घरफिचर्सदेखना पडिंगा...

देखना पडिंगा…

Subscribe

आमच्या कोळेकरकाकानं मग चौथ्या शीटवरून व्हाट्सअपवर आलेलं नयनतारा बाईचं भाषण जसं जमलं तसं वाचून दाखिवलं त्यात ’त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं,धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा प्रयत्न,कलाकारापुढे सरकारनं नम्र, उदार राहायला हवं,जमावाच्या हिंसाचारामुळे भीतीचं वातावरण, कलेवर नियंत्रण हे हुकूमशाहीचं लक्षण, इतिहासाचं विघातक पुनर्लेखन, साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची वगैरे वगैरे एक से एक नंबर एक गोष्टी त्या भाषणात होत्या.

आज खाली असून बी डब्बा गरम झाल्ता…क्या जगतापभाई तुम इन्व्हिटेसन देकर घर बुलाते हो और फिर इन्व्हिटेसन कॅन्सल करते हो … ऐसा अच्छा लगता है क्या..सुं बोल छे मिसरा’ बसल्या बसल्या जिग्नेसभाईनं काडी केली. त्यावर जगताप ’मी कधी बलिवलं रं तुला..अन बलवून नाही कधी म्हनलं…उगं सुकासुकी बदनामी करायची गरज न्हाई’ म्हणून बसल्याजागी उठल्यासारखं करत जगताप खवळला. जगतापच्या अँग्री पोजवर जिग्नेस जर्रा चपापला. बिचार्‍या मिसराला तर काही कळलंच नाही त्याचं नेहमीचं ’सही है’ मात्र थंडीत तेल थिजल्यासारखं व्हटातल्या व्हटात थिजलं, भाईर आलंच नाही. अन ते बरंही झालं. जगतापला चिल बेबी करत जिग्नेसनं मग खुलासा केला की कसं एका मोठ्या लेखक बाईला मराठी लेखक माणसांनी बोलावलं आन मग तिला नाही म्हणून सांगितलं असं पेपरात आलंय अन त्याच्या व्हाट्सअप ग्रुपवर सुद्धा चर्चा चालू आहे ते. जगतापनं ’हं हं’ म्हणून ऐकून घेतलं अन म्हनला ’असलं बरं वाचतुस रं तू … अन लक्षात घे मराठी माणूस बलिवतोय तरी हे तुमच्यापस्तोर आलं, तुम्ही असं बलवायला काई करता हे तर ऐकिण्यात सुद्धा नाही आमच्या’ फाट्याला फाटे फुटत गेले.आमच्यापैकी कुणीच कधी असल्या समारंभाला कधी गेलं नव्हतं. डोंबिवलीत झालतं पर ती आमची लाईन नव्हती म्हणून तिकडं जायचा प्रश्न नव्हताच.आमच्यापैकी कुणीच कधी कोण उदघाटक? कोण अध्यक्ष ?असला हिसाब ठीवला नव्हता. पैले पैले आमच्या ग्रुपमधले काही काही पुस्तकं घेऊन येत होते पर जिओ आल्यापासून म्याच,आले गेले व्हिडिओ नाहीतर दिल्या घेतल्या पिच्चरचा फ्रेश मालंच चलतोय. पण माझ्या लोकल कारकिर्दीत पैली बार साहित्याचा इशय सुरु झालता.

- Advertisement -

आमच्या कोळेकरकाकानं मग चौथ्या शीटवरुन व्हाट्सअपवर आलेलं नयनतारा बाईचं भाषण जसं जमल तसं वाचून दाखिवलं त्यात ’त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं,धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा प्रयत्न,कलाकारापुढे सरकारनं नम्र, उदार राहायला हवं,जमावाच्या हिंसाचारामुळे भीतीचं वातावरण, कलेवर नियंत्रण हे हुकूमशाहीचं लक्षण, इतिहासाचं विघातक पुनर्लेखन, साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची वगैरे वगैरे एक से एक नंबर एक गोष्टी त्या भाषणात होत्या. अन सर्वात महत्वाचं त्या इंग्लिशमध्ये लिहीत असल्या तरी त्यांचं मराठी लोकांशी असलेलं नातं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं अन ते आपल्या लै जोरात लक्षात राहणार होतं ती म्हंजी ’मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रवणारे महादेव गोविंद रानडे त्यांच्या चुलत आजोबाचे शंकर पांडुरंग पंडितांचे जवळचे दोस्त आणि कलीग होते’

आता आपलाच नाही बाकीच्या ग्रुपवाले बी बोलूलाले. बोलता बोलता लै लै डेटा शेअर झाला. त्यात कळलं की ही बाई लै म्हणजे लै ष्ट्रोन्गआय. तिनं आणिबाणीला इरोध केलाय, अवॉर्ड वापसी केलीय अन नेहमी आपली भूमिका लै जोरात मांडीत आलीय अशा एक ना हजार.आमच्यातला कोण साहित्यिक नव्हता तरी आज या विषयावर निस्ता धुरळा उठलता. मायच्यान! आमच्यातल्या कुनीच कधी कोणत्या साहित्यचर्चेला गेल नव्हता. साहित्यिक भूमिका- बांधिलकी असले शब्द ज्याला मराठी येतोतं त्येनच कवाबवा शनवार रैवारच्या पुरवनीत वाचला आसल तर वाचला आसल. आमच्यापैकी कुनीच कधी टीव्हीवरसुद्धा पूर्णच्या पूर्ण संमेलनातलं भाषण ऐकिल नव्हतं. तरी जिंदगीत पहिली बार आम्ही ते भाषण एकीलालतों ,जरा व्हाटसप कर म्हणून बघूलालतो वाचलालतो चर्चा करूलालतो. फेसबुकवर व्हाटसपवर कुनी साहित्यिक निषेध करूलालते, कुनी निषेध करून येणार असलेल्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घालूलालते.कुनी सांगलालतं की अध्यक्षानं काय करायला पाहिजेल- काय नाही करायला पायजेल. कुनी म्हनलालतं हे साहित्यसंमेलन होतं का नाही ब्वा! कुनी म्हनलालतं हे नकोच ब्वा! कुनी इचारलालतं हेच्यातून साधतंय क्वाय! कुनी सांगण्यावर होतं हेचि जरुरत काच हाय! कुणी राजीनामा मागलालतं! कुनी राजीनामा दिवलालतं! आग अन धूर आता संगटच लागलता. बंधू भगिनीनो, संमेलन तिकडं विदर्भात असलेल्या यवतमाळला होतं अन साधकबाधक चर्चा अन संमेलनांच्या उदघाटनाचं भाषन आमच्या लोकलमध्ये हुलालती. मामला गरम झाल्ता.

- Advertisement -

कधी नाही ते पैल्यांदा आमच्या मिसराच्या तोंडात ’सही हैच्या जागी ये बहुत गलत है’ आल्त.एवढ्यात आमच्या जगतापनं मोठ्या आवाजात सुरु केलं मेहेरबान गुलदान फुलदान … यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. अक्षांश 19ओ 26’ ते 20ओ 42’ उत्तर, व रेखांश 77ओ18’ ते 79ओ 98’ पूर्व. याच्या उत्तर दिशेला – वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा, पूर्व दिशेला – चंद्रपूर जिल्हा, दक्षिण दिशेला – आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हा पश्चिम दिशेला – हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ 13,584 चौ.कि.मी. आहे. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ख्याती आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.मोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य. या जिल्ह्याने लोकनायक अणे यांच्यासारखे नररत्न भारताला दिले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहून राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे वसंतराव नाईक हेदेखील याच जिल्ह्यातले होते.

जगतापचं बोलणं संपजेस्तोर काई काई लोकांना फेसबुकवरची पोस्ट व्हॉटसअपवर आलेली दिसली त्यात एका मोठ्या मराठी डिरेक्टरला यवतमाळ कुठे आहे हा प्रश्न पडलता. मी त्याची पोष्ट वाचलो तसं मलाही एक पडला पाकातल्या गुलाबजामाला कसला गंध असतो का ? याचं उत्तर माहीत असलं तर प्लिज द्या नायतर मला निव्वळ भाबडाय! म्हणून सोडून द्या. कारण भारतात माहिती नसनं हा काय अक्षम्य गुन्हा नाही. त्यामुळ असं उगंच बसल्याजागून ट्रोल करू नका.या क्षणी त्या डिरेक्टरला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जगताप दिऊलालता. गाडीनं आता जगतापच्या स्टेशनचा पुकारा केला.म्हणून जगतापचं उत्तर थांबलं अन त्येनं घाईघाईनं बॅग डब्बा सावडत दार गाठलं. नेहमी होतंय तसं आता ही बी चर्चा थंडावलती.विषय बदललते. पन माझं स्टेशन ईपर्यंत मला राहून राहून वाट्लालतं ’मायच्यान या बारचं संमेलन होण्याआधीच पोचलंय… आता इथून कुठवर जातंय देखना पडिंगा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -