घरफिचर्सशास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली

शास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली

Subscribe

गॅलिलियोचा आज स्मृतिदिन. गॅलिलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. गॅलिलिओच्या सात भावंडांपैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बर्‍याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्याने पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले.

गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.

- Advertisement -

एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक ‘ब्रेनवेव्ह’ आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किंवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला.‘दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो’ हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्याने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओने त्याचे ‘गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो ‘गॅलिलियोचा दिवा’ म्हणून ओळखला जातो.

१६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. टकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने ’गॅलेलिओज फिंगर’ नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे. 8 जानेवारी 1642 रोजी वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -