घरफिचर्स‘थिएटर ऑफ रिलेवन्स’चा धगधगता प्रवास

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’चा धगधगता प्रवास

Subscribe

माय महानगरच्या ‘आपलं महानगर आणि मी’ या फेसबूक लाईव्ह कार्यक्रमात थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या टीमने सहभाग घेतला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’या नाट्यचळवळीचे दिग्दर्शक आणि लेखक मंजूल भारद्वाज यांच्यासह नाट्यकर्मी अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के यांनी यावेळी थिएटर ऑफ रिलेवन्सच्या काही नाटकांतील दृश्यांची झलक दाखवली.

नाटक हे मनोरंजनाचे एक अविभाज्य घटक आहे. परंतु, या मनोरंजनाच्या पलिकडे जावून समाजातील अनैतिक मुल्ये जेव्हा नाटकातून डोळ्यांसमोर उभे राहतात तेव्हा ती क्रांती ठरते. मानवतेचा शिरच्छेद करणार्‍या प्रवृत्तींवर जेव्हा हे नाटक प्रहार करते तेव्हा प्रबोधनाची मशाल त्या नाट्यवेड्यांनी हातात घेतलेली असते. या मशालीचे धग जितके तीव्र असतात तितक्याच तीव्र गतीने प्रबोधन घडत असते. अशीच एक नाट्यसंस्था गेल्या २६ वर्षांपासून प्रबोधनाची मशाल घेऊन झटत आहे. या नाट्यसंस्थेत काम करणार्‍या नाट्यवेड्यांनी नाटकासाठी आणि समाज प्रबोधनासोबतच स्त्री सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. ही नाट्यसंस्था म्हणजे ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’. माय महानगरच्या ‘आपलं महानगर आणि मी’ या फेसबूक लाईव्ह कार्यक्रमात थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या टीमने सहभाग घेतला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’या नाट्यचळवळीचे दिग्दर्शक आणि लेखक मंजूल भारद्वाज यांच्यासह नाट्यकर्मी अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के यांनी यावेळी थिएटर ऑफ रिलेवन्सच्या काही नाटकांतील दृश्यांची झलक दाखवली.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’चा जन्म कसा झाला?

लहानपणी जेव्हा मी १३ ते १४ वर्षांचा होतो, तेव्हा मला विचारले जायचे की, तू मोठा झाल्यावर काय होशील? तेव्हा मला वाटायचे की, मी सैन्यात भरती व्हावे किंवा डॉक्टर व्हावे. परंतु, जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आलो. तेव्हा समोरच मेडीकल कॉलेज होते. मी डॉक्टर होणार असा निर्णय घेण्याचे ठरवत होतो आणि नेमके त्याचवेळी मेडीकल कॉलेजसमोर असल्यामुळे अपघात झालेले चेहरे, वार्ड, मृतदेह, रुग्ण, त्या रुग्णांकडे दुर्लक्ष, संवेदनशील चेहरे या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर दिसत होत्या. या सगळ्या गोष्टींचा माझ्या किशोर मनावर एक वेगळा असा प्रभाव पडला आणि त्यातून मी डॉक्टर न होण्याचा निर्णय घेतला. मला आता वेगळे क्षेत्र निवडायचे होते आणि मी तसे निवडलेही. मी नाट्यक्षेत्राकडे वळलो. त्याकाळात तरुण होतो. त्यामुळे शेक्सपिएरचे नाटक कारयचे, ते गाजवायचे आणि मोठा नट व्हायचे, असे काहीसे माझे स्वप्न होते. त्यानुसार मी कामेही सुरु केली  मी हेल्मेटचे प्रयोग सुरु केले. पंरतु, चार प्रयोगानंतर ते नाटक बंद पडले. कारण, चौथ्या प्रयोगात कार्डीयस नावाची भूमिका करणार्‍या व्यक्तीला तलवार लागते. माझे नाटक बंद पडते. त्या रात्री मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार सरींमध्ये माझे अश्रूही मिसळले होते. आपण एक हुशार विद्यार्थी होतो. डॉक्टर किंवा इतर काही बनू शकलो असतो. वयाच्या विशीतच हे काय दु:ख आपल्या नशिबी आले? असा विचार माझ्या मनात येत होता. या दरम्यान, थिएटर बाहेर एक भाजीवाला माझ्या ओळखीचा होता. तो मला सारखा प्रश्न विचारायाच की, काय झाले तुमच्या नाटकाचे? तो पुन्हा पुन्हा मला तसा प्रश्न विचारयचा. मला त्या गोष्टीचा प्रचंड राग यायचा. परंतु, जेव्हा त्याने शंभराव्या दिवशी तोच प्रश्न विचारला तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की, हा असा का विचारतोय की तुमचे नाटक कधी होईल? हा असे का विचारतो की आपले नाटक कधी होणार आणि त्या मानसाच्या त्या प्रश्नाने माझा मेंदू पेटवला. यातूनच मी १२ ऑगस्ट १९९२ ला ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ ही संकल्पना जगाला दिली. आपण माणूस घडवण्यासाठी जगाला नाटक देऊया फक्त रंजन घडवण्यासाठी नाही, असा संदेश मी थिएटर ऑफ रिलेवन्समधून दिला.

हरयाणातून मुंबईत का यावेसे वाटले?

मुंबई ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. या मुंबईत आल्यानंतर नाट्यचळवळीला सुरुवात केली. मी स्वत: नाटके लिहिली आणि ती बसवली. यादरम्यान ६ डिसेंबर १९९२ रोजी भारतात एक महत्त्वाची घटना घडली. बाबरी मस्जीद पाडली गेली. त्यानंतर जानेवारी महिन्यात मुंबईत दंगळ उसळली. त्यावेळी मी लिहिलेले नाटक  ‘दूर से किसीने आवाज दी’ हे नाटक आम्ही दंगलीत शिरुन केले, प्रदर्शन दिली. त्या नाटकाचा एवढा प्रभाव पडला की, तलवारी घेऊन आलेले लोकदेखील शेवटी आमच्यासोबत इन्सानियत जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागले. आणि तिथून आम्हाला विश्वास बसला की, आमचा जो नाट्यसिद्धांत आहे तो खरा माणूसकी जागवत आहे.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ ही संकल्पना काय आहे?

सगळे नाटक करतात आणि त्याला वेगवेगळे नावही देतात. परंतु, दृष्टीकोनामध्ये फरक आहे. आजकालच्या नाटकांमध्ये दृष्टीकोन आणि सिद्धांत दिसत नाही. थिएटर ऑफ रिलेवन्स एक सिद्धांत आहे आणि तो या जगात सर्वव्यापक आहे. दुसरी गोष्ट अशी की, मुख्य आणि समांतर अशी काही संकल्पनाच आम्ही मानत नाहीत. खरंतर जे सर्वव्यापक दृष्टीकोनाचे असते, जे सर्वांना घेऊन चालते आणि जिथे प्रेक्षकांचा सहभाग जास्त आणि थेट आहे, ते नाटक मुख्य नाटक असते. दुसरी थिएटर ऑफ रिलेवन्सची व्याखा अशी की, प्रत्येक रंगाला एक विचार असतो आणि त्या विचाराला एक कर्म देखील असतो. या दोन्हींच्या संमिश्रण म्हणजे थिएटर ऑफ रिलेवन्सची रंगकर्मी.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ला विदेशात कसा प्रतिसाद मिळाला?

ही पण एक गंमतच आहे. मी मुंबईच्या गरिब झोपडपट्ट्यांमध्ये आणि नाट्यगृहांमध्ये प्रयोग करण्यात रमलेलो होतो. विदेशात माझे कुणीच नव्हते. परंतु, युरोपातील काही लोकांना कळळे की, जगामध्ये थिएटरला घेऊन कुणीतरी नवीन सिद्धांत मांडलेला आहे. तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क केला. आम्ही जर्मनीमध्ये सर्वात पहिला प्रयोग केला. त्यानंतर दर तीन-चार वर्षांनी आम्ही विदेशात प्रयोगाला जात असतो. मी जगातील वेगवेगळ्या २८ देशांमध्ये वर्कशॉफ घेतले आहेत. ही खूप मोठी बाब आहे.

महिला असल्याचा अभिमान वाटला – अश्विनी नांदेडकर

थिएटर ऑफ रिलेवन्समध्ये येऊन मी स्वत: बदलले. कारण, सुरुवात स्वत: पासून करणे फार गरजेचे आहे, हे इथे आल्यावर मला कळले. ‘छेडछाड क्यू?’ या नाटकापासून मी सुरुवात केली. ’छेडछाड क्यू?’ या नाटकामुळे मला महिला असल्याचा अभिमान वाटला. त्यानंतर मी ’गर्व’ हे नाटक केले. गर्व नाटकमध्ये असे आहे की, आपण माणूस म्हणून जन्म घेतो. परंतु, माणूस म्हणून जगतो का? स्त्री तर मी आहे. परंतु, त्याच्याहीपलिकडे मी माणूस आहे. या गोष्टीची ओळख मला या नाटकातून झाली. आपण आईच्या गर्भातून आपण येतो. मात्र, आपल्या गर्भातून बाहेर येतो का? तर हे गर्भ जे आपण आपल्या समाजाभोवती निर्माण केले आहेत, ते तोडण्याचे काम या नाटकाने केलं. येथे आल्यानंतर एक स्त्री आणि एक माणूस म्हणून जगण्याला मी सुरुवात केली. त्याचबरोबर विचार करणं काय असतं? त्यासोबतच आपल्याला एक गिफ्ट मिळालेली असते ती म्हणजे संवेदना आणि स्पंदनं. या संवेदना आणि स्पंदनं आपण कुठेतरी हरवली आहेत. या जगामध्ये जगताना समाजाने आपल्या जी बंधने लादली आहेत, त्या बंधनांमध्ये आपण संवेदना हरवून बसलो आहोत. ती संवेदना जागृत करण्याचं काम ’गर्भ’ नाटकाने केलं. त्यामुळे एक माणूस म्हणून जगताना मला खुप अभिमान वाटतो.

जाणीव आणि ताकद मिळते – सायली पावसकर

या नाट्यचळवळीचा एक अनुभव असा आहे की, ’छेडछाड क्यू?’ या नाटकाचा प्रयोग आम्ही भायखळातील एका मुलींच्या शाळेत केला. काही विषय फार संवेदनशील असतात जे मुली एकमेकांशीदेखील बोलत नाही किंवा त्यांच्या पालकांशी बोलत नाही, अशा विषयांना आणि अनुभवांना मुलींनी नाटकामार्फत दोन हजार प्रेक्षकांसमोर व्यक्त केले. दुसरा अनुभव असा की, आम्ही कोल्हापुरात आमचा ’छेडछाड क्यू?’ या नाटकाचा प्रयोग केला. या प्रयोगानंतर एक पीडित मुलगी माझ्याजवळ आली. तिने सांगितलं की, मला हे नाटक पाहूण इतकं बळ आलं आहे की, मी त्या छेड काढणार्‍याला बघूनच घेईल. त्याने मला मारलं तर मी मरेल. पण, त्यालाही तिथे सोडणार नाही. ही जाणीव आणि ताकद या नाट्यचळवळीतून मिळते. आताच कळव्याचा एक अनुभव आहे. कळव्यातील काही मुलींसोबत ’छेडछाड क्यू?’ या नाटकाची तालीम सुरु केली. त्यावेळी कळलं की, त्यांचेही काही मुद्दे आहेत. ते मुद्दे आहेत  की, घरातून बाहेर पडू देत नाहीत, शिक्षण बंद करतात, लवकर लग्न करतात. या मुलींसोबत नाट्यप्रयोग करताना ‘चलती हूँ मे चलती हूँ, घरसे बाहर नकलती हूँ’ हे नाटकं बसवलं. ते नाटक जेव्हा मुलींनी त्यांच्या वस्तीमध्ये केलं, नाक्यावर केलं, जिथे मुलं बसतात, जिथं छेडछाडीचे प्रकरणं होतात, तिथं जाऊन ते नाटक केलं आणि त्या मुलांना तेथून हटवलं. त्याचबरोबर त्यांच्या वस्तीमधील दारुचे अड्डेही त्यांनी बंद केले. आज ती प्रक्रिया अजूनही कळ्याव्याच्या त्या वस्तीगृहामध्ये सुरु आहे. त्या मुली असे काम करत आहेत.

स्त्री शरीर म्हणून मर्यादित नाही, ती शक्ती आहे – कोमल खामकर

मला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवायची होती. त्यासाठी मी व्यावसायिक रंगभूमी, कॉलेज कल्चरल अ‍ॅक्टीविटी या सगळ्यांमध्ये भाग घेतला. परंतु, काही लोक मुलीला एक शरीर म्हणूनच पाहतात आणि ही गोष्ट माझ्यासोबत घडली. स्त्रीपेक्षा एक माणूस म्हणून जगण्याचा माझा संघर्ष हा प्रत्येक पावलावर घडत गेला. परंतु, जेव्हा मी अश्विनीला भेटले. अश्विनीने मला या प्रक्रियेशी जोडलं. तेव्हा मी पहिल्यांदा जे नाटक पाहिलं, ते होतं ‘मै औरत हूँ’. या नाटकाने मला इतकं बळ दिलं की, मी फक्त शरीर म्हणून मर्यादित नाही. मला एक अस्तित्व आहे. मी शक्ती आहे, माझ्यात एक ताकद आहे. माझ्यातला स्वत:ला मी शोधलं आणि ती ऊर्जा घेऊन मी पुढे निघाली. आज हे नाटक प्रत्येक गल्ली, रस्ते, प्रस्थापीत थिएटर, शाळा सगळीकडे सादर करतो. जेणेकरुन स्त्री ही त्यागमुर्ती आहे असं न म्हणता स्त्री एक सृजनशील व्यक्तीमत्व आहे. तिच्यात एक ताकद आहे. ती वैचारिक शक्ती आहे आणि ती समाजाला योग्यरित्या घडवू शकते. समाजाला घडवण्याची तिच्यात ताकद आहे, हे आम्ही या नाटकाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न करतोय.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -