घरफिचर्सआता दिवस उजाडला होता

आता दिवस उजाडला होता

Subscribe

'मा अस साबरीन'ला यश मिळत असतानाच मी नवं नाटक लिहिलं, ‘अथ मनुस जगन हं’!  अनेक संकटं, अडचणी पाठीवर घेऊन आलेलं हे नाटक, लेखक, दिग्दर्शक, नटांपासून नाटकाच्या लहान-सहान घटकांसाठी नाट्यशाळा होती. अपूर्व असा आनंद या नाटकाने मिळवून दिला.

‘मा अस साबरीन’ला यश मिळत असतानाच मी नवं नाटक लिहिलं, ‘अथ मनुस जगन हं’!  अनेक संकटं, अडचणी पाठीवर घेऊन आलेलं हे नाटक, लेखक, दिग्दर्शक, नटांपासून नाटकाच्या लहान-सहान घटकांसाठी नाट्यशाळा होती. अपूर्व असा आनंद या नाटकाने मिळवून दिला. आम्ही कसलाही गाजावाजा न करता, ‘अथ मनुस..’ ने प्राथमिक फेरीपासून हवा करायला सुरुवात केली होती. अंतिम फेरीच्या प्रयोगासाठी रवींद्र नाट्यमंदिरासमोर तोबा गर्दी झाली होती. नेहमी बंद ठेवण्यार्या बाल्कनीची तिकिटंसुद्धा विक्रीला काढावी लागली. आसनांच्या मधल्या आणि दोन्ही बाजूच्या गॅंगवेजमध्ये अंगाला अंग खेटून प्रेक्षक उभे होते. प्रेक्षकांच्या रेट्याने रविंद्रच्या मुख्य दाराची काचही तडकली.

नाटकाचा प्रयोग- ते एक जागेपणी पाहिलेलं स्वप्न होतं.  आमच्याशी काहीही ओळखदेख नसलेला सिनेनाट्य अभिनेता छोटू सावंत, परीक्षकांपैकी राम जाधवांना म्हणाला, “राम, सरळ मान्य कर की, आपण स्पर्धेमध्ये इतकी नाटकं केली, पण असं नाटक कधीही करू शकलो नाही. हे नाटक जर अंतिमला पहिलं आलं नाही, तर मी रविंद्रसमोर उपोषणाला बसेन, एवढं लक्षात ठेव!” तेव्हा निकाल शेवटच्या दिवशी, प्रेक्षकांसमोरच जाहीर होत असंत. कमलाकर सोनटक्केंनी पहिल्या नाटकाचं नाव जाहीर करण्यापूर्वी प्रेक्षकांना विचारलं आणि एकच घोष उठला, “अथ मनुस..”

- Advertisement -

यातून विश्वासाला, कष्टांना अर्थ मिळाला. प्रतिभावान प्रकाशयोजनाकार गिरीधर मोरेचा या नाटकातला सूर्योदय अजून आठवतो आहे. टेकडीच्या पायर्यांवरून पायउतार होत, रंगमंच उजळवून टाकणारी गिरी मोरेची जादुगिरी मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. माझ्याही रंगमंचीय कारकीर्दीचा सूर्योदय या नाटकातून होत होता. रानवाट संपली नव्हती, पण आता दिवस उजाडला होता.’


–  प्र. ल. मयेकर, दिवंगत नाटककार
   (संकलन – आभास आनंद) 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -