभाईजान आणि आर्मेनियामध्ये सुरू आहे. पण या युद्धावर नजर ठेऊन असलेले अमेरिका, चीन, रशिया या राष्ट्रांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत. भारताने स्वाती वेपन लोकेटिंग रडार नावाची रडार प्रणाली विकसित केली. जागतिक दर्जाची असलेली ही रडार प्रणाली प्रत्यक्ष युद्धात किती महत्त्वपूर्ण ठरेल याची जगातील अनेक देशांना खात्री नव्हती. मात्र, योग्य मार्केटिंग आणि प्रात्यक्षिकांमुळे आर्मेनिया या देशाने ही रडार यंत्रणा खरेदी केली. आर्मेनियाने भारताकडे सहा रडार प्रणालीची ऑर्डर नोंदवली. त्यातील दोन रडार प्रणाली अझरभाईजनविरुद्धच्या युद्धापूर्वी आर्मेनियाकडे सुपुर्द करण्यात आल्या.

आज भारताची ही स्वाती वेपन लोकेटिंग रडार प्रणाली युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. अझरभाईजान आणि आर्मेनिया युद्धात पुढे काय होईल हे येणार काळ ठरवेल. मात्र, भारताच्यादृष्टीने हे युद्ध आपली तंत्रज्ञान क्षमता जगापुढे सिद्ध करणारे ठरले आहे. यापुढे अशा युद्धप्रणालीसाठी भारताकडे संपूर्ण जगातून अनेक ऑर्डर आल्या तर आश्चर्य वाटायला नको! भारत आधुनिक युद्धप्रणालीत आत्मनिर्भर झाला आहेच. पण त्याचबरोबर या युद्धप्रणाली तो निर्यातही करू शकतो. अर्थात हे शक्य झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे. आतापर्यंत युद्ध सामुग्रीसाठी जगापुढे हात पसरणारा भारत आज जगात युद्धसामुग्री निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे. पुन्हा भारतात तयार होणार्‍या युद्धसामुग्री या जगातील इतर देशांमध्ये तयार होणार्‍या युद्धसामुग्रींपेक्षा कमी खर्चात तयार होत असल्यामुळे भविष्यात त्यांची मागणी वाढणार आहे. अझरभाईजान, आर्मेनियाच्या युद्धाने भारताला त्याची क्षमता जगापुढे सिद्ध करण्याची संधी दिली, हे निश्चित.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -