घरफिचर्सपक्षी जाय दिगंतरा!

पक्षी जाय दिगंतरा!

Subscribe

दूरवर स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी विश्रांती व उड्डाण साधण्याची वेळ ही अतिशय अपरिहार्य असते. ठरलेल्या मार्गावर प्रवास करायचा म्हटलं की ठरलेली विश्रांतीची ठिकाणे आलीच. उड्डाणासाठी वापरलेली शरीरातील ही ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी हे पक्षी विश्रांतीसाठी या ठरलेल्या स्थळांवर पोहोचतात. वातावरणाची पुढील परिस्थिती व हवेची दिशा ओळखून विश्रांतीचा हा कालावधी ठरतो. इतकेच नव्हे तर हवेचा व अनुकूल परिस्थितीचा फायदासुद्धा घेतला जातो. किती विलक्षण!

पक्ष्यांचे स्थलांतर हे नैसर्गिक जगतातले एक आश्चर्यच. प्रवास हजारो मैल दूरचा असल्याने पक्षांना वेळ, वेग, मार्ग, ऊर्जा अशा सर्व गोष्टींची समीकरणं जुळवावी लागतात आणि हे सारे ठरते स्थलांतराच्या पूर्वी. बरं इतक्या मोठ्या पराक्रमासाठी शक्ती व सहनशीलता ही तितकीच लागते. म्हणूनच प्रजनन क्षेत्र व खाद्य मिळवण्याच्या जागेमधला प्रवास सहजगत्या ठरलेला नसून एका उचित नियमांच्या संचाचे अनुसरण करून केलेले प्रवास असतो. नियमित वेळेत योग्य जागेवरील उपस्थिती हे एका यशस्वी स्थलांतराचे लक्षण.

दूरवर स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी विश्रांती व उड्डाण साधण्याची वेळ ही अतिशय अपरिहार्य असते. ठरलेल्या मार्गावर प्रवास करायचा म्हटलं की ठरलेली विश्रांतीची ठिकाणे आलीच. उड्डाणासाठी वापरलेली शरीरातील ही ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी हे पक्षी विश्रांतीसाठी या ठरलेल्या स्थळांवर पोहोचतात. वातावरणाची पुढील परिस्थिती व हवेची दिशा ओळखून विश्रांतीचा हा कालावधी ठरतो. इतकेच नव्हे तर हवेचा व अनुकूल परिस्थितीचा फायदासुद्धा घेतला जातो. किती विलक्षण!

- Advertisement -

स्थलांतर हे सहसा उत्तरेकडून दक्षिण अक्षाकडे होत असते. पक्ष्यांच्या स्थलांतराचे असे एकूण 8 नित्याचे महामार्ग. भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिले तर यामधील 3 अमेरिकेमध्ये: पॅसिफिक अमेरिका, मध्य अमेरिका व अटलांटिक अमेरिकेचा उड्डाणमार्ग; 3 आफ्रिकेमध्ये: अटलांटिक पूर्व, काळासमुद्र व पूर्व आशिया उड्डाणमार्ग; 1 मध्य आशिया उड्डाणमार्ग व 1 ऑस्ट्रेलेशिया उड्डाणमार्ग. जगातील 2274 स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांच्या या गुंतागुंतीच्या प्रवासाचे हे शास्त्रज्ञांनी मांडलेले उड्डाण नकाशे एक लक्षणीय सरळीकरण मानले जाऊ शकते.

पॅसिफिक अमेरिका, मध्य अमेरिका व अटलांटिक अमेरिकेचा उड्डाणमार्ग हा उच्च आर्क्टिक किंवा ध्रुवाजवळच्या थंड प्रदेशापासून ते अमेरिकेच्या दक्षिणी टोकापर्यंतचा पट्टा. अटलांटिक पूर्व, काळासमुद्र व पूर्व आशिया उड्डाणमार्ग म्हणजेच युरोपपासून पश्चिम किंवा मध्य आशियापर्यंतचा. स्थलांतराचा हा पट्टा जागतिक पातळीवर सर्वात दूरवरचा व मोठा मानला जातो. प्रत्येक वर्षी जवळपास 2 अब्ज पक्षी या मार्गावर स्थलांतर करतात असा वैज्ञानिकांनी ‘बर्डलाईफ डेटा झोन’ मध्ये उल्लेख केलेला आहे.

- Advertisement -

मध्य आशिया उड्डाणमार्ग हा जगातील सर्वात छोटा मार्ग. पूर्णपणे उत्तरगोलार्धात स्थित असलेला हा मार्ग पुरापाषाण क्षेत्रास (रशिया, युरोप व आफ्रिकेचा उत्तरी भाग) भारतीय उपमहादेशासोबत जोडतो. टिब्बती पाठारे व हिमालयाची अत्यंत विकत व उंच शिखरे मध्ये स्थित असल्याने फार कमी प्रजातीचे पक्षी हा मार्ग निवडतात. पूर्व आशियाई उड्डाणमार्ग हा रशिया ते पूर्वेकडील न्यूझीलंडपर्यंतचा पट्टा. पाण्याच्या जवळ राहणारे सुमारे 50 दशलक्ष पक्षी या मार्गाचा वापर करत असल्याची नोंद आहे.

स्थलांतराची काही उदाहरणे अक्षरशः चकित करणारी आहेत.
1) ग्रेट स्नाइप म्हणजेच मोठा पाणलावा या पक्षाने हवेच्या दिशेचा लाभ न घेता सरासरी 97 किमी /तास वेगाने 6800 किमी प्रवास केल्याची नोंद आहे. सकॅण्डीनवीया ते सहारा या भागात न थांबता प्रवास करताना या पक्ष्याच्या शरीरातील सुमारे अर्धे वजन गमावले जाते.

2) बार टेल्ड गॉडवीट किंवा पट्टेरी शेपटीचा पान टिव्हळा, हा पक्षी आर्क्टिक ते न्यूझीलंडचा 11,000 किमीचा प्रवास चक्क 9 दिवसात पूर्ण करतो, तेही न थांबता. वेळ व अंतर पाहता हे स्थलांतर पक्षी जगतात सर्वात प्रेरणादायक व आश्चर्यकारक मानले जाते.

3) आर्क्टिक टर्न किंवा आर्क्टिक सुरय, एकूण 90,000 किमी प्रवास करत पृथ्वीची जणू प्रदक्षिणाच करतात. हे पक्षी साधारण 30 वर्षे जगतात, जर या कालावधीतील त्यांच्या प्रवासाचा अंदाज बांधला तर पृथ्वी ते चंद्रामधील अंतर 3 वेळा कापले जात असावे.

प्रत्येक वर्षी स्थलांतर करणार्‍या लाखो पक्ष्यांची शिकार केली जाते, शेकडो पक्षी विजांच्या तारा व मानव निर्मित बांधकामांना आदळतात किंवा शेती व शहरीकरणामुळे अन्नस्रोत ढासळल्याने प्रवासामधील हे भुकेले व थकलेले पक्षी मरण पावतात. हवामानातील बदलामुळे तर कित्येक पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाल्याचे आढळते. अशा या समस्येला सामोरे जाण्यास स्थानिक संवर्धन संघ व एखाद्या बहुराष्ट्रीय धोरणाची आवश्यकता आहे. उड्डाणमार्गांची ही चौकट आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांचा सहयोग मिळवू शकेल.


  • तुषार परब
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -