घरफिचर्ससारांशकोरोनाचा फिवर आणि पोर्नोग्राफीचा कहर !

कोरोनाचा फिवर आणि पोर्नोग्राफीचा कहर !

Subscribe

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात भारतात पोर्नोग्राफी पाहणार्‍यांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली. त्यातही चोकींग, ब्लिडींग, टॉर्चर या मथळ्याखालील हिंसक पॉर्नला अधिक मागणी होती. अशा प्रकारचे हिडीस पॉर्न बघण्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नईनंतर मुंबईकरांचा क्रमांक होता.  असेही  पॉर्नहबने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. सध्या जरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरी आजही पॉर्नला भारतात मोठी मागणी आहे. ही चिंतेची बाब असून मुलं घरात बसून जरी ऑनलाईन अभ्यास करत असल्याचं भासवत असली तरी पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांवर नजर ठेवण्याची वेळ आली आहे.

कोरोना आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊननं सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलंय. यादरम्यानच्या काळात चांगल्यापेक्षा वाईटच गोष्टी अधिक घडल्या. जगभरात अनेक उद्योगधंदे बंद झाले, लोक बेकार झाले. हजारो नागरिक देशोधडीला लागले. कोरोनाने अनेकांची जवळची माणसं हिरावून घेतली. घरोघरी बायकामुलांवर अत्याचार वाढले. यात हाणामारीपेक्षा लैंगिक अत्याचाराचे प्रमाणच अधिक होते. भारतात तर स्त्रियांवर लैंगिक अत्याचार जसे झाले तसेच ते बालकांवरही झाले. तर काही ठिकाणी मिसरूटही न फुटलेल्या पोरांनी लहान बहीण नाहीतर शेजारी पाजारी राहणार्‍या चिमुरड्या मुली व मुलांवर बलात्कार केल्याच्या अनेक भयंकर घटना या काळात घडल्या. खेळण्याच्या वयात मुलं एवढी हिंसक होण्यामागचं कारण लॉकडाऊनच्या काळात बरीच मुलं चाईल्ड पोर्नोग्राफीच्या आहारी गेली. त्यातूनच लैंगिक सुखाच्या उत्सुकतेपोटी त्यांनी कधी आपल्याच तर कधी आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलामुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. आजच्या तारखेला पुरोगामी व संस्कृतीची परंपरा व वारसा लाभलेला भारत देश पॉर्न बघणार्‍या देशांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. ही चिंताजनक बाब असून येणारा काळ हा मुलंच नाही तर पालकांसाठीही आव्हानात्मक असणार आहे.

यासंदर्भात नुकतीच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत माहितीही दिली आहे.  त्यानुसार  1 मार्च 2020 पासून लॉकडाऊन 4 च्या 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत चाइल्ड इंडिया फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित तब्बल  3 हजार 941 कॉल आले. तसेच  राष्ट्रीय बाल अधिकार
संरक्षण आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार  1 मार्च 2020 ते 18 सप्टेंबर 2020 पर्यंत महिला व बाल लैंगिक अत्याचाराच्या 13 हजार 244 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा हा आकडा धक्कादायक आहे.  हेल्पलाईनवर  येणारे बहुतेक कॉल हे अत्याचार झाल्यानंतर किंवा अत्याचाराच्या दूष्टचक्रात अडकलेल्या मुलांकडून किंवा त्यांना मदत करणार्‍या जवळील व्यक्तींकडून करण्यात आले आहेत. तर काही कॉल हे एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये घरगुती हिंसाचाराबरोबरच पतीकडून पत्नीवर, पित्याकडून मुलीवर तर कधी मुलावर, तर काही ठिकाणी शेजार्‍यांकडून सतत लैंगिक अत्याचार होत असल्याचे आहेत. लैंगिक अत्याचाराचा या वाढत्या आकड्याने महिला व बाल विकास मंत्रालयाची झोप उडाली आहे.
विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या या घटना घडल्या आहेत. या कालावधीत पालकांबरोबर मुलंही घरीच होती. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मुलंच नाही तर पालकही घराबाहेर पडू शकत नव्हते. यामुळे घरातील या कोंडमार्‍यातून विरंगुळा मिळावा म्हणून मुलांनी स्मार्टफोनमध्ये चाईल्ड पॉर्नबरोबरच अ‍ॅडल्ट पॉर्न बघण्यास सुरुवात केली. भारतात जवळपास 3,500 हजार पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही मुलंच नाही तर मोठी माणसही लॉकडाऊनच्या काळात व नंतरही मोबाईलवर इतर भाषिक पॉर्नफिल्मचा आनंद घेत असल्याची धक्कादायक माहिती स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आली. या पॉर्नफिल्म बघून अनावर होणार्‍या  लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्यांबरोबरच अल्पवयीन मुलांनीही अनेकांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. तर काही ठिकाणी आजही लैंगिक अत्याचाराचे हे सत्र अद्याप सुरू आहे.

- Advertisement -

   एकंदर भारतीय समाजव्यवस्था पाहता पालक मुलांबरोबर लैंगिकता या विषयावर मोकळेपणाने बोलत नाहीत. कारण आपल्याकडे त्याला असभ्य वर्तन असे संबोधले जाते. लैंगिकतेचे विषय हे पडद्याआड दबक्या आवाजात चर्चिले जातात.  परिणामी ज्या गोष्टी सहज डोळ्याने पाहता येत नाहीत, ज्यांच्याबद्दल उघड उघड बोलता येत नाही, त्या पाहण्याची, त्याच्याबद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी तरुण पिढी पॉर्नच्या आहारी जात आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात आजही शाळा कॉलेजेस बंद असून ऑनलाईन शाळा, कॉलेज, क्लासेस मात्र सुरू झाले आहेत. यामुळे मुलं घरीच असून त्यांचा बराच वेळ हा मोबाईल व इंटरनेट सर्फिंगमध्ये जातो. पण त्यांचा हा वेळ इतर  विषयांवर माहिती मिळवण्यापेक्षा पॉर्नसर्च करण्यात व पाहण्यातच जात आहे. यामुळेच लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक पॉर्नफिल्म
बघणार्‍या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची धक्कादायक माहिती इंडिया चाईल्ड प्रॉटेक्शन फंडने  एप्रिलमध्येच दिली होती. आजही थोड्या फार फरकाने तशीच परिस्थिती असून चाईल्ड पॉर्न, सेक्सी चाईल्ड, टीन सेक्स व्हिडीओज भारतात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बघितले जात आहेत.  21 मार्च ते 26 मार्च 2020 या दोन दिवसात ऑनलाईन पॉर्न बघणारे सर्वात जास्त ट्रॅफिक भारतातून होते. असेही जगातील सर्वात मोठी  पॉर्नाग्राफी असलेल्या पॉर्नहबने आपल्या डेटामध्ये म्हटले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात भारतात पोर्नोग्राफी पाहणार्‍यांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली. त्यातही चोकींग, ब्लिडींग, टॉर्चर या मथळ्याखालील हिंसक पॉर्नला अधिक मागणी होती. अशा प्रकारचे हिडीस पॉर्न बघण्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नईनंतर मुंबईकरांचा क्रमांक होता.  असेही  पॉर्नहबने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. सध्या जरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरी आजही पॉर्नला भारतात मोठी मागणी आहे. ही चिंतेची बाब असून मुलं घरात बसून जरी ऑनलाईन अभ्यास करत असल्याचं भासवत असली तरी पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांवर नजर ठेवण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

  भारतात पॉर्नला बंदी आहे. असे असतानाही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयच पोर्नोग्राफीच्या सर्वाधिक आहारी जात आहेत. बंदी घालण्यात आलेल्या पॉर्नसाईट चालवणार्‍यांनी दुसर्‍या नावाने व युआरएलने साईट्स सुरू केल्या करून कायद्याला चकवा दिला आहे. पण हे कृत्य राष्ट्रविरोधी असल्याने सरकारने तात्काळ यावर कारवाई करून पोर्नोग्राफीचे जाळ उद्ध्वस्त करायला हवे. कारण त्यातूनच आशियाई देशांमध्ये मानव तस्करीही वाढीस लागली असून हा र्‍हास थांबवणं हे कोरोना थांबवण्याएवढेच महत्वाचे आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -