घरफिचर्सनिवडणूक आयोगाची आचारसंहिता ही 'लाचार' आहे - नवाब मलिक

निवडणूक आयोगाची आचारसंहिता ही ‘लाचार’ आहे – नवाब मलिक

Subscribe

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माय महानगरचा विशेष कार्यक्रम 'खुल्लम खुल्ला'मध्ये भेट दिली. या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याची चर्चा असली तरीही विरोधकांना तसं वाटतं नाही. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात खरे आव्हान ठरू शकतो असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हनणे आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची काय भुमिका असणार आहे याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी “माय महानगरच्या” खुल्लम खुल्ला या विशेष कार्यक्रमाला भेट दिली. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची मलिक यांनी प्रखरतेने उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर गायकवाड यांनी केले. भाजपचा प्रचारावर निशाना साधत निवडणूक आयोगाची आचार संहिता ”लाचार” झाली असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हे मोठे कलाकार आहेत असे म्हणून त्यांनी मोदींवर निशाना साधला आहे.

नरेंद्र मोदी सर्वात मोठे कलाकार

निवडणुकीच्या तोंडावर टिव्हीवर कितीही आकडे दाखवले किंवा सोशल मीडियावर कितीही प्रचार केला तरी लोकांना वास्तव्य माहिती आहे. लोकांच्या मनात परिवर्तन आहे. भाजपने लोकांना मागील निवडणुकीत दिलेली आश्वासन अजून पूर्ण झाली नसल्याने लोकांमध्ये चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे कलाकार आहेत. लोकांनी लिहून दिलेली स्क्रीप्ट ते वाचून भाषण करतात हे लोकांना समजले आहे. या निवणडणुकीत त्यांचा प्रचार कितीही तगडा असला तरीही राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार नाही. पुरावे न दाखवता लोकांना बदनाम करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकार करत आहेत. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर मोदींची भूमिका बदलली आहे. आमच्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले नाहीत हे लोकांना महिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कौल राष्ट्रवादीकडेच असणार आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी आणि शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रात भाजपसमोर राष्ट्रवादी हे एक मोठं आव्हान आहे. यामुळे भाजपने आता व्यक्तीगत टीका करण्यास सुरुवात केली आहे. पवार साहेब व्यक्तीगत क्षत्रुत्व कधीही मानत नाही. विचारांमध्ये आमचे मतभेद होऊ शकतात मात्र त्यामुळे पवार साहेब व्यक्तीगत टीका करत नाही. मोदींचे राजकारण हे व्यक्तिगत असते मात्र पवार साहेबांचे राजकारण हे कधीच व्यक्तिगत नसते. सरकार कोणाचेही असो मात्र ते जनतेसाठी आहे. जनतेवर अत्याचार करणारे सरकार टीकू शकत नाही. पवार साहेब किंवा आम्ही नरेंद्र मोदींना कधी क्षत्रू मानत नाही. यामुळे व्यक्तीगत टीका करणे आम्हाला जमत नाही.

- Advertisement -

भाजपच्या चुका दिसून येत नाहीत

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना कोडिंत धरण्याचा प्रयत्न केला होता. केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांनी माफी मागितली होती. केलेल्या चुकीची माफी राष्ट्रवादीचे नेते खुल्या मनाने मागतात. मात्र भाजपचे नेते चुका करून देखील त्याची माफी मागत नाही. नरेंद्र मोदींनी अनेकदा आपल्या भाषणात चुका केल्या आहेत. या चुकांना लपवण्यात येते. पंतप्रधानांना भाषणासाठी स्क्रीप्ट लिहून देण्यात येते. ही स्क्रीप्ट वाचून नरेंद्र मोदी भाषण करतात. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी चुकतात. १.२५ कोटी ऐवजी १२५ कोटींचा उल्लेख मोदींनी केला आहे. मोदींना खरोखर आकडेवारी माहिती नसते. पंतप्रधानांना धड निट वाचता येत नाही. त्यामुळे पंतप्रधांनी जनतेला आश्वासन दिलेली आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत होतो. मोदींच्या अशा आश्वासनांना जनता बळी पडणार नाही.

पुलवामाची चर्चा काशासाठी?

निवडणूक जिंकण्यासाठी भाजप विविध पद्धतीचा अवलंब करते आहे. हिंदूत्वाचा मुद्दा, पुलवामा हल्ला या मुद्द्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. पुलवामा येथील हल्ल्यात देशाचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा येथील हल्ला हा सर्वात मोठा हल्ला माणला जातो. पुलवामाच्या घटनेबाबत वारंवार या निवडणुकीत चर्चा होत आहे. या हल्ल्यात भाजपची काय भूमिका आहे ही स्पष्ट होत नाही. पुलवामा हल्ल्यामागे जबाबदारी कोणाची आहे. ही जवाबदारी अजूनही निश्चित करण्यात आली नाही. २००८ मध्ये ज्यावेळी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी आम्ही चुकी स्विकारली होती. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता. दहशतवादाला संपवणाऱ्या मोदी सरकारच्या काळात तीन मोठे दहशतवादी हल्ले झाले होते. पठाणकोट, उरी आणि पुलवामा हल्ल्यामागचा जवाबदार कोण आहे. या घटनेनंतर कोणत्या भाजप मंत्र्याने राजीनामा दिला होता. मागच्या पाच वर्षे भाजप सरकार आहे. याच पाच वर्षांमध्ये दहशतवादी हल्ले वाढले यामुळे देशातील जवान शहिद झाले. मागील काही वर्षांमध्ये दहशतवादी हल्ले सहापट वाढले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आईला नरेंद्र मोदी साड्या पाठवतात आहे. नवाज शरीफ यांच्यासोबत मोदी बिर्यानी खातात आहे केक खातात आणि देशात येऊन पाकिस्तान विरोधी घोषणा करतात. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर कोणतीही चर्चा करणार नसतानाही भारत-पाकिस्तानदरम्यान चार बैठका झाल्या. जेव्हा अभिनंदला पाकिस्तानमध्ये पकडले त्यावेळी समझौता एक्सप्रेस थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानने केली. मात्र ३ मार्च रोजी याच गाडीची सुरुवात मोदींनी केली. भाजप राजद्रोहाचा कायद्याचा दुरुपयोग करत होती यामुळे काँग्रेसने हा कायदा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुद्यावरून भाजप सरकार काँग्रेसवरच बोट उचलते आहे.

आरोप सिद्ध न करता लावले आरोप

भाजप सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून घेत आहे. छगन भुजबळ यांना टार्गेट करण्यात आले. ईडीचा वापर करून छगन भुजबळ यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आले. भुजबळ यांच्यावरील आरोप न्ययालयात सिद्ध झाले नाही. त्यांना खोट्या आरोपखाली शिक्षा करण्यात आली होती. त्यांचे नाव बदनाम व्हावे यासाठी महाराष्ट्र सदन घोटाळा उकरून काढला. महाराष्ट्र सदन प्रकरणी कोणताही घोटाळा झाला नव्हता. न्यायालयाने ही आरोप सिद्ध झाला नसल्याचा अहवाल सरकार समोर ठेवला आहे. खोटे आरोप लावून पक्षाला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. लोकांच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. मात्र राफेल प्रकरणी सरकारची भूमिका वारंवार बदलत गेली. राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाला असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर चौकशीमध्ये कागदपत्रे हरवल्याचे सांगण्यात आले होते. खोलात चौकशीनंतर या कागदपत्रांची झेरॉक्स हरवल्याचे सांगण्यात येत होते. राफेल खरेदीबद्दलचे सत्य अजूनही लोकांसमोर आलेले नाही. पंकजा मुंडे यांनी चिकी घोटाळा केला मात्र त्यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांनीच केली.

सर्वात भ्रष्ठ राज्याचे मुख्यमंत्री

मुंबईचा डाकू महानगर पालिकेमध्ये चोर आहे असे म्हणत नवाब मलिक यांनी शिवसेनेवर टीका केली. मलिक म्हणाले की,’पालिकेमध्ये अनेक घोटाळे होतात. काळ्या यादीतील कंत्राटदारांकडून काम करून घेतल्या जात असल्यामुळे लोकांना पालिकेने केलेल्या कामांचा फायदा होत नाही. याची तक्रार तरी कोणाला करावी?  लोकायुक्ताकडे तक्रार करून दोषींवर कारवाई होत नाही. दोषींची पाठराखण करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात भ्रष्ठ आहेत. घोटाळे करणाऱ्यांवर हे सरकार कारवाई करत नाही. यामुळे सरकारच्या कामावर आता जनतेचा विश्वास उडला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या दोन आकडी असणार आहे. येत्या निवडणुक १२ ते १६ राष्ट्रवादीचे खासदार निवडून येणार आहेत.’

निवडणूक आयोग लाचार

या देशाचे निवडणुकीत आचारसंहितेचा भंग अनेकदा भाजपकडून करण्यात आला. मात्र निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास उदासीन दिसत आहे. निवडणूक आयोगाची आचारसंहिता ही ‘लाचार’ आहे. केंद्रीय भाजप मंत्री नितीन गडकरी नेहेमी सांगतात जितकेपण वाल्या आहे त्यांना भाजपमध्ये बोलवा भाजप त्यांना वाल्मिकी बनवेल. यामुळे आता भाजप हा फक्त गुंडांचा पक्ष बनला आहे. याचेच उदाहरण काल आपण सर्वांनी जळगावमध्ये बघितले. या गुंडाचा फटका राष्ट्रवादीला बसणार नाही. राष्ट्रवादीमध्ये लोक येतात जातात मात्र जाणाऱ्यांनी राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. काही लोकांना सत्तेची सवय झाली असते त्यामुळे ही लोक पक्ष सोडून जातात. मात्र अशा प्रकारची भूमिका घेणे हे चांगले आहे. पक्षात राहून पक्षाला दगा फटगा देण्याव्यतिरीक्त बाहेर राहून लढणे हा योग्य निर्णय आहे. मात्र सत्तेची सवय झालेल्यांना सत्तेतून काढण्याची भूमिका जनता करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -