रमझानविषयी तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

Mumbai
Ramazan
रमजान मुबारक

दरवर्षी साधारण जूनमध्ये येणारा रमझान यावर्षी एक महिना लवकर आला आहे. इस्लाममधील हा महिना सर्वात पवित्र समजला जातो. या महिन्यात मुस्लीम लोक महिनाभर उपवास करतात. कोणत्याही वाईट गोष्टी या कालावधीमध्ये करू नये असे त्यांच्याकडे शिकवले जाते. रमजान ईदला त्यांचा हा महिनाभराचा उपवास संपतो. ईद म्हणजे नक्की काय तर ईद-उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. रमजान नक्की का साजरा करण्यात येतो, त्याचं नक्की काय महत्त्व आहे, यंदा रमजान कधीपासून सुरु झाला आणि ईद कधी, खाण्याचे कोणकोणते प्रकार उपवास सोडताना मुस्लीम बांधव खातात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत –

रमजान म्हणजे नक्की काय?

यंदा १७ मे रोजी पहाटे ३.३३ मिनिटांनी सहेरी असून इफ्तार सायंकाळी ६.५७ मिनिटांनी आहे. रोजा करणारे मुस्लीम लोक पहाटे आणि सायंकाळी अशा दोनच वेळेस खातात. दरवर्षी हा साधारण जून महिन्यात येतो मात्र यावेळी एक महिना आधी रमजान सुरु झाला आहे. काही जण पाणीदेखील पित नाहीत. कधी रमजान २५ दिवसांचा येतो तर कधी ३० दिवसांचा. यावर्षी ईद १६ जून रोजी असून ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. सलग ३० दिवसांच्या उपवासामध्ये साधारणपणे १२ तासांसाठी अन्नपाणी वर्ज्य केले जाते. रमजान महिन्याचे पहिले १० दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील १० दिवस भक्तीचे आणि शेवटचे १० दिवस कुराण पठणासाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. रमजानचा मुख्य संदेश आनंदी राहा असा आहे.

खाण्याचे प्रकार

१) सुकामेवा – बरेच लोक खजूर, सुकामेवा, शेवया, दूध यांबरोबरच चिकन, अंडी यांसारखे पदार्थ या काळात प्रामुख्याने खातात.
२) फिरनी – फिरनी अर्थात तांदळाची खीर. यामध्ये अक्रोड फिरनी, आंबा फिरनी, काजू फिरनी, गुलाब फिरनी, बदाम फिरनी, नारळ फिरनी, केळ्याची फिरनी, द्राक्ष फिरनी असे विविध फिरनीचे प्रकार आहेत.
३) मालपुवा – मालपुवा आणि रबडी हा प्रकारदेखील रमजानचा उपवास सोडताना बरेच लोक आवडीने खातात.
४) बिर्याणी – रमजानच्या काळात उपवास सोडताना सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार म्हणजे बिर्याणी. चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, तवा बिर्याणी, दम बिर्याणी असे विविध प्रकार या बिर्याणीचे असून याचा स्वाद अप्रतिम असतो.
५) कबाब – बिर्याणीबरोबरच वेगवेगळ्या कबाबची चव चाखली जाते. यामध्ये सीख कबाब, बोटी कबाब, मुर्ग मलाई कबाब, हरियाली चिकन कबाब, खिमा कबाब, फिश कबाब असे विविध मसालेदार कबाबचा आनंद घेतला जातो.

रमजान ईद

ईदच्या दिवशी मुस्लीम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आपल्या नातेवाईकांना शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते. शिरखुर्मा हा या दिवसाचा महत्त्वाचा पदार्थ आहे. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here