घरफिचर्सप्रतिसाद

प्रतिसाद

Subscribe

क्रिकेटचे फाजिल महत्त्व कमी करा
आपल्या हिंदुस्थानात क्रिकेटचे महत्त्च इतके आहे की जणू या देशात अन्य कुठला खेळ खेळलाच जात नाही. तहान, भूक विसरून लहान-मोठे तासंतास दूरचित्रवाणीसंचासमोर बसलेले पाहिल्यानंतर माझ्यासारखीला तर खरंच संताप येतो. कामधंदा सोडून क्रिकेटचे वेड जपणारी माणसे पाहिल्यानंतर यांना हसावे की रडावे, तेच समजत नाही. खेळणारे क्रिकेटपटू रग्गड पैसा घेतात. त्यापैकी काहीजण क्रिकेटच्या जिवावर इतके गबर झालेत की त्यांच्या पुढील दहा पिढ्या अक्षरशः बसून खातील. क्रिकेटपटू एका सामन्यात खोर्‍याने पैसा ओढणार आणि आम्ही मात्र कामाला दांडी मारून, अभ्यासाकडे पाठ फिरवून त्यांच्यामागे लागणार हे काही योग्य वाटत नाही. प्रगत देश क्रिकेटसारखा वेळखाऊ खेळ दूर ठेवून आहेत. आम्हाला मात्र या क्रिकेटचे आणि क्रिकेटपटूंचे कोण प्रेम. बरं या क्रिकेटपटूंचे देशासाठी काय हो असे मोठे योगदान, की आम्ही यांच्या मागे-मागे करीत रहावे? आयपीएल झाले, आता विश्वचषकाचे वारे वाहत आहे. गल्ला भरण्यासाठी क्रीडा वाहिन्या टपलेल्या आहेतच. आपल्यासारखे वेडे प्रेक्षक असल्यानंतर यांचे गल्ले भरणारच की! क्रिकेटचे फाजिल महत्त्च जेव्हा कमी होईल तेव्हाच कुठे हा देश प्रगती करेल, असे माझे स्पष्ट मत आहे.
अमिता चांदविणकर, नागोठणे, जि. रायगड

आयोग खरंच ध्रुतराष्ट्र बनला
यावेळची लोकसभा निवडणूक विविध कारणांनी गाजली. यात सत्ताधार्‍यांकडून व्यक्त झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांची जशी कारणीभूत होती तशी निवडणूक आयोगाची डोळेझाकही तितकीच जबाबदार होती. ‘आपलं महानगर’ने यावर धृतराष्ट्र आणि निवडणूक आयोग, या संपादकीयमधून चांगलीच चंपी काढली हे बरेच झाले. आयोग इतका बायस असावा, हे खरे तर आपल्या लोकशाहीचे अवमुल्यन आहे. कोणीही यावे आणि मारून जावे, असा प्रकार आजच्या आयोगाने केला. इतका की एका आयुक्ताला पटले नाही तर त्याच्या मताची केवळ नोंद करून घ्यायची, हा काही होयब्याचा खेळ आहे, काय? ज्या आयुक्ताने नकारार्थी मत नोंदवल्यावर त्याच्या मताची चिकित्सा व्हायला हवी. या चिकित्तेनंतरच काय तो निर्णय आयोगाने घेतला पाहिजे. दुर्देवाने दोन आयुक्त सत्ताधार्‍यांची तळी उचलून धरत होते आणि एक आयुक्त काय तो सत्यवचनाप्रमाणे आपले मत नोंदवत होते, हे व्यवस्थेला पटणारे नाही. अशामुळे आयोगावरील विश्वास उडेल आणि तो चिंतेचा विषय ठरेल, हे सांगायला नको.
समीर लवेकर शिवाजीपार्क, दादर, मुंबई

- Advertisement -

दादरमधील एसटी थांबे मोकळे कधी होणार
मुंबईचे मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ज्या दादर टीटीच्या एसटी स्थानकाचा उल्लेख होतो ते स्थानक सध्या फेरीवाल्यांमुळे नकोसे बनले आहे. दादरच्या पोस्टाशेजारी असलेल्या एसटीच्या थांब्यावरून कोकणसह, सातारा, सांगली, पुणे, शिर्डी अशा राज्यभर जाणार्‍या बसेस सुटत असतात. एसटीचा हा थांबा बसेसना अपुरा पडत असताना खाजगी बसेसचा जाच हा काही संपता संपेना, असा बनला आहे. आता त्यात फेरीवाल्यांची भर पडली आहे. या फुटपाथवर दोन परप्रांतीय फेरीवाल्यांनी बस थांबा पुरता काबीज केला आहे. महापालिकेच्या संबंधितांनी याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. प्रवाशांच्या दृष्टीने तातडीने फेरीवाला उच्चाटन व्हायला हवे.
समीर कोंडवीलकर चेंबूर, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -