प्रतिकारशक्ती वाढवताना ‘ही’ काळजी नक्की घ्या!

mumbai

करोनाशी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घेताना या काही टिप्स

१. झोप प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची रोज ७ ते ८ तास झोप घ्यावी

२. आहारात विटामीन सी युक्त सिट्र्स फळे, लिंबू, मोसंबी, संत्रे, आवळा, टॉमेटो आदींचा समावेश करावा

३. नाश्यात मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरीचा समावेश करा

४. सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वासाठी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान करा.

५. रोजच्या आहारात एखादे फळ आणि भाज्या असायला हव्या.

६. आतड्यातील बॅक्टेरियांसाठी आहारात दही, ताकाचा समावेश करावा. पण दही, ताक रात्रीच्या जेवणात नको.

७. चहामध्ये अद्रक आणि जेवणात अधूनमधून लसणाचा वापर करा

८. ताण घेतल्याने प्रतिकाशक्तीवर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे भीतीच्या छायेत राहू नका

९. व्यायाम, योगा, प्राणायाम आदी व्यायाम रोज अर्धा तास तरी करा

१०. शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची. तहान लागल्यावर किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे.