घरफिचर्सरुमालातल्या खाऊचा गोडवा

रुमालातल्या खाऊचा गोडवा

Subscribe

तिला चौथा महिना होता. काय झालं, कसं झालं तिला माहीत नव्हतं. तिचा बाप हातगाडी ओढणारा. ग्रँट रोडच्या एका टिंबर मार्टमध्ये लोखंडी सळ्या हातगाडीवरून ओढून मशीद बंदरातल्या कारखान्यात पोहचवण्याचं त्याचं काम होतं. रोज संध्याकाळी आठ वाजता तो हॉस्पिटलमध्ये येत होता. सोबत इराण्याच्या हॉटेलमधला चहा, दोन बटर आणि रुमालात बांधलेल्या खारका असा खाऊ तो आपल्या लेकीसाठी न चुकता आणायचा.

मुंबईतल्या एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या त्या मुलीचं वय अंदाजे १७ वर्षे असावं. मॅटर्निटी वॉर्डातल्या ओळीनं लावलेल्या बेडवरच्या एका कोपर्‍यात खास ठिकाणी तिला ठेवलं गेलं होतं. अधूनमधून पोलीस यायचे, डॉक्टरांशी बोलून निघून जायचे. एक महिला पोलीस शिपाई दिवसभर वॉर्डात तिच्यासाठी थांबलेली असायची. तिची ड्युटी संपली की दुसरी महिला कॉन्स्टेबल हजर…वॉर्डातल्या इतर बायका तिच्याविषयी दबक्या आवाजात चर्चा करत होत्या. पोलीस आले की त्यांचं बोलणं अचानक थांबत होतं. मग सगळे तिच्याकडे बघून ही इथं आणखी किती दिवस राहणार? असं एकमेकांना विचारायचे.

तिला चौथा महिना होता. काय झालं, कसं झालं तिला माहीत नव्हतं. तिचा बाप हातगाडी ओढणारा. ग्रँट रोडच्या एका टिंबर मार्टमध्ये लोखंडी सळ्या हातगाडीवरून ओढून मस्जिद बंदरातल्या कारखान्यात पोहचवण्याचं त्याचं काम होतं. रोज संध्याकाळी आठ वाजता तो हॉस्पिटलमध्ये येत होता. सोबत इराण्याच्या हॉटेलमधला चहा, दोन बटर आणि रुमालात बांधलेल्या खारका असा खाऊ तो आपल्या लेकीसाठी न चुकता आणायचा. सातव्या महिन्यात माझी केस थोडी क्रिटीकल झाल्यानं मीसुद्धा तिथंच अ‍ॅडमिट होते. त्याला विचारलं हे कसं काय? तो म्हणाला पता नही…इसकी माँ बचपनमें गुजर गयी, तबसे मैनेही इसको संभाला. हम लोग कुर्ला में रहते हैं. उसको पुछा तो बोल्ती है पता नही. काँच के कारखाने में काम पर जाती थी, उधर एक आदमी था…उसको चाचा बोलती थी…मैने पूछा तो बोली उसने कुछ खाने को या पिने को दिया था. उधर क्या हुवा उसको पता नही. मैने बाद में पुछा तो बोली…वो बोला शादी करेगा मेरे साथ. भिवंडी में घर खरीदा हैं। बोला उधर जा के रहेंगे. ऐसे बोल रहा था वो …एक कचकचीत शिवी हासडून तिचा बाप सांगत होता. हे सगळं ऐकायला खूप वेदनादायक होतं. पण तिच्यावर तर हा प्रसंग प्रत्यक्षात गुदरला होता. अब इसका क्या करोगे, माझा पुन्हा प्रश्न…थोडा थांबून तो म्हणाला. इस में इस ने क्या किया इसे तो उपरवालेने भेजा है…अब इसकी कोख में आ गया उस में उसकी क्या गलती ?

- Advertisement -

अभी ये इसकाही हुआ ना..? और डॉक्टर बोलते है…अभी इसे निकाल देंगे तो खतरा है? मेरी बेटी जिंदा तो है. जिसने ये काम किया वो भाग गया..पुलिस ढूंढ रही है अब पकडेगी उसको. त्याचं माझ्यासोबत बोलणं सुरू असताना तिनं बेडवरून अवघडलेल्या स्थितीतच आवाज दिला. इधर आवो बाबा. थकलेला बाप लगबगीनं गेला. रुमालातल्या खारका, काजू, मनुके काढले. दिवसभर कष्ट करून गोळा केेलेला हा मौल्यवान खजिना त्यानं कापडातून तिच्यापुढं ठेवला. त्यानं सोबत हातगाडीच्या बर्फावर मिळणारी दूधमलई आणली होती. इसको अच्छी लगती है..असं हसून बोलला. मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात वॉर्डात पोलीस आले. एका कागदावर तिच्या बापाकडून सही घेतली. त्यानं थरथरत्या हातानं आपलं नाव लिहिलं. त्या दोन पोलिसांनी आपसात काही गंभीर चर्चा केली आणि निघून गेले. थोड्या वेळेत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरनी काही औषधं तिच्या वडिलांना लिहून दिली आणि ते निघून गेले. तसा तो हतबल बाप वॉर्डातनं बाहेर पडला आणि ती मुलगी बेडवर पडून राहिली. त्या ठिकाणी इतरही महिला बाळंतपणासाठी अ‍ॅडमिट होत्या. दिवसभरात अनेक खुशखबर्‍या येत होत्या. लाडू, बर्फी भरवली जात होती. पण त्या हातगाडी ओढणार्‍या तिच्या बापानं आणलेल्या खाऊच्या खारकांचा गोडवा लोकांनी वाटलेल्या मिठाईपेक्षा तिच्यासाठी खचितच कमी नव्हता.


– दीपिका शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -