Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश विर्दभातील हुडहुडी संपतेय...

विर्दभातील हुडहुडी संपतेय…

Related Story

- Advertisement -
विर्दभातील थंडी पुर्वी सारखी राहिलेली नाहीत. 20 वर्षांपुर्वी विर्दभातील थंडी बहुचर्चित राहायची. मात्र आता विर्दभातील थंडीवर चर्चाचं होत नाही. त्यामागचे कारणही तसच आहे बदलत्या पर्यावरणामुळे ही समस्या उद्भवत आहे. सध्या गेल्या काही वर्षांत विर्दभातील नागरिकांना वेगळेच वातावरण अनुभवायला मिळत आहे. पावसाळ्यात उकाडा जाणवतो. तर थंडीच्या दिवसा कडाक्याची थंडी केव्हा आली. केव्हा गेली यांच्या पत्ताच लागत नाही. पुर्वी विर्दभातील पिकांसाठी फायदेशीर असलेली थंडी आता ती राहिलेली नाही. त्यामुळे विर्दभातील बळीराजा गेल्या काही वर्षांपासून चिंतेत पडला आहे.
विदर्भ हा वनसंपत्तीने आणि खनिजसंपत्तीने संपन्न असलेल्या प्रदेश आहे. येथील गर्द हिरव्या वनराईमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि अनेक वन्य पशु-पक्षी नैसर्गिक आढळतात. राज्यातील सर्व व्याघ्रप्रकल्प विदर्भातच आहे. तसेच दाट जंगले तसेच कोळसा आणि मॅगनीजच्या खाणी आहे. महाराष्ट्रातील थंडी आणि उन्हाळा सर्वाधिक विदर्भांच असते. मात्र गेल्या काही वर्षोंपासून थंडी पुर्वी सारखी जानवतं नाहीत. विदर्भांतील थंडीचा पारा कमी होत असल्याचे शेतकर्‍यांना मोठा फटका बसतो आहे. मला आठवते मी, सात ते आठ वर्षांच्या असताना शनिवारी आमची सकाळची शाळा असायची भल्या पहाटे आंघोळ करावी लागत होती. नाका तोडातून तेव्हा वाफा निघायच्या अंगात हुडहुडी भरायची, तेव्हा डोकायला लावायला खोबर्‍याचे तेल थंडीमुळे गाठायचे त्याला नितळ करण्यासाठी आम्हा शेकोटीचा आधारा घ्यावा लागत होता. इतकेच नव्हेतर तेल केसाला लावल्यानंतर शाळेत जातपर्यंत केसात खोबर्‍याचे तेल गोठायचे.मोराचा तुर्‍या सारखे डोक्यांवरचे  केसे उभे राहात होते. सकाळी 11 नंतर संपुर्ण तेल चेर्‍यावंर उतराचे अशीही विदर्भातील गावाकडची थंडी होती, मात्र आज तेवढी आक्रम थंडी दिसत नाही ते खोबर्‍याचे तेल सुध्दा दिसत नाही.
पुर्वी म्हणजे 1995 ते 2005 या कालावधीत विर्दभांत थंडी जोरात  राहायची. प्रत्येक घराबाहेर आणि कठ्यांवर शेकोटी असायची इतकेच नव्हेतर शाळेत सुध्दा शेकोटी लावल्या असायंच्या मात्र आता घराबाहेर आणि शाळे बाहेर असलेली शेकोटी अलीप्त झालेली दिसून येत आहे. पुर्वी विर्दभात थंडी जास्त असल्यामुळे शेतावर जाणारे शेतकरी आणि गुर चारायला जाणारे सांयकाळी 4 नंतर परत घरी यायचे. मात्र आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीत. आज विदर्भातील शेतकर्‍यांकडे असलेल्या पाळीव प्राण्याची  संख्या कमी झालेली. विर्दभातील गावं खेड्यांचे रुपांतर हळूहळू शहरीकरणात होत आहे. ज्याप्रमाणे विर्दभातील वातावरणात बदल येतो आहे.त्याप्रमाणे विर्दभातील शेतकर्‍यांच्या राहणी मानात बदल होतं आहे. पुर्वी विदर्भातील थंडीच्या आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक विदर्भाकडे येत होता. मात्र आता हा पर्यटक सुध्दा आता फक्त जंगसफारी करीता येतो.
विदर्भातील थंडी कमी जास्त असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठा प्रमाणात नुकसान होत आहे. हरभरा, तूर, ज्वारी,गहू या सारख्या पिकांला थंडीची गरजं असते. मात्र आता थंडी कमी पडत असल्याने या पिंकाना मोठा प्रमाणात फटका बसतो आहे.  गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्थेत असताना अचानक तापमानात झालेली वाढ या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने घातक आहे. तसेच   हरभर्‍यावरील घाटे अळीचा उपद्रव वाढतो, तर तुरीच्या शेंगा पोखरणार्‍या अळीची संख्या वाढत  आहे. त्यामुळे विदर्भातील बळीराज चिता वाढली आहे. त्यामुळे विर्दभातील हुडहुडी संपतेय का असा प्रश्न पडला आहे.
- Advertisement -