घरफिचर्सफोटोग्राफीचे प्रशिक्षण !

फोटोग्राफीचे प्रशिक्षण !

Subscribe

आज पैसे नसले तरीसुद्धा कॅमेरा विकत मिळतो. क्रेडिट कार्ड, कर्जाच्या सुलभ हप्त्यात आपल्या आवडीचे यंत्र घरपोच मिळते. अशा परिस्थितीत केवळ ते यंत्र वापरता येणे व कर्जाचा हप्ता भरणे हा एकच उद्देश असतो. फोटोग्राफी ही कला आहे आणि या कलेचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. यापेक्षा, ‘जो बिकता है वो बनता है’, अशी धारणा झालेली आहे. कला ही कधीही गरज म्हणून साकारली तर त्यातील आत्मा हरवलेला असतो.

रोज सकाळी येणारे वर्तमानपत्र पुरातन काळात फक्त बातम्यांनी भरलेले असायचे. कॅमेरा आला आणि प्रत्येक क्षण जपणे आणि छापणे सोयीचे झाले. वर्तमानपत्रात मुखपृष्ठावर येणारा फोटो महत्वाचा झाला. सर्व प्रसारमाध्यमांत आणि जाहिरातीतून फोटो हा अविभाज्य भाग झाला. आज दृश्य माध्यमातून शिक्षण देणे कसे लाभदायक ठरले ते पहातच आहोत. शाळेत चित्रकला हा विषय शिकवला जातोय, पण त्याच्या आधाराने विकसित होणारी फोटोग्राफी का नाही ही माझी खंत नेहमीच राहील.

अगदी मॉडर्न शैलीत (abstract) चित्र काढणे असो वा साधे विषय निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र शिक्षण घेऊनच चांगले चित्रकार घडतात. काही थोडेच जन्माला कलाकार म्हणून येतात. कॅमेरा 100 टक्के वास्तव टिपत असतो तर चित्रकार फक्त स्वतःचं जग टिपतो. तो स्वतःला त्यात किती ओततो यावर चित्राचा कस ठरतो नाहीतर ती प्रतिकृती वाटते. एवढं माहीत असताना सतत आपण कॉपी तर करत नाही ना असा प्रश्न स्वतःच्या मनाला वारंवार विचारला जातो. रेघोट्या मारतच आपल्या बालपणात रंग भरू लागतो. रेषांना आकार देऊन त्यातून भावविभोर चित्र निर्मिती करतो चित्रकार आपल्या कल्पनाशक्तीला वापरून.

- Advertisement -

पूर्वी रोलचे कॅमेरे होते, काढलेले फोटो धूणे (डेव्हलप) करणे या सगळ्या प्रकारात आपल्याला रोल खरेदी करण्यासाठी भांडवल उपलब्ध असावे लागत होते. प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयोग हाच मार्ग होता. फोटोग्राफी शिकवण्याची मानसिकताच नव्हती तेव्हाही आणी आताही. प्रत्येक शाळेचे संस्कार वेगळे असतात आणि नियम पण. डिजिटल युगात गुगलच्या जाळ्यात सर्व काही सहज उपलब्ध आहे, असा भास निर्माण करण्यात तंत्रज्ञान यशस्वी झालेले आहे.

आज पैसे नसले तरीसुद्धा कॅमेरा विकत मिळतो. क्रेडिट कार्ड, कर्जाच्या सुलभ हप्त्यात आपल्या आवडीचे यंत्र घरपोच मिळते. अशा परिस्थितीत केवळ ते यंत्र वापरता येणे व कर्जाचा हप्ता भरणे हा एकच उद्देश असतो. फोटोग्राफी ही कला आहे आणि या कलेचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे यापेक्षा, जो बिकता है वो बनता है, अशी धारणा झालेली आहे. कला ही कधीही गरज म्हणून साकारली तर त्यातील आत्मा हरवलेला असतो. कलात्मक फोटोग्राफी शिकणं आणि समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे याची जाणीव स्वतःला होणे गरजेचे आहे. या शिक्षणात केवळ तांत्रिक माहिती बरोबर कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे. केवळ तांत्रिकदृष्ठ्या योग्य फोटो काढायला येणे येथेच ही विद्या प्राप्त झाली असे समजून अपुर्‍या प्रशिक्षणाच्या जोरावर या क्षेत्रात काम करणे म्हणजेच ज्यांच्यासाठी आपण फोटो काढतो त्यांची नकळतपणे केलेली फसवणूक आहे.

- Advertisement -

अनुभव मिळावा या उद्देशाने मिळेल त्या मानधनात काम करणे हेही कला समजून घ्यायलाच कमी पडत आहेत. आपल्या फोटोंचा कलात्मक दर्जा कसा वाढेल हे समजले तर चांगले मानधन आपसुकच मिळेल. औद्योगिक विकास केवळ मागणी तसा पुरवठा असा न होता मागणी उभी करण्याने होत असतो. उत्तम गायकाला छान प्रतिसाद मिळण्यासाठी श्रोते रसिक असावे लागतात. ही रसिकता शिक्षणातून येत असते. कॅमेरा ऑटोमोडवर वापरणारेच जास्त आहेत. मोबाईलवर फोटोग्राफी करणारे तर प्रत्येक घरात 2/3 असतातच. पूर्वीतर घरातील ज्येष्ठ कोणी गेलं तर त्याचा फोटो लग्नाच्या ग्रूप फोटोतून शोधावा लागत असे. आजही काही जण, छोटा फोटो मोठा करून द्याल का? असे विचारत येतात. अशा परिस्थितीपासून आज आपण उठता बसता फोटो काढण्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. या digital युगात फोटो, व्हिडिओ शिवाय आयुष्याचा विचार करणे दुरापास्त झालेले आहे.

फोटो म्हणजे असतो एक भूतकाळ. घडून गेलेल्या क्षणांची आठवण…memories..सुखाच्या व दुखाःच्या सुद्धा. प्रत्येक क्षेत्रात आज आपले वेगळेपण ठसठशीत दिसावे म्हणून चढाओढ असणारच, पण ती चव वाढवणार्‍या मिठासारखी असावी लागते. कुठलीही कला लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत असते ते आपले काम आणि त्याची प्रसिद्धी. फोटो हे एक असे प्रभावी माध्यम आहे की, त्याचा उपयोग जाहिरातीत करावा लागणे हे क्रमप्राप्तच असते. कलात्मक फोटोग्राफी करण्याची मानसिकता वाढली तरच या क्षेत्रात आपण ठामपणे उभे राहू शकतो. आपल्या कामाचा दर्जा वाढवणे महत्वाचे आहे, जर चांगले मानधन मिळाले तरच औद्योगिक विकास होतो. विचारांना उभारी मिळते, अजून चांगले काम करायचा उत्साह वाढतो. कुठलेही प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत असते. जाहिरात या जाहिरातीमध्ये महत्वाचा असतो तो फोटो आणी त्याची कॅचलाईन. ते एका फोटोच्या माध्यमातून जर विनाभाषा पोचवता आले तर कामगिरी फत्ते होते.

कलात्मक फोटो कामगिरी करण्यासाठी कमीतकमी शालेय शिक्षण असले किंवा काही कारणाने शाळा पातळीवरच शिक्षण सुटलेय तरीही निराश न होता या प्रशिक्षणाच्या जोरावर तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. निरनिराळ्या विषयात प्राविण्य मिळवून आपले क्षेत्र निश्चित करू शकता. चला योग्य पद्धतीने प्रशिक्षित होऊया, कैद करूया दही दिशा आपल्या कॅमेरात.

-अर्चना देशपांडे जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -