घरफिचर्सप्रवासी भारतीय दिन

प्रवासी भारतीय दिन

Subscribe

भारतामध्ये मोठ्यासंख्येने लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये गेलेले आहे. त्यातील बरेच भारतीय तिथेच स्थायिक झालेले आहेत. या भारतीयांनी या देशांमध्ये राहताना आपली प्रगती करून घेतलीच, पण त्याचसोबत ते राहत असलेल्या देशांच्या विकासामध्ये मौलिक योगदान दिले आहे. अशा जगभरात पसरलेल्या अनिवासी भारतीयांना आपला मूळ देश असलेल्या भारताशी जोडून घेण्यासाठी एक नवा विचार पुढे आला. त्यातूनच प्रवासी भारतीय दिन या संकल्पनेचा जन्म झाला. भारत सरकारकडून दरवर्षी ९ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. पहिला प्रवासी भारतीय दिवस ९ ते ११ जानेवारी या कालावधीत २००३ साली साजरा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पनेतून या दिवसाची सुरूवात करण्यात आली. आपल्या देशातून अन्य देशात गेलेल्या भारतीय लोकांनी आपल्या मूळ भूमीशी आणि संस्कृतीशी जोडले जावे, त्यांच्याशी असलेले संबंध अधिक दृढ व्हावेत, हा या मागील हेतू होता.

प्रवासी भारतीय दिनी विदेशात राहून विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणार्‍या भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनात भारताविषयी काय भावना आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताने आणखी काय करायला हवे, भारत आणि इतर देश यांच्यामध्ये काय समान धागे आहेत, अशा अनेक गोष्टींचे वैचारिक आदान प्रदान व्हावे, त्यासाठी हे प्रवासी दिन हे व्यासपीठ आहे. यामध्ये विशेषत: तरुण वर्गाला अनिवासी भारतीयांकडून मार्गदर्शन केले जाते. विदेशातील नव्या संंधींबद्दल यांना माहिती मिळते. अनिवासी भारतायींच्या माध्यमातून भारतात नवी व्यावसायिक गुंतवणूक आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातो.

- Advertisement -

प्रवासी भारतीय दिन सुरू करण्याचे श्रेय लक्ष्मीमल सिंघवी समितीला जाते. भारत सरकारकडून प्रवासी भारतीय पुरस्कार दिला जातो. विदेशात उत्तम कामगिरी करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. भारतीय लोक विदेशात मोठ्या संख्येने स्थायिक होत आहेत. आता जग हे आधुनिक वाहतूक आणि दूरसंपर्क यंत्रणांनी जोडले गेले आहे. असे असतानाच भारतात अजून बर्‍याच पायाभूत सुविधांची गरज आहे. भारत खेड्यांचा देश आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही खेडोपाडी वसलेली आहे. त्या सगळ्यांपर्यंत अजून बर्‍याच पायाभूत सुविधा पोहोचण्याची गरज आहे.

भारताचे पंतप्रधान जेव्हा विदेशी दौर्‍यावर जातात, तेव्हा तेथील भारतीयांना भेटत असतात. नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा अनिवासी भारतीय आणि भारत यांच्यामध्ये जास्तीत जास्त संबंध येण्यासाठी तसेच विदेशातील भारतीयांना भारताशी जोडण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला. त्यातून हाऊडी मोदी यासारख्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातून मोदींनी अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांना प्रभावीत केले होेेते. मोदींना पंतप्रधान झाल्यानंतर जगातील अनेक देशांचे दौरे केले. त्यांनी तिथे राहणार्‍या भारतीयांचे मोठे मेळावे घेतले. त्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -