घरफिचर्सपुण्यातील प्रसिद्ध हॉटेल पूर्णब्रम्ह

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल पूर्णब्रम्ह

Subscribe

खाद्यप्रेमीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, पुणे, ठाणे या भागातील काही खास ठिकाणे. याबद्दल जाणून घेण्यसाठी वाचा संपूर्ण माहिती... तसेच उपासाच्या पदार्थाची पाककृती हि नक्की वाचा.

गुरु सावंत

सोशल मीडियावर या हॉटेलशी ओळख झाली. मराठी वडापाव ते महाराष्ट्रीयन थाळीपर्यंत उत्तम दर्जा आणि चव देणारी अनेक हॉटेल्स आणि खानावळी पुण्यात आहेत, एखादा अपवाद वगळला तर जवळजवळ सगळ्याच ठिकाणी अनेकदा जेवण झालंय.महाराष्ट्रीयन जेवण त्यात शाकाहारातील काही नावाजलेली जुनी पुण्यातील हॉटेल्स जी खरोखरच अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे पुणेकरांना सेवा देत आहेत. पूर्णब्रह्म म्हणजे पुण्याबाहेर लोकप्रिय झालेला ब्रॅण्ड, आता या स्पर्धेत आलाय. नावाजलेले मराठी अन्नपदार्थाच हॉटेल, चिकाटीने मेहनत करून आणि प्रस्थापितांच्या स्पर्धेत स्वत:च्या ब्रॅण्डची ओळख निर्माण करून देणारी सेलिब्रिटी मालकीण या सुरुवातीला समोर दिसणार्‍या दोन जमेच्या बाजू आहेत.
काही कामानिमित्त सातारा रोडवर गेलो आणि समोरच पूर्णब्रम्ह दिसलं. म्हटलं आलोच आहोत तर पान टाकूनच जाऊ म्हणून हॉटेलात शिरलो.शाकाहारी खास करून कोकणस्थ पद्धतीचं जेवण म्हणजे माझी दुखरी नस . कधीही आणि कितीही खाऊ शकतो पण हल्ली प्रस्थापित मराठी हॉटेलात अळूच फदफद/बिरडयाची उसळ या नावाखाली वाढल्या जाणार्‍या भाज्या मेनुकार्डात वाचूनच अंगावर काटा येतो. सुदैवाने पूर्णब्रम्हच्या बोर्डावर असे धक्कादायक काहीही लिहिलेलं नव्हते. त्यामुळे ऑर्डर प्लेस करायची हिंमत सुद्धा केलीच.

- Advertisement -

साधारणपणे वीस ते पंचवीस कार पार्क करता येतील इतक पार्किंग/दर्जेदार मराठी ऍमबियन्स(लग्नाच्या पंगतीत बसल्यासारखा सरळ नाही) खूप आउटस्टॅण्डिंग म्हणता येणार नाही. पण एखाद्या अमराठी व्यक्तीला सुद्धा सहज रुचेल इतकी छान चव, कल्पकतेने नवीन जनरेशनला भावेल असा डिजाइन्ड मेनू (रॉ मटेरियल क्वालिटी आणि क्वांटिटी),अत्यंत डिसेंट सोनाराच्या दुकानात असतो तसा स्टाफ आणि बॅकग्राऊंडला छान मराठी अभंग. यापेक्षा जास्त माझ्या अपेक्षा नसल्यामुळे शाकाहारी थाळीत पूर्णब्रम्ह कायमच झालं.पुण्यातील इतर शाकाहारी थाळी मिळणार्‍या ठिकाणापेक्षा काही गोष्टी इथे संपूर्ण वेगळ्या आहेत ज्याची चर्चा होणे आवश्यक वाटत म्हणून त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.१) इथे वाढदिवसाच्या दिवशी ग्राहकाचे औक्षण केले जाते. उत्सवमूर्तीच्या पानात अगदी स्टॅण्डर्ड साईझची पुरणपोळी भेट म्हणून वाढली जाते. शिवाय बिलावर ५ टक्के सूट सुद्धा दिली जाते. २) दररोज मेन्यू संपूर्ण बदलला जातो (न्यु रिजन ,न्यु मेनू) ही थीम चालवली जाते. ३) लहान मुले/गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकरीता अत्यंत वेगळा मेन्यू आणि गरज वाटल्यास खास सर्विस दिली जाते.आपली मराठी संस्कृती आणि खाद्यपरंपरा याची सांगड घालण्याचा पुरेपूर प्रयत्न हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे थाळीच्या नावाचा उल्लेख करणे सुद्धा गरजेचे वाटते. (नावाप्रमाणे बदलणारा मेन्यू)

सोमवार – श्री शिव थाळी
मंगळवार – श्री स्वामी समर्थ थाळी
बुधवार – श्री विठाई थाळी
गुरुवार – श्री दत्तगुरु थाळी
शुक्रवार – श्री बालाजी थाळी
शनिवार – श्री गजानन महाराज थाळी
रविवार – श्री महालक्ष्मी थाळी

- Advertisement -

एकूण काय तर मराठी अन्नपदार्थांना सातासमुद्रापार घेऊन जायचे ब्रॅण्ड माइंडेड मराठी हॉटेल मालकीणीचे स्वप्न अपुरे राहण्याचं एकही कारण मला तरी दिसल नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेऊन लिहिलेली तळटीप: मराठी थाळी खायला गेल्यावर साइड डिश म्हणून ताटात फाफडा,मिर्च्या, चटण्या आणि ढोकळा न वाढल्याबद्दल कौतुक.

पूर्णब्रम्ह
६८० बिबवेवाड़ी
सातारा रोड, नेक्सा शोरूमच्या पुढे , पुणे- ३७


ठाण्याचा तंदूर चहा

– प्रशांत गायकवाड

तीनहात नाका ठाणे येथून ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे सर्व्हिस रोड जातो. शुक्रवारी तेथे एका ट्रॅव्हलच्या दुकानात चौकशीसाठी जात असताना अचानक मध्ये तंदूर चहा असा फलक असणार्‍या दुकानाकडे लक्ष गेले. पुण्यातील तंदूर चहाबाबत फेसबुकवर वाचले असल्याने तो कधी पितो, असे झाले होते आणि योगायोगाने ठाण्यात ती संधी चालून आली, त्यामुळे आनंदात होतो. ट्रॅव्हल्समध्ये चौकशी केल्यानंतर तंदूर चहाच्या दुकानात शिरलो. एक तंदूर चहा अशी ऑर्डर केली. मटके तंदूर भट्टीमध्ये गरम होत होते. अत्यंत गरम झालेले ते मटके काढले गेले, एका तबकात मटके ठेवून त्यावर चहा ओतला गेला, चहा फेसाळला आणि चिनी मातीच्या भांड्यात पिण्यास देण्यात आला. अप्रतीम असा हटके चहा होता. चवीने प्यायलो. तेथे असणार्‍या स्वप्नील यादव या तरुणाला विचारले असता, हे दुकान 5 ऑगस्ट ला सुरू झाले, असे तो म्हणाला. त्याने आणि युवराज लोकरेने हे दुकान सुरू केले. नोकरी करून दोघेही हा व्यवसाय सांभाळत आहेत. दुकानाचे नाव mh महाराष्ट्र असे ठेवले गेले आहे. या ठिकाणी बन मस्का, मॅगी, फ्रेंच फ्राईज, सँडविच असे तरुणाईला आवडणारे पदार्थही उपलब्ध आहेत. दुकान सुरू झाल्यापासून तंदूर

चहाची मागणी वाढत असल्याचे स्वप्नीलने सांगितले. मग त्याला बेस्ट ऑफ लक म्हणून परतीचा मार्ग धरला.


राजगिर्‍याचा डोसा

 

प्रत्येक उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. दरवेळी काहीतरी वेगळे हवे असते. त्यासाठी हा चटकदार आणि हेल्दी राजगिर्‍याचा डोसा नक्की करून पाहा.

साहित्य –

दोन वाट्या राजगिर्‍याचे पीठ
२-३ मिरच्या
मीठ- चविनुसार
एक टिस्पून जिरे
एक उकडलेले रताळे
तूप – आवडीनुसार
पाणी किंवा ताक

कृती –

मिरच्या, मीठ व जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.

उकडलेले रताळे कुस्करून राजगिर्‍याच्या पीठात मिसळावे.

यात मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालावे.

पाणी किंवा ताक मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावे.

नॉनस्टिक पॅनवर तूप टाकून डोसे तयार करावेत.

तयार झालेले स्वादिष्ट डोसे दह्याबरोबर सर्व्ह करावेत.

तुमच्या आवडीनुसार या डोशामध्ये भाजलेले शेंगदाणे व बटाटा मिसळू शकता. राजगिर्‍याच्या पीठाबरोबर

डोशामध्ये साबुदाण्याचे पीठ घातल्यासही पौष्टीक डोसा तयार होतो. डोशाबरोबर दह्याऐवजी खोबर्‍याची चटणीही चविष्ट लागते.
——————————————————————————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -