घरफिचर्सपाचवी पास अवलिया ३ हजार विद्यार्थ्यांची चालवतो शाळा

पाचवी पास अवलिया ३ हजार विद्यार्थ्यांची चालवतो शाळा

Subscribe

८४ वर्षे वयाच्या अण्णांचे शिक्षण केवळ पाचवी पास आहे. मात्र त्यांनी हातात घेतलेला शिक्षणाचा वसा मोठ्या अधिकाऱ्यांनाही लाजवणारा आहे. त्यांनी सुरु केलेल्या शाळेचे विद्यार्थी एकापेक्षा एक सरस ठरत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली धडपड आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरली आहे.

स्वतःला आलेल्या कटु अनुभवामुळे गरीब वर्गातील विद्यार्थ्याला अत्यंत अल्प दरात चांगले शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी शाळा उभा केली. आज त्याच मराठी शाळेत तब्बल तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कधीकाळी १४ विद्यार्थ्यांपासून या शाळेची सुरुवात १९८५ ला झाली होती. मात्र याच शाळेचे विद्यार्थी एकापेक्षा एक सरस ठरत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली धडपड आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरली आहे. अण्णासाहेब जाधव अस या अवलियाचे नाव असून आज त्यांचे वय ८४ वर्ष आहे. या वयातही ते शाळेत ठाण मांडून असतात. अण्णांचे शिक्षण केवळ पाचवी पास आहे. मात्र त्यांनी हातात घेतलेला शिक्षणाचा वसा मोठ्या अधिकाऱ्यांनाही लाजवणारा आहे.

annasaheb jedhaw
अण्णासाहेब जाधव

संस्थेची मुहूर्तमेढ

अण्णासाहेब जाधव यांनी अवघ्या १४ व्या वर्षी बॉईज आर्मीमध्ये स्वतःला रुजवून घेतले. तिथे त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी एस.आर.पी, पोलीस, एअरफोर्स अशा ठिकाणी शासकीय नोकरी केली. असा प्रवास सुरू असताना अण्णांना पुण्यात यायचे होते. त्यामुळे त्यांनी एका नामांकीत कंपनीत काम सुरू केले. त्यांना एका पोलीस अधिकाऱ्याने ‘तू इंडस्ट्रीयल कुस्तीमध्ये सलग चार वर्षे चॅम्पियनशिपचा किताब जिंकून दाखव’, असे म्हटले. त्यांनी तसा पराक्रम करून दाखवला. त्याच नामांकीत कंपनीत अण्णा हे वरिष्ठ होते. परंतु अण्णांना डावलून कनिष्ठ कर्मचाऱ्याला बढती दिली. याचा जाब अण्णांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारला असता तुम्ही पाचवी पास आहात तो बारावी पास आहे, असे उत्तर अधिकाऱ्याने दिले. आयुष्यात शिक्षण किती महत्वाचे आहे हे अण्णांच्या लक्षात आले. त्यांनी आपण शिक्षण घेतले नसले तरी गरीब आणि होतकरू मुलांना शिक्षण देण्याचा निश्चय केला आणि श्री शिव छत्रपती शिवाजीराजे विद्यालयाचा जन्म झाला. शिक्षण कमी तिथे नोकरीची नाही हमी, हा अनुभव अण्णांना आला आणि तिथेच अण्णांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे अण्णांची ही शाळा राज्यासाठी नव्हे तर देशासाठी रोलमॉडेल बनली आहे.

- Advertisement -

असा आहे शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख

१० जून १९८५ रोजी केवळ १४ विद्यार्थ्यांवर पिंपरी-चिंचवडमध्ये ही शाळा सुरू करण्यात आली. तब्बल ३ हजार विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. १०० जणांचा कर्मचारी वर्ग आहे. या शाळेला सरकारकडून अनुदान मिळते. शाळेत गणित, भूगोल, इंग्रजी विषयांची प्रयोगशाळा आहे. ही मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेत केवळ पुस्तकी नाही तर प्रात्यक्षिकातून धडे दिले जातात. यंदा दहावीच्या २२३ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी २०३ विध्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. त्यातील ७७ विध्यार्थ्यांना तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर उर्वरित विध्यार्थ्यांनी फस्ट क्लास मिळवला आहे.


कृष्णा पांचाळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -