घरफिचर्सन करी रे संग राहे रे निश्चळ

न करी रे संग राहे रे निश्चळ

Subscribe

जवळ पास 19-20 जंगली कुत्रे रस्त्यावर बसून कसली तरी वाट पाहत होते. त्यातले काही निरीक्षण करत होते, काही आराम. दीपकने लगेचच बाईक बाजूला घेऊन त्या मागे थांबण्याचा आदेश दिला. मनाला थोडा दिलासा म्हणून आजूबाजूची पटकन चढण्यासारखी झाडे बघून घेतली. रानकुत्रे कसे आपली शिकार जिवंतच खातात याची चित्रे डोळ्यासमोर फिरू लागली की अशी परिस्थिती होते.

गर्दी व धावपळीत सतत राहूनसुद्धा मनुष्य एकटेपण अनुभवत चालला आहे. वारंवार संवाद न साधल्याने बर्‍याचशा गोष्टींपासून आपण अज्ञात राहतो. खरं तर, लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात. किंवा आपले संवाद व मित्रपरिवार तरी मर्यादित असतात. बरं, सामुदायिक विचारांचा तोल भलतीकडेच. एखाद्या गोष्टीवर अगदी अचूक टोला कसा हाणावा, याची गणितं जुळवता जुळवता वेळ निघून जाते. समस्या सर्वत्र आहेत, पण उत्तर मिळवण्याचे मार्ग ही तितकेच. काही दिवसांपूर्वी नॅशनल जिओग्राफीवर एकट्या राहणार्‍या जनावरांविषयी माहितीपट सुरू होते.

सिंह, वाघ, बिबटसारख्या जनावरांच्या शिकार करण्याच्या पद्धती पहिल्या. एखाद्या हरणाच्या किंवा सांबराच्या शिकारीसाठी घात लावून बसण्याच्या पद्धती प्रक्षेपित केल्या जात होत्या. साधारण 3 ते 4 वेळा प्रयत्न केल्यावर एका हरणाच्या पाडसाची शिकार होते. बहुतेक एकट्याने शिकार केल्यामुळे इतक्यांदा प्रयत्न करावा लागत असावा. हे जर कळपाने साध्य झाले असते तर? प्रत्येक प्राण्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी, ती कशी?

- Advertisement -

मुद्यावर येऊया!
असा ही एक प्राणी आहे जो कळपांतील सदस्यांसोबत अगदी उत्कृष्ट नियोजन करून शिकार करतो. साधारण 3-20 च्या कळपाने फिरणारा हा प्राणी, त्याच्या सहकार्‍यांचे महत्व किती आहे हे वारंवार दाखवून देत असतो. आशिया खंडातील पुरातन कुळातला हा प्राणी असून पूर्वी आशिया खंडात सर्वत्र आढळणारा आता काही मोजक्या प्रदेशात आढळतो. रुशी बर्फाळ डोंगरांपासून दक्षिण पूर्व आशिया खंडातील सदाहरित जंगलांपर्यंत विविध त्याची निवास स्थाने. तो म्हणजे आशियाई जंगली कुत्रा किंवा ढोल. ढोल हा शब्द बेपर्वा आणि शूर असल्याचे दर्शवतो.

दक्षिण गोव्यातील कोटीगांव अभयारण्य हे मनाच्या अगदी जवळचे आणि या अभयारण्यात काम करणारा दीपक हंसकर एक जिवलग मित्र.आठवड्या अखेर गोव्यातील घडामोडी मला मुंबईत बसून कळत होत्या. बोलता बोलता त्याने सहजच आमंत्रण दिले. बरेच दिवस आला नाहीस, ये भावाला भेटायला. पावसाळ्यात पश्चिम घाट फिरण्यासाठी कधीच मागे पुढे न पाहणारा मी तातडीने बॅग भरून 3.20 च्या मत्स्यगंधामधून रवाना झालो. अभयारण्य छोटं जरी असलं तरी जैवविविधतेने भरलेलं. दोनच रस्ते पण अतिशय दाट झाडांनी घेरलेले. काणकोणच्या रेल्वे स्थानकावर रात्री 2.30 ते 6.30 मध्ये एक झोप काढली आणि पुढील 7 कि.मी. प्रवासाची सुरुवात केली. दीपक वाट पाहतच होता. कसा आहेस? विचारण्याआधी त्याने आज कुठे जायचे? असा प्रश्न केला. कॅन्टीनमध्ये पटकन नाश्ता करून आम्ही तुळशीमोलच्या वाटेला लागलो. पुढील 5 मिनिटातच समोरून काहीतरी पटकन उडाले, आणि त्याचा शोध घेताना काही वेगळे पाहून थबकलो. एक रानकोंबडी रास्ता ओलांडत होती. त्याचा फोटो काढू लागणारच तितक्यात फ्रेममध्ये काही भलतेच दृष्टीस पडले आणि हातपाय थंड पडले. त्या स्थितीत कॅमेर्‍याचे शटर कसे पडले देव जाणे.

- Advertisement -

जवळ पास 19-20 जंगली कुत्रे रस्त्यावर बसून कसली तरी वाट पाहत होते. त्यातले काही निरीक्षण करत होते, काही आराम. दीपकने लगेचच बाईक बाजूला घेऊन त्या मागे थांबण्याचा आदेश दिला. मनाला थोडा दिलासा म्हणून आजूबाजूची पटकन चढण्यासारखी झाडे बघून घेतली. रानकुत्रे कसे आपली शिकार जिवंतच खातात याची चित्रे डोळ्यासमोर फिरू लागली की अशी परिस्थिती होते. काही वेळ त्यांनी वाट पहिली आणि नंतर जंगलात पळाले. थोडा जीवात जीव आला, पण दीपकच्या मनात वेगळे विचार फिरू लागले. त्याने बाईक काढली आणि त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. या वेळेस बेला तलावाच्या वाटेवर…

अंदाज बांधून एका कडेला गाडी उभी केली आणि झाडावर बसून वाट पाहू लागलो. आणि अंदाज खरा ठरला. आधी एक-दोन, मग पूर्ण टोळी बाहेर आली. पण क्षणार्धात पुन्हा झुडपात शिरली. झाडावरून खाली उतरून शोध घ्यायचा प्रयत्न सुरु करणार तितक्यात एका गव्याचा बछडा अचानक धावत समोर येऊन थांबला आणि त्यामागे लागलेले रान कुत्रेसुद्धा. 250-300 किलोचे बछडे दोन दिवस तरी पुरून उरले असावे.

कळपाने एकाच प्रयत्नात केलेली मोठी शिकार जास्त लाभदायक, की एकट्याने केलेली बारीक शिकार हा प्रश्न तेव्हापासून मनात येत राहतो. मानसशास्त्राप्रमाणे बहुतेक कळपासोबत केलेला प्रयत्न अधिक योग्य असावा. मनुष्य कितीही हुशार असला तरी निसर्गाचे अनुकरण करूनच काही साध्य करू शकतो आणि हेच तर निसर्ग आपल्याला वारंवार आठवण करून देत असतो…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -