घरफिचर्ससारांशआपटा : बांधावरील सोनं

आपटा : बांधावरील सोनं

Subscribe

अकोले तालुक्यातील बहिरवाडी शाळेने एक नवीन उपक्रम करून एक आदर्श घालून दिला आहे. या शाळेतील विद्यार्थी दर वर्षी दसर्‍यापर्यंत साधारण एक फुट वाढलेली आपट्याची रोपे तयार करतात. आपट्याच्या पानाऐंवजी ही रोपे एकमेकांना दिली जातात. शेवटी ही रोपे गावशिवारात लावतात. अशा अनोख्या पद्धतीने दसरा सण साजरा करतात. पारंपारिक समजुतीप्रमाणे आपट्याला सोनं म्हटलं जातं. आपट्याचे झाड खरं तर शेतीतील, बांधावरील सोनं आहे. आपटा जिथे लावला जातो त्या ठिकाणची माती भुसभुशीत बनते. सुपीक बनते. मातीचा कस वाढतो.

दसर्‍याच्या दिवशी बाबांचं पाहिलं काम, शेतीत जाऊन सोनं घेऊन यायचं. हट्ट करून आम्हीही त्यांच्या सोबत शेतीत जायचो. सोनं म्हणून तूर व कापसाची एक दोन फांदी, ज्वारीचे एक दोन धाटे, शमी किंवा सौंदडीचे एखादी छोटी फांदी, आपट्याची एखादी छोटी फांदी एकत्र करून वासनवेलीने एक छोटी पेंढी बाधायचे. पेंढी बांधतांना सौंदडीचे काटे टोचणार नाहीत असं बरोबर आतच्या बाजूला घेऊन पेंढी बांधायची. ह्या सगळ्या वनस्पती गोळा करतांना बाबा एका एका पाल्याचे महत्व, उपयोग सांगायचे. ही पेंढी घेऊन घरी देव्हार्‍यात ठेवायची. ही पेंढी, त्यातल्या सर्व प्रकारची पाने आजच्या दिवशी सोनं समजली जायची. संध्याकाळी चार पाचवाजेच्या सुमारास सोनं म्हणजेच ह्या पेंढीमधून काही पाने गावाच्या हनुमान मंदिरात ठेवली जाते. मग हे सोनं गावातील सर्व जनांना दिलं जायचं. या निमित्ताने गावातील सर्वांशी भेटणं, त्यांच्या शेत शिवारातील पिकं कशी आहेत याची चर्चा होते. एक दहा पंधरा वर्षापूर्वी आजच्यासारखी विशेष सवलती, ऑफर, डिस्काऊंट्सचं जाहिरातबाजी तेव्हा नसायचं. सोने खरेदीचाही इतका बोलबाला नव्हता. शेतीमधील पिकं, बांधावरील झाडे ह्यांचीच जोपासना सोन्यासारखं केलं जायचं. आज दसर्‍यानिमित्त बांधावरील सोनं समजल्या जाणार्‍या आपट्याच्या झाडाबद्दल समजून घेऊया.

आपटा किंवा शिद हे एक महत्वाचे स्थानिक झाड आहे. हे झाड खूप मोठे न होणारे व वेडेवाकडे वाढणारे असते. आपट्याचे पाने दसर्‍याला सोनं म्हणून एकमेकांना दिले जातात. यामुळे आपटा बहुतेकांना माहीत असतो. अलीकडे अनेक जन कांचन व अंजनीचे पाने आपटा समजून एकमेकांना दिली जातात. शहर व महानगराच्या बाजारात आपट्याचे पाने विक्रीला असतात. दसर्‍याच्या आधीच्या दिवशी कांचन आणि अंजनी ह्या दोन्ही झाडांच्या पानांफांद्यांचे ढीग बाजारात दिसतात. दसर्‍याच्या दिवशी गावशिवारातील जवळपास सर्व आपट्याची झाडे बोडकी झालेली दिसतात. नवीन झाडांची लागवड फारसे होत आणि दर वर्षी अशा झाडांच्या फांद्या ओरबाडणे यातून ही झाडं धोक्यात येत आहेत.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील बहिरवाडी शाळेने एक नवीन उपक्रम करून एक आदर्श घालून दिला आहे. या शाळेतील विद्यार्थी दर वर्षी दसर्‍यापर्यंत साधारण एक फुट वाढलेली आपट्याची रोपे तयार करतात. आपट्याच्या पानाऐंवजी ही रोपे एकमेकांना दिली जातात. शेवटी ही रोपे गावशिवारात लावतात. अशा अनोख्या पद्धतीने दसरा सण साजरा करतात. पारंपारिक समजुतीप्रमाणे आपट्याला सोनं म्हटलं जातं. आपट्याचे झाड खरं तर शेतीतील, बांधावरील सोनं आहे. आपटा जिथे लावला जातो त्या ठिकाणची माती भुसभुशीत बनते. सुपीक बनते. मातीचा कस वाढतो. जमिनीतील खडक, दगड हे सर्व भेदून जमीन पोकळ करते. आपट्याच्या मुळावर गाठी असतात. आपट्याचे झाड हे द्विदलीय असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी असतात. हे गाठी जमीन सुपीक करण्यासाठी उपयुक्त असतात. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवण्याचे काम ह्या गाठी करतात. आपट्याचे हे महत्वपूर्ण गुणवैशिष्ठ्ये ध्यानात घेऊन संस्कृत भाषेत याला अश्मंतक व वनराज असे नाव दिले गेले असावे. आपट्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव बाहुनिया रेसिमोसा (Bauhinia racemosa) असे आहे. आपटा हे चिंच व बहावा या झाडाच्या कुळातील आहे.

आपट्याची पाने एकमेकाला जोडलेली असतात. ही पाने आतल्या बाजूने हिरवी व बाहेरच्या बाजूने भुरकट दिसतात. नोव्हेंबर महिन्यात खूप कमी काळासाठी पानगळ होते. डिसेंबरमध्ये लगेच पालवी सुरु होते. काही भागात फेब्रुवारी ते एप्रिल तर काही भागात मार्च ते जून या महिन्यात झाडाला फुलं येतात. फुलं एका काडी भोवती गुंफलेली असतात. देठाकडून टोकाकडे फुले उमलत जातात. जुलैमध्ये लागलेल्या शेंगा वर्षभर झाडावर असतात. आपट्याचे खोड हे झाड लहान असताना मातकट, फुरकट रंगाचा दिसतो. खोडावर आडवे भेगा असतात. काही काळानंतर या आडव्या भेगा जाऊन उभ्या भेगा तयार होतात. हा प्रकार खूप दुर्मीळ असतो. आपट्याच्या काही झाडांना थोडेफार बोथट काटेही असतात.

- Advertisement -

पानाचा रस हा अल्सरमध्ये किंवा लहान आतड्यामध्ये सूज येऊन जखम झाली असल्यास प्यायला दिली जाते. याशिवाय वेदना कमी करण्यासाठी देखील आपटा उपयुक्त आहे. आपट्याच्या मुळाचा चहा लठ्ठपणा कमी करण्यासाठी गुणकारी असतो. कोवळ्या फांद्याचे रस, जिरे व दूध एकत्रितपणे दिल्यास जुलाब थांबतात. आपट्याचे जोडलेले पानं शेळीसाठी उत्तम चारा असतो. टेंबूर्णीच्या पानाला पर्याय म्हणून आपट्याचे पाने बिडीसाठी वापरली जातात. म्हणूनच याचे इंग्रजी नावही ‘बिडी लीफ ट्री’ असे आहे. आपट्याचे लाकूड हे खूप टणक असल्यामुळे जाळण्यासाठी खूप उत्तम असते. मात्र आपटा जाळून जितके फायदे होतात त्यापेक्षा आपल्या शेतीच्या बांधावर उभा असलेला आपटा अधिक उपयुक्त असतो. या झाडाला एकाप्रकारचे धार्मिक वलय मिळाल्यामुळे अनेक भागात जाळण्याचे टाळले जाते. मात्र याच्या लाकडात उष्मांक जास्तीचे असते. वाळलेल्या फांद्या, कीड लागून किंवा अन्य कारणाने वाळलेली झाडे जाळण्यासाठी वापरायला काहीही हरकत नाही. आपट्याचे लाकूड जाळल्यावर जे राख तयार होते त्यात लोह, चुना, पोटॅश, सोडियम, गंधक, स्फुरद आदी रासायनिक संयुगे मिळतात.

भारत, श्रीलंका, चीन, इजिप्त व ब्राझील या देशातील लोकजीवनात आपट्यास विशेष महत्व आहे. खोडाच्या सालीमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे जखम भरून काढण्यासाठी त्याचा वापर केला जातो. झाडाचे तंतू, धागे (फायबर) खूप मजबूत असतात. यामुळे या लाकडापासून चांगल्या प्रतीचा कागद मिळू शकतो. दोरी बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. आपट्याचं निवड व्यावसायिक लागवडीसाठी केलं जाऊ शकते.

रोपवाटिका कसे करावी – आपट्याच्या शेंगा कठीण कवचाच्या असतात. शेंगे मधून बी काढून घ्यावी. शंभर ते दिडशे ग्राम वजनात साधारण एक हजार बिया असतात. उकळलेले पाणी घेऊन त्यात या बिया 24 तास भिजत ठेवावे. बियांचे वरील आवरण कठीण असल्यामुळे बिया रुजवून येण्यास वेळ लागतो. भिजलेल्या बियामधून रोपे लवकर रुजवून येतात. भिजलेल्या बिया रोपवाटिकेच्या पिशवीत साधारण एक इंच खोलवर रुजवावे. पिशवी सूर्यप्रकाश येईल अशा जागी ठेवावे. मातीत ओलावा राहील इतकेच पाणी टाकावे. साधारण तीन ते पाच दिवसात बिया रुजू लागतात. काही बिया मात्र पुढील काही आठवड्यापर्यंत वेळ घेऊ शकतात. साधारण 60-70 टक्के बिया उगवून येतात. उगलेली रोपे लहान असतानाच जमिनीत लावावे. मोठी झालेली रोपे दुसरीकडे लावल्यास जगण्याची शक्यता कमी असते. आपट्याची मुळे भिंतीत शिरून भेगा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो घराच्या भिंतीच्या जवळ ही झाडे लावायचे टाळावे. शेतीच्या बांधावर, माळरानावर, वनीकरणासाठी आपटा हे खूपच उपयुक्त झाड आहे. झाडाची सावली जेमतेम असल्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. रोपवाटिकेतून मिळवून किंवा स्वतः रोपे बनवून दसर्‍याला एक झाड आपल्या बांधावर नक्की लावा. सोनं होईल.

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एजुकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -