घरफिचर्सतक्रारींच्या निराकरणासाठी !

तक्रारींच्या निराकरणासाठी !

Subscribe

ग्राहक-संरक्षण कायदे, ग्राहक पंचायतसारख्या चळवळीने ग्राहक जागरूक होणे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. शिवाय बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आजचा उत्पादक-सेवा पुरवठादार यांचा दृष्टीकोन व्यावहारिक झालेला आहे. आज ‘तक्रार निवारण कक्ष’ असण्याची गरज कायद्याने आणि ग्राहक-सेवेचे एक ब्रीद म्हणून आवश्यक झालेले आहे. शेअर्स, म्युचुअल फंडसारख्या गुंतवणूक साधनांबाबत कशा प्रकारच्या तक्रारी उद्भवतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी काय करायचे? हे आपण आजच्या जागतिक ग्राहक दिनी पाहणार आहोत.

जगामध्ये रोज कोणता ना कोणता दिन विशेष असतो, काही दिवस म्हणजे डेज हे फार लोकप्रिय असतात आणि त्यांचे जोरदार मार्केटिंग केले जाते, तरुणाईला आकर्षित केले जाते. काही जागतिक पातळीवरचे दिवस साजरा करणे, लक्षात ठेवणे महत्वाचे उदाहरणार्थ – आरोग्य दिवस, किडनी दिवस. असे दिवस लक्षात ठेवले की, जागृती निर्माण होतो. जिथे जिथे ग्राहक असतो, मग ते उत्पादन-क्षेत्र असो की, सेवा-उद्योग, यात गुणवत्ता हा अतिशय महत्वाचा घटक असतो. कारण ग्राहक-समाधान हा अत्यंत महत्वाचा घटक झालेला आहे की, ज्यावर तुमची विक्री-सेवा आणि नफाइतकेच नव्हे तर अस्तित्वच अवलंबून आहे. गुगलप्रमाणे अनेक स्त्रोत आहेत,ज्याद्वारे आपल्याला उत्पादन किंवा सेवा-सुविधाबाबत ताजी माहिती मिळू शकते. सर्वच म्युच्युअल फंडांच्या वेबसाईट्स संकेतस्थळ आहेत आणि त्यावर खूप माहिती अगदी दैनंदिन पातळीवर पहायला मिळत असते. आणि पारदर्शकता जाणवते.

तसेच भन्नाट पसरलेल्या सोशल मीडियामुळे तर अशी ग्राहक-नाराजी तात्काळपणे ‘कमेंट’ रूपात प्रतिबिंबित होत असते.आणि एकास ठेच तर दुसरे अनेक शहाणे होऊ शकतात. ग्राहक-संरक्षण कायदे, ग्राहक पंचायतसारख्या चळवळीने ग्राहक जागरूक होणे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. शिवाय बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आजचा उत्पादक-सेवा पुरवठादार यांचा दृष्टीकोन व्यावहारिक झालेला आहे. आज ‘तक्रार निवारण कक्ष’ असण्याची गरज कायद्याने आणि ग्राहक-सेवेचे एक ब्रीद म्हणून आवश्यक झालेले आहे. शेअर्स, म्युचुअल फंडसारख्या गुंतवणूक साधनांबाबत कशा प्रकारच्या तक्रारी उद्भवतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी काय करायचे? हे आपण पाहणार आहोत.

- Advertisement -

सेबीकडे करावयाच्या तक्रारी कोणत्या प्रकारच्या तक्रारी आपण सेबीकडे करू शकतो?

1) सेबी कायद्याखालील गोष्टींचे पालन-पूर्तता न झाल्यास
2) सिक्युरिटीज कायदा आणि डिपोझीटरिज कायदा
3) कलम 24- कंपनी कायदा,2013
मात्र खालील प्रकारच्या तक्रारी सेबीच्या तक्रार निवारण कक्षेच्या अखत्यारीत येत नाहीत –
1) गुंतवणूकदार नसलेल्या कोणाची तक्रार असेल, गुंतवणुकीबाबत नसलेली कोणतीही तक्रार
2) निनावी तक्रार स्वीकारली जात नाही अपवाद :-कोणीतरी भ्रष्टाचार किंवा गैर-व्यवहारासंदर्भात केलेली नावाचा उल्लेख न करता केलेली एखादी तक्रार
3) शेअर्स ट्रेडिंग किंवा शेअर्सच्या किंमतीबाबत केलेली तक्रार
4) योग्य कागदपत्र वा पुरावे न जोडता केलेले आरोप किंवा तशाप्रकारची तक्रार
5) केवळ सूचना किंवा मार्गदर्शनपर लिहिलेले अनाहूत पत्र -सूचना
6) खोटी तक्रार / बनावट कागदपत्रे जोडून केलेली तक्रार
7) सेबीच्या कक्षेत न येणार्‍या विषयाबद्दल केलेली तक्रार
8) शेअरबाजार-ट्रेडिंग, गैर-व्यवहार याविषयी
9) कोणत्याही नोंदणी न केलेल्या -अनधिकृत स्वरूपातील व्यवहारांबाबत
10) शेअर्सची विक्री-किंमत योग्य नाही अशी तक्रार केली तर
म्युच्युअल फंडबाबतच्या तक्रारींचे निवारण –
म्युच्युअल फंड योजनाकार / ब्रोकर्स किंवा वितरक यांच्यासंदर्भात असलेल्या तक्रारी
अशाबाबतीत आधी खालील ठिकाणी थेट संपर्क साधावा आणि रीतसर तक्रार-अर्ज दाखल करावा
1) म्युच्युअल फंडचे विश्वस्त/संचालक 2 म्युच्युअल फंडाने तक्रार निवारण करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती
3) म्युच्युअल फंड -गुंतवणूकदारांसाठी निर्माण केलेली सेवा केंद्र -सर्विस सेंटर्स

- Advertisement -

वरीलप्रमाणे तक्रार करून जर म्युच्युअल फंड किंवा संबंधितांनी जर दखल घेतली नाही,तर सेबीला कळवणे हाच उत्तम पर्याय आहे. तुम्ही सेबीकडे स्कोअर्सच्या माध्यमातून ऑन-लाईन तक्रार दाखल करू शकता.
सेबीचे संकेत-स्थळ : www.sebi.gov.in टोल-फ्री फोन क्रमांक : Helpline- 18002667575

सेबी आणि स्कोअर्स -सेबी ही भांडवलबाजारातील व्यवहारांसंदर्भात नियंत्रण करणारी संस्था आहे, त्यांनी गुंतवणूकदार, कंपनीचे शेअरहोल्डर्स, म्युच्युअल फंड युनिटधारक अशा घटकांसाठी तक्रारी दाखल करून त्यांचे निराकरण करण्यासाठी ही खास यंत्रणा उभी केलेली आहे.

तक्रारींचे स्वरूप- 1) आपल्या हातून झालेल्या 2) चुकून किंवा काही माहिती देण्याची राहिली असल्याने झालेल्या त्रुटी. असंख्यवेळा गुंतवणूकदारांच्या बेसिक-डेटाबाबत चुकीची माहिती दिली गेल्यास किंवा नोंदवली गेल्यास, त्याची दुरुस्ती करा. अशाप्रकारच्याच तक्रारी अधिक असतात. अर्थात त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही तर नुकसान होऊ शकते आणि नाराजीसुद्धा! पत्ता बदलणे आणि बदललेला न कळवणे किंवा आधीचाच नोंदवलेला असणे, नॉमिनेशन करणे, बँक-खात्याबाबतचा तपशील, व्यक्तिगत कायदेशीर कागदपत्रे -जी केवायसीसाठी लागतात.

दोन प्रकार असतात –
1) सर्वसाधारण चुका – अपुरी किंवा चुकीची माहीती देण्यामुळे या घडू शकतात. यांना कारकुनी किंवा प्रशासकीय चुका असेही संबोधले जाते. या चुका चटकन दुरुस्त होण्यासारख्या असतात.आणि त्याने लाभांश-पेमेंट अशाबाबतीत परिणाम होण्याची शक्यता नसते.
उदाहरणे – चुकीचा पत्ता किंवा अपुरा पत्ता लिहिणे, खाते क्रमांक पूर्ण न लिहिणे
2) गंभीर चुका – ज्या कारणाने तुमचे थेट आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा स्कीममध्ये नोंदणी न झाल्याने कायमचे नुकसान होण्याची शक्यता असते.

उदाहरणे – अमुक म्युच्युअल फंडाची नवीन योजना 16 तारखेला बंद होणार असेल आणि फॉर्मबरोबर काही माहिती न दिल्याने तुम्हाला त्याचे सभासद होता येत नाही.

फॉर्म भरताना केलेल्या चुका/उणिवा – आपण विमा उतरवताना किंवा बँकेत खाते उघडताना अनेकदा घाईघाईने त्यात मागितलेली माहिती भरत असतो. अनेकदा कंटाळादेखील करतो! आपण फक्त विचारतो -कुठे सही करायची? आपण जिथे आपले घामाचे पैसे गुंतवणार असतो, त्याबाबत फक्त माहिती घेऊन उपयोग नाही, तर संपूर्ण तपशील बरोबर आहे की नाही? हे पाहणे गरजेचे असते. अनेकदा आपण विचार न करता चेक देऊन मोकळे होतो. गाफील न राहता, आपल्याबाबत मागितलेले सर्व तपशील बिनचूकपणे भरले पाहिजेत. कारण आपली माहिती आपल्यापेक्षा अधिक अचूकपणे कोण देवू शकणार? केवळ नावच नव्हे तर घरचा -ऑफिसचा पत्ता, जन्मतारीख, नोकरीबाबतचा तपशील हा नेमका लिहिण्याची सवय ठेवा. अधिकृत असेल तोच लिहावा. शिवाय कायमचे घर असल्यास संपूर्ण माहिती लिहावी. हल्ली बरेचजण पुनर्विकासाच्या कारणाने आपली जुनी जागा सोडून भाड्याच्या जागेत स्थलांतर करतात,अशावेळी तात्पुरता पत्ता जरूर लिहावा. नजीकच्या पोस्ट ऑफिसात नक्की कळवावे. शिवाय जिथे आपण आधी गुंतवणूक केली असेल तिथे आणि आपल्या बँकेला कळवावे. म्हणजे तात्पुरत्या निवासाच्याजागी आपल्याला पत्र/लाभांश आणि महत्वाची कागदपत्रे योग्यवेळी निश्चितपणे मिळू शकतील. तुमचे पॅन-कार्ड किंवा आधार-कार्ड नंबर किंवा अन्य प्रकारची वैयक्तीक किवा नोकरी-व्यवसायाबाबतची माहिती चुकीची देऊन मोठी गफलत होऊ शकते. म्हणून ती माहिती भरताना तशी डॉक्युमेंट समोर ठेवून जशीच्या तशी लिहावीत. म्हणजे चूक होणार नाही. आणि पुढे होणारा गोंधळ निस्तरावा लागणार नाही.

तक्रार कशी व कुठे कराल –
1) सर्वात प्रथम ज्या म्युच्युअल फंडाबाबत चूक किंवा काही तक्रार असेल, तर थेट त्यांच्याशी लेखी स्वरुपात तक्रार करा
2) बहुतेक म्युच्युअल फंड योजनात तक्रार निवारण कक्ष किंवा विभाग असतो आणि त्यामार्फत तुमच्या तक्रारीचे योग्य निराकरण होऊ शकते
3) मात्र तसे न झाल्यास, किंवा त्यांच्या उत्तराने तुमचे समाधान न झाल्यास तुम्हाला पुढचा पर्याय उपलब्ध असतो.
4) सेबीच्या स्कोअर्स –SEBI COMPLAINTS REDRESS SYSTEM-[SCORES]-अधिकृत वेबसाईटसंकेतस्थळ या ठिकाणी तक्रारीची दाद मागू शकतो.

ग्राहक हा देव आहे ! हे सुभाषित जाहिरात आणि बोर्डपुरते मर्यादित न राहता वास्तवात यावे. म्हणजेच ग्राहकाला संरक्षण मिळावे तसेच योग्य प्रकारे मान राखला जावा हीच अपेक्षा आहे. आजच्या घडीला आपण उत्पादन व सेवा क्षेत्रातील अनेकविध साधने व सेवा यांचे उपभोक्ते म्हणजे ग्राहक असतो. म्हणूनच सदैव जागरूक राहणे व आपले हक्क अबाधित ठेवणे जरुरीचे असते. ग्राहक संघ, कन्झ्युमर कोर्ट, ग्राहक पंचायत याद्वारे ग्राहक सतर्क राहू शकतो. बँक -विमा -पोस्ट अशा वित्तीय सेवा व साधने देताना जे सांगितले असेल, जाहिरातीत प्रॉमिस केले असेल, तशा सेवा पुरवल्या पाहिजेत. त्यात काही तफावत, त्रुटी आढळल्यास आपले नुकसान वा फसवणूक होऊ शकते. चांगली सेवा मिळणे हा आपला हक्क आहे, ही जाणीव आजच्या दिवशी आपण जोपासुया व प्रसार करूया.

जागतिक ग्राहक दिनाचे महत्व आपण संपूर्ण वर्षभर जाणून घेऊया. कारण आपण सदोदित ‘ग्राहक’ असतो जागरूक ग्राहक राहिलो पाहिजे.

-राजीव जोशी – बँकिंग व अर्थ अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -