घरफिचर्सराजकीय गाण्यांच्या भेंड्या

राजकीय गाण्यांच्या भेंड्या

Subscribe

राजकीय वादविवादात लोकशाहीतील खेळीमेळी आणि मैत्री कायम रहावी, राजकीय विरोधात कटुता येऊ नये, म्हणून वर्षा राजदरबारातील हिरवळीवर नेत्यांचा गीतगायनाचा कार्यक्रम आहे. तिकिटं सत्तेत असलेल्यांच्या कमळाचं चिन्ह असलेल्या स्थानिक कार्यालयात मिळतील, शाखेवर चौकशी करू नये, उमेदवारी, उपमुख्यमंत्रीपद, जागावाटपातील तडजोडींच्या सेनाधिपतींच्या युवराजांना पहिलं गाणं सुचलंय…

युवराज- पापा कहते है बडा नाम करेगा…बेटा हमारा ऐसा काम करेगा…मगर ये तो…है मेरी मंझिल कहा.

- Advertisement -

नवी मुंबईतील श्रीगणेश-हम छोड चले है मेहफील को याद आए कभी तो मत रोना.

मातोंडकरांची मिली- नाम गुम जाएगा…चेहरा ये बदल जाएगा..मेरी आवाजही पहचान है

- Advertisement -

प्रकाशराव-हम थे जिनके सहारे…वो हुये ना हमारे

इम्तियाज औरंगाबादकर- राजा को रानी से प्यार हो गया..दिल जिगर दोनो घायल हुवे.. तिरे नजर दिल के पार हो गया.

कोकणातला स्वाभिमान- ये क्या हुवा…कैसे हुवा, कब हुवा, क्यूं हुवा, जब हुवा, तब हुवा…छोडो ये ना सोचो.

धाकटे स्वाभिमान- (युवराजांकडे पाहून) चेहरा क्या देखतो हो…मौसम पल में बदल जाएगा.

मोठे स्वाभिमान- गर तुम भुला ना दोगे..सपने ये सच ही होंगे, हम तुम जुदा ना होंगे.

जय जितेंद्र- गुमनाम है कोई…बदनाम है कोई.. किसको खबर कौन है वो, अंजान है कोई.

एकनाथी भारूड- इक दिन बिक जाएगा माटी के मोल..जग में रह जाएगे प्यारे तेरे बोल.

पप्पूंची गायनकला- लंबी जुदाई….

कोकणातील स्वाभिमान- इक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नही.

देव इंद्र- हाल कैसा है जनाब का…(त्यांचं गाणं सुरू असताना, कोकणच्या दिशेकडून अचानक ‘क्या खयाल है आपका’ पुढची ओळ ऐकवली जाते)

राजू शेट्टी – कडकनाथ कोंबडा हातात घेऊन…हातात घेऊन, कोंबडी पळाली…भर भर उडाली..थर थर कराया लागली.

नरेंद्र भाईं इंदर – (हे गाणं बोलत नाहीत, सेनाधिपतींकडे पाहून राजकुमार आवाजात डायलॉग बोलतात) लात..बात फिर जरुरत पडे तो मुलाकात.

सेनाधिपती- तेरे घर सामने….इक घर बनाऊंगा.

देव इंद्र- होणार….पुन्हा नाणार होणार….(सेनाधिपती…अरे हे कोणतं गाणं…अखेरचा शब्द ग होता आम्ही गायलेला, आणि हिंदी कार्यक्रम असताना मध्येच मराठी गाणं कसं काय..?…मराठी शब्द ऐकताच मैफीलीत आलेले नांदगावातील बाळकृष्ण उभे राहातात)

नांदगावातील बाळकृष्ण- साय खातो मी मराठीच्या दुधाची कुणाचे उंबरठे झिजवू कशाला?

नरेंद्र भाई ईंदर – अरे पन ये तो कविता छे…

नांदगावातील बाळकृष्ण- (मराठी भाषेला विरोध करणार्‍या नरेंद्राचा निषेध असो…नरेंद्रांचे नाव घेताच देव इंद्रांच्या भुवया उंचावतात, एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी होते, हा गोंधळ सुरू असताना सातारचे राजे उठून सगळ्यांना शांत करतात आणि नरेंद भाई इंदरांच्या वाक्यातील शेवटचे अक्षर ‘छे’ पकडून त्यांच गाणं सुरू होतं )
राजे- छोडना छोडना छोडना रे …छोडना भेजा फोडना रे..

(त्यावर शीघ्र कवी आठल्ये ताबडतोब रचना करतात) राज्यांनी छोडू नये कमळ…राज्यांनी छोडू नये कमळ…कुणाच्या पोटात कितीही होवो मळमळ….(आता ळ पासून यापुढे मराठी आणि हिंदीतही गाणंच सुरू होत नसल्याने सगळे एकमेकांचे चेहरे पाहतात आणि ळ पासून कोण गाणं सुरू करतंय याची बराच वेळ वाट पाहून त्यानंतर अंताक्षरी आवरती घेतली जाते आणि सगळ्यांनाच विजयी म्हणून घोषित केले जातं)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -