घरफिचर्समराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू

मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू

Subscribe

मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज जन्मदिन. २९ जून १८७१ रोजी विदर्भातील अकोल्यात श्रीपाद कृष्णांचा जन्म झाला. कोल्हटकरांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. कोल्हटकर लिखित विनोदी लेखन सुदाम्याच्या पोह्यांनी त्याकाळी अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी श्रीपाद कृष्णांना आपलं गुरू मानलं होतं. विनोदवीर कोल्हटकर नाटककार म्हणूनही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी एकूण १२ नाटकं लिहिली. यामध्ये वीरतनय (१८९६), मूक नायक (१९०१), गुप्तमंजूषा (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९०८), वधूपरीक्षा (१९१४), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (१९२३), सहचारिणी (१९१८), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही त्यांची गाजलेली नाटकं होत. या नाटकांद्वारे त्यांनी स्त्रीशिक्षण, मद्यपान, प्रीतिविवाह, केशवपन, उपहास, पुनर्विवाह, भ्रृणहत्या असे सामाजिक विषय आणून त्यामध्ये असलेल्या सुधारणेची गरज कोल्हटकरांनी आपल्या लेखनातून मांडली.

मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज जन्मदिन. २९ जून १८७१ रोजी विदर्भातील अकोल्यात श्रीपाद कृष्णांचा जन्म झाला. कोल्हटकरांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. लहानपणी श्रीपाद कृष्ण वडिलांबरोबर नाटक पहायला जात. त्यामुळे त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली. इयत्ता पाचवीत असतानाच श्रीपाद कृष्णांनी ‘सुखमालिका’ नावाचे नाटक लिहिले होते. १० वी पर्यंतचे शिक्षण अकोल्यात पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हटकरांनी पुणे गाठले. तिथे डेक्कन कॉलेजमध्ये श्रीपाद कृष्णांनी प्रवेश घेतला. तेथे त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कोल्हटकरांनी नाटकांचे समीक्षण लिहिण्यास सुरुवात केली.

विक्रम शशिकला या नाटकावर कोल्हटकरांनी लिहिलेली समीक्षा विविधज्ञानविस्तार या मासिकात प्रसिद्ध झाली होती. श्रीपाद कृष्णांनी १८९१ मध्ये पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला. बीएचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलएलबीच्या शिक्षणाला प्रारंभ केला. १८९७ मध्ये एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यावर कोल्हटकरांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. वकिली व्यवसाय करत असतानाच श्रीपाद कृष्णांनी लिखाण सुरू केले. या काळात त्यांनी विविध साहित्य निर्मिती केली. १८९२-१९०२ या काळात त्यांनी समीक्षणात्मक दीर्घ लेख लिहिले. हे समीक्षणात्मक लेख लिहीत असताना त्यांना प्रचंड विनोद सुचत. त्यामुळे पुढील काळात त्यांनी स्वतंत्र विनोदी लेखनाला सुरुवात केली. १९०२ मध्ये कोल्हटकरांनी साक्षीदार नावाचा पहिला विनोदी निबंध लिहिला. त्यांनी विनोदी लेखनासाठी निवडलेली सुदामा, बंडूनाना आणि पांडूतात्या ही पात्रं प्रचंड गाजली.

- Advertisement -

कोल्हटकर लिखित विनोदी लेखन सुदाम्याच्या पोह्यांनी त्याकाळी अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी श्रीपाद कृष्णांना आपलं गुरू मानलं होतं. विनोदवीर कोल्हटकर नाटककार म्हणूनही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी एकूण १२ नाटकं लिहिली. यामध्ये वीरतनय (१८९६), मूक नायक (१९०१), गुप्तमंजूषा (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९०८), वधूपरीक्षा (१९१४), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (१९२३), सहचारिणी (१९१८), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही त्यांची गाजलेली नाटकं होत. या नाटकांद्वारे त्यांनी स्त्रीशिक्षण, मद्यपान, प्रीतिविवाह, केशवपन, उपहास, पुनर्विवाह, भ्रृणहत्या असे सामाजिक विषय आणून त्यामध्ये असलेल्या सुधारणेची गरज कोल्हटकरांनी आपल्या लेखनातून मांडली. कोल्हटकरांच्या नाटकांनी मराठी नाटकाला दिशा दिली.

नाटकांप्रमाणेच श्रीपाद कृष्णांनी कविता आणि कादंबर्‍यासुद्धा लिहिल्या. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) या कादंबर्‍या कोल्हटकरांनी लिहिल्या. त्याचप्रमाणे श्रीपाद कृष्णांनी लिहिलेला गीतोपायन हा कवितासंग्रह तसेच त्यांनी लिहिलेले आत्मवृत्त आणि काही कथा खूप प्रसिद्ध आहेत. या सर्व लेखनामध्ये वाचकांसह लेखक, साहित्यिकांना सदैव स्मरणात राहील ते म्हणजे कोल्हटकर लिखित सुदाम्याचे पोहे. सुदाम्याचे पोहे वाचकाला, साहित्यप्रेमींना केवळ हसवत नाहीत तर विचार करायला भाग पाडतात. सुदाम्यांच्या पोह्यातून कोल्हटकरांनी आपल्या पुरोगामी विचारातून सामाजिक सुधारणांची गरज अधोरेखित केली.

- Advertisement -

पुणे येथील १९२२ सालच्या दुसर्‍या कविता संमेलनाचे कोल्हटकर अध्यक्ष होते. १९२३ मध्ये पुण्यात भरलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही कोल्हटकरांनी भूषविले. पुस्तक परीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनातील भाषणे, अभ्यासलेख यांद्वारे कोल्हटकरांनी विविध वाडमयीन प्रश्नांना वाचा फोडली. बहू असोत सुंदर संपन्न ही महा! प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा… हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर रचित महाराष्ट्राचे गौरवगीत आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विशेष स्थान टिकवून आहे. अशा या आद्य विनोदवीर, नाटककार, समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे १ जून १९३४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -