घरफिचर्सगरिबीचा अंधार दूर करण्यासाठी 'ती' रंगविते पणत्या

गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी ‘ती’ रंगविते पणत्या

Subscribe

पंढरपूर येथून सुमारे शंभरच्या पुढे आदिवासी पारधी समाजातील लोक, पणत्या कंदील विक्री करण्यासाठी ठाण्यात आलेले आहेत. यामध्ये दहा वर्षांची गुंजन काळे ही चिमुकली सुद्धा आपल्या भावासोबत आली आहे. अलका विठ्ठल चव्हाण या आजी बाई १५ वर्षांपासून ठाण्यात पणत्या विक्री करण्यासाठी येत आहेत. मागील तीन वर्षांपासून गुंजन आपल्या आत्या-आजी बरोबर ठाण्यात येत आहे. गुंजन सध्या पाचवीमध्ये शिकतेय. पंढरपूर येथील वाकरी गावात आई-वडील, मोठा भाऊ आणि बहीण असा गुंजनचा परिवार आहे.

काही कौटुंबिक कारणामुळे काही दिवसांपूर्वी आई सोडून गेली, अशी माहिती तिच्या आजीने दिली. संपूर्ण कुटुंब पंढरपूरला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. मोठ्या भावाचे तसेच बहिणीचे लग्न झालेले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडीलांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी गुंजन तीन वर्षांपासून ठाण्यात पणत्या विक्रीसाठी येते. उन्हामध्ये दिवसभर बसून १०० ते १५० मातीच्या पणत्या ती फेविकॉलचा वापर करून ब्रशने रंगवते. चंदेरी, सोनेरी तसेच विविध रंगानी पणत्या रंगवणारी गुंजन आपणास ठाणे स्टेशन बाहेर असलेल्या गोखले रोडवरील दुभाजकावर बसलेली दिसते.

- Advertisement -
small girl sell lamp
गुंजन आपल्या इतर छोट्या मैत्रिणींसोबत (फोटो – अमित मार्कंडे)

पणत्या छोटे कंदील विकून संपूर्ण कुटुंब दिवसाअखेरीस फक्त ७०० ते ८०० कमवितात. तिने रंगिवलेल्या पणत्यांची २० रु आणि ४० रु जोडीने विक्री होत आहे. परंतू त्यातही गिऱ्हाईक घासाघीस करतात, असे तिचा मोठा भाऊ जगदीश काळे यांनी सांगितले. दररोज किरकोळ पैसे मिळवून हे संपूर्ण कुटुंब कधी वडापाव खाऊन दिवस काढत फुटपाथवरच झोपतात.

“पूर्वी ठाण्यात रस्त्यावर जास्त कोणी पणत्या कंदील विक्री करण्यास येत नव्हते. आता स्थानिक लोकांनीही धंधा सुरु केल्यामुळे आमचा धंधा होत नाही”, असे तिच्या आजीने सांगितले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ७ नोव्हेंबरला संपूर्ण कुटुंब परत पंढरपूरला जाणार आहे. कडक उन्हामध्ये बसून रोजचे ७०० ते ८०० कमवून संपूर्ण १० दिवसामध्ये हे कुटुंब फक्त ८ हजार ते १० हजार कमवतात.

- Advertisement -
small girl selling lamp
छोटी गुंजन आपल्या आत्यासोबत (फोटो – अमित मार्कंडे)

शहरातील श्रीमंत घरातील मुली आई-वडिलांकडून भावाकडून महागडे कपडे, दागिने, मोबाईल खरेदी करून माॉलमध्ये शॉपिंग करताना आपण बघतो. परंतू गरिबीची झळ सोसून आई सोडून गेल्यावरही आपल्या वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी गुंजनची मेहनत पाहून डोळ्यात पाणी येते. गुंजन दिवसभर कडक उन्हात बसून, उन्हाचे तीव्र चटके सोसून, हाताला सोनेरी-चंदेरी रंग चिकटलेल्या अवस्थेत दिवसभर काम करून कधी उपाशी, कधी अर्धपोटी राहून दोन पैसे मिळविण्यासाठी धडपडत आहे. गुंजनच्या या मेहनतीला त्रिवार सलाम…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -