घरफिचर्सप्रतिसाद...

प्रतिसाद…

Subscribe

एक्झिटवाल्यांवर कारवाई हवी
देशात होणार्‍या निवडणुकांचा निकालपूर्व अंदाज व्यक्त करण्याची पध्दत अत्यंत चुकीची आणि मतदारांच्या एकूणच इच्छाशक्तीला मारणारी आहे. मतदारांनी काय तो कौल दिला असताना त्यांच्या मताची किंमत व्यक्त करणारे एक्झिट पोलवाले कोण? खरे तर या पोलवाल्यांच्या मुसक्या आवळून आयोगाने त्यांना धडा शिकवला पाहिजे. लोकांच्या मनात काय आहे, हे सांगण्याच्या अधिकाराचा गैरफायदा घेत घोडेबाजाराला चालना देण्याची अघोरी कृती पोलवाले करत आहेत, हे आचारसंहिता लागू करणार्‍या आयोगाला ठावूक नाही? की ठावूक असूनही ते नेहमीप्रमाणे डोळेझाक करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या येऊ घातलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नको ते अंदाज देऊन पोलवाले सट्टाबाजाराला चालना देत आहेत. हा म्हणजे मटकेबाजीचाच प्रकार आहे, असल्या जुगाराला चालना देणार्‍या कृतीवर आयोगाने तत्काळ बंदी घातली पाहिजे. केवळ बंदी घालून उपयोग नाही, जे असला प्रकार करतात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. -रघुवीर पडते,सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

यालाच म्हणतात सत्तेचा माज
लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळ येत असताना व्यक्त झालेल्या अंदाजावर स्वार होत भाजपने काँग्रेसप्रणित राजवट असलेल्या मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील सत्ता उलथवून टाकण्याचा खेळ सुरू केला आहे. आम्ही नाही तर कोणीच नाही, ही भाजपची खेळी खूपच आगलावी म्हणता येईल. लोकसभा आणि राज्यातल्या सरकारचा अर्थाअर्थी संबंध नाही,पण केवळ त्या राज्यात अधिकच्या जागा मिळतील, या आशेवर तिथल्या सरकारखाली सुरूंग लावण्याची भाजपची नीती ही सत्तेचा माज काय असतो, हे दाखवणारी आहे. देशाने असा प्रकार कधीच पाहिला नाही. भाजपचे दाखवायचे दात काय असतात तेच यातून स्पष्ट दिसते. या पक्षाने शुचिर्भूततेचा कितीही आव आणला तरी पक्षातले नेते हे या नीतीबाहेरचाच खेळ खेळत आहेत. लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रकार केवळ घातकच नाही तर व्यवस्थेला कब्जात ठेवणारा आहे. हे थांबले नाही तर देशात अराजक परिस्थिती निर्माण होईल, हे सांगायला नको.
-सविनय घारे ,कांजूरमार्ग, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -