घरफिचर्सवाघ वाढले... निसर्ग बहरतोय!

वाघ वाढले… निसर्ग बहरतोय!

Subscribe

भारतात पूर्वी वाघ प्रचंड संख्येत होते. मुघल साम्राज्य पसरल्यानंतर वाघांच्या संख्येत फरक पडू लागला. आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत जहांगीरनेच 86 वाघ व सिंह मारले. 32-40 घोस्त पदार्थांच्या मुघली थाळ्यामध्ये किती बळी गेला असेल याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. ब्रिटिश तर त्याहून जास्त शौकीन. 1757 च्या प्लासीचा युद्धानंतर त्यांनी वाघांच्या शिकरीस प्राधान्य दिले. पण आता बदल होत आहे, वाघांच्या संवर्धनावर भर देण्यात येत असून वाघांची संख्या वाढत आहे, त्यामुळे निसर्ग बहरत आहे.

दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. ही दिवस साजरा करण्याची वेळ 20 व्या शतकात वाघांमधील 95 टक्के घट आढळल्यामुळे आली. सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट, रशिया,2010 मध्ये ही घोषणा झाली व वाघांचे संवर्धन हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे जाहीर झाले.

दक्षिण आशियातील बरेच देश या दिवशी आपापली वाघांची संख्या जाहीर करतात. नेपाल, भूतान, बांगलादेश, म्यानमार व भारतसुद्धा. भारत सरकारतर्फे व्याघ्रप्रकल्प (project tiger) एप्रिल 1973 पासूनच चालवण्यात येत होता. वाघांच्या संवर्धन व वाढीसोबत त्यांच्या निवासस्थानाचेही संरक्षण करणे हा मुख्य हेतू.

- Advertisement -

कोणता वाघ, भारतातील इतिहास
सर्वप्रथम ब्रिटिश बंगालमध्ये स्थायिक झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात झालेल्या वाढीमुळे कित्येक पशुपक्ष्यांचे नामकरण ब्रिटिशांनी केले. ह्यूम, ब्लायथ, मार्शल, वॉर्ड, गुल्ड ही शास्त्रज्ञांची नावे कित्येक जनावरांना मिळाली. बंगाल टायगर हाही त्यांचा शब्द. वरील नमूद केलेल्या देशांमध्ये या वाघाच्या उपजाती आढळतात. ब्रिटिशांनी नामकरण जरी एका शतकापूर्वी केले असले, तरी वाघांच्या इतिहास हा 3000 वर्षे जुना. हिमायुगाच्या क्रमिक टप्प्याने वाघांना बळजबरी आपला प्रांत सोडून दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करावे लागले. आनुवंशिक नमुने या गोष्टीचे मुबलक पुरावे देत आले आहेत. विज्ञान सोडलं तर अजून एक उदाहरण म्हणजेच मोहेजोदडोमध्ये आढळलेल्या शिव पशुपतीचा शिक्क्यात वाघाची छवी. पशुपतीचा अर्थच जनावरांचा राजा. चोला राजवंशात वाघाला अत्यंत महत्त्व होते. सरस्वती वसाहतीच्या मुद्रेवाही ते आढळून येतात. काळासोबत वाघ भित्तीचित्रे, नक्षीकाम व चित्राच्या स्वरूपात शक्तीची प्रतिमा म्हणून ओळखला जाऊ लागला.

भारतात पूर्वी वाघ प्रचंड संख्येत होते. मुघल साम्राज्य पसरल्यानंतर वाघांच्या संख्येत फरक पडू लागला. आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत जहांगीरनेच 86 वाघ व सिंह मारले. 32-40 घोस्त पदार्थांच्या मुघली थाळ्यामध्ये किती बळी गेला असेल याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. ब्रिटिश तर त्याहून जास्त शौकीन. 1757 च्या प्लासीचा युद्धानंतर त्यांनी वाघांच्या शिकरीस प्राधान्य दिले. वाघांच्या अधीवासाचाही विध्वंस इथूनच सुरू झाला. जंगल ताब्यात घेतल्यावर त्याचा नाश करून शेती करण्यातच अर्ध्याहून जागा गेल्या. त्यांची पोटे भरण्यासाठी आपलेच लोक आणि आपलेच प्राणी. त्यांचा प्रत्येक शिपाई शिकारीमध्ये भाग घेत असे. झाडावर सुरक्षित रायफल घेऊन बसलेल्या ब्रिटिश अधिकार्‍यांसमोर वाघ आणण्यासाठी ते आपली सहायत्ता घेत होते. वाघ मारल्यावर एक पाय वाघावर ठेऊन व एका हातात बंदूक घेऊन छायाचित्र घेत. ही त्यांच्या शूरपणाची कथा.

- Advertisement -

पर्यावरणातील समतोल
जगातील वाघांच्या संख्येचा 70 टक्के वाटा भारताचा आहे. 2020 मधील नमूद केलेल्या 2967 वाघांच्या संख्येत 312 वाघ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पात आढळले आहेत. भारतील वाघ संख्येतील अर्धी केवळ मध्य प्रदेश व कर्नाटकात आढळते. महाराष्ट्रात 2006 मध्ये 103, 2010 मध्ये 168 व 2014 मध्ये 190 ही आकडेवारी होती. वाघांच्या प्रजननासोबतच कार्यरत कर्मचार्‍यांनासुद्धा तितकेच श्रेय मिळायला हवे. 1,21,337 चौ किमीमध्ये स्थापित जवळपास 27000 कॅमेर्‍याची माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा दाखल झालेली आहे. जगातील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हे.

हा सर्व्हे महत्त्वाचा का आहे?
1)लिंग अनुपात म्हणजेच sex ratio ची माहिती काढण्यात यश मिळवलं आहे. याचा अभ्यास या आधी कधीच झालेला नव्हता.
2) मनुष्य जातींचं विज्ञान म्हणजेच anthropology चा वापर करण्यात आला. विज्ञानाला अजून एका विषयाची जोड.
3) सर्वात मोठा कॅमेरा सर्व्हेचा जागतिक विक्रम.
4) वाघांच्या संरचनात्मक डेटा.

समस्या
संख्येत वाढ नक्कीच झाली आहे, पण त्याच बरोबर समस्यासुद्धा तितक्याच वाढल्या आहेत. वाढत्या खाणी, रस्ते व कमी होत असलेला अधिवास या काही मुख्य समस्या. वाघ नवीन जागेच्या शोधात एखादे अभयारण्य सोडून गेलेल्या बातम्या वाढत जात आहेत. यवतमाळमधील तिपेश्वर अभयारण्यातून जून 2019 मध्ये रेडिओ कॉलर केलेला उ-1 नावाच्या वाघाला नवीन सुरक्षित जागा शोधण्यासाठी तब्बल 1160 किमी प्रवास करावा लागला. एखाद्या वाघाने केलेला हा सर्वात मोठा प्रवास मानला जातो. तेलंगणातील कागझनगमधील फाल्गुन नावाची वाघीण 450 किमी प्रवास करून गडचिरोलीत एका महिन्यानंतर आढळून आली. मनुष्य ही इतका लोभी आहे की भरपाईसाठी स्वतःवर वाघाने हल्ला केला आहे, असे वन विभागाला सांगतो. राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्याच्या शेजारच्या गावकर्‍यांनी हे बर्‍याच वेळा निदर्शनात आणून दिले आहे. रणथंबोरमधील 13 वर्षाच्या सितारा नावाच्या नर वाघाने हल्ला केला आहे असं सांगत वन विभागाची गाडी अडवून त्यावर दगडफेक केल्यामुळे छोट्या इजेलही 30000 रुपये भरपाई घेतली. हे पैसे टायगर फंडचे

रस्ता विकास ही महत्त्वाचा, पण तो जंगलतोड न करता ही साध्य होतो. सिजोसा ते भालुक पाँगमधील रस्ता पक्के व्याघ्र उद्यानातून जाणार असून 862 चौ किमी जंगलाचे दोन भाग होणार आहेत. रस्त्याच्या बांधकामासाठी 160 हेक्टर जागा समस्येत आहे. हा रस्ता पूर्व व पश्चिममधील औद्योगिक विकास तर साध्य करेल पण वाघांसोबत इतर वन्यजीव धोक्यात आणेल.

वाघ जंगलाचा राजा आहे आणि निसर्गाचं समतोल साधण्यासाठी त्याचाही महत्त्वाचा वाटा आहे. सांबर, चितळ व भेक्रांसारख्या शाकाहारी जनावरांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी वाघ हा महत्त्वाचा प्राणी आहे. आकडेवारी वाढली याचाच अर्थ निसर्गातही चांगला बदल झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -