घरफिचर्सस्पिरिटच्या दिव्याखाली...

स्पिरिटच्या दिव्याखाली…

Subscribe

"पाचमध्ये आमच्या खोलीत पाणी घुसलं होतं, पाणी आणि आगीत काहीच वाचत नाही टीव्ही, फ्रिज, बेड सगळं खराब, माझी दोन्ही पोरं खूप घाबरली होती, पुढचे पावसाळे चिरकून चिरकून उठायची, थोडाही पाऊस झाला की म्हणायची बाबा पुढच्या भिंतीपर्यंत आलाय, घोट्यापर्यंत आलाय, लेकरं असून पाण्यात भिजायलासुद्धा घाबरायची"

बाबा मला बोर होतंय नुसतं…टीवी नाही शाळा नाही लाईट नाही i am fedup कंटाळलेली पोरगी किवा पोरगा

आज चौथा दिवसाय, अजून कसं काय उतरना गेलंय हो पाणी? काळजीतली ‘ती’नं.
बॅटरी संपत चाललेल्या मोबाईलचं नेटवर्क येतंय का?च्या प्रयत्नात अन रोड फेसिंग विंडोतून समोर दिसणार्‍या पाण्यात साप होता की कॅटफिश याचं आकलन करण्यात गुंतलेला मी.
सर्व भाषिक,सर्व क्षेत्रीय, मुंबईकर उपनगरवासियाच्या घरी कमी अधिक प्रमाणात हेच दृश्य असावं हा माझा अंदाज.
व्हाटसअपवर आलेले फोटो,व्हीडीओ, मेसेज आणि अफवावर विश्वास ठेवू नकाचे आवाहन परत परत पाहत, वाचत अन फोरवर्डत. घरात फुल्ल टेंगशन.
फ्लॅटचं सेफ्टी डोर उघडून, बंद पडक्या लिफ्टकडं बघत बघत पायर्‍याने खाली उतरल्यावर पाहिलं की माझ्याचसारखं घरात आंबल्याने बिल्डींगखालून दिसणारं बाहेरचं जग बघायला आलेली आजूबाजूच्या विंगेतली पब्लिक.
बारके पोरं पाण्यात उड्या मारत स्विमिंग स्विमिंग खेळत अन आमच्यासारखे समजदार कमरेइतक्या पाण्यातून समोर उघड्या असणार्‍या दुकानातून दूध, अंडी, पाणी, ब्रेड, बिस्कीट आणण्याच्या तजविजीत.
इतना पाणी हमने इतने साल में नही देखा…हद कर दिया इसबार
” क्या! कुछ भी! ऐसें पाणी में खेलने से थोडी ही ईमुनिटी बढेगा गोम्स साब! ये दुरुन बघ गं! मल मूत्राचं पाणी असतं ते, घाण! स्किन डिसीज होऊन बसतील… बाकीच्या घरच्यांना चालत असेल, तू दुरून बघ नाहीतर घरी बस”
पहिल्या दिवशी इन्वेरटर होतं आणि तिकडं स्टेशनकडे लाईट होती म्हणून नेट सुरू होतं माझं म्हणून वर्क फ्रॉम होम तरी केलं पण आता?. ऑफिसमधून फोनवर फोन सुरू आहेत …तिकडले पोचतात ऑफिसला आपणच अडकलोय… शीट!”
ये पक्का डॅम का पाणी है … बारीश से इतना हो ही नही सकता, बिना बोले छोड दिया गिर विर गया तो बोलना पडेगा ना”
पानी फक्त साचतं म्हणे? या म्हणावं बघा म्हणावं, इन्फ्रास्ट्रक्चर कुठाय ते तरी सांगा म्हणावं..ड्रेनेज नाही ते पाणी जाणार कुठे?
“पाचमध्ये आमच्या खोलीत पाणी घुसलं होतं, पाणी आणि आगीत काहीच वाचत नाही टीव्ही फ्रिज बेड सगळं खराब, माझी दोन्ही पोरं खूप घाबरली होती, पुढचे पावसाळे चिरकून चिरकून उठायची, थोडाही पाऊस झाला की म्हणायची बाबा पुढच्या भिंतीपर्यंत आलाय, घोट्यापर्यंत आलाय, लेकरं असून पाण्यात भिजायलासुद्धा घाबरायची”
“अब रुकना मंगताय कंटाल गया, घर में स्टोक भी नहीं बचा”
“दूध नही, अंडा नही, ओ कल पाणी के दो बाटले ले आया ओ अच्छा हुआ नही तो देखो नीचे के दुकान मे आज पानी का छोटा बॉटल भी नही है”
“जय श्रीकृष्ण आप तो यही कहोगे ना की ये भी उसिकी गलती है …कुछ भी हुआ उसिकी वजह से हुआ है ने…दो गाली”
“हॅलो..हां…नेटवर्क थोडं… हां सेफाव… टीव्हीवर दाखवलालेत? हो पाणी आहे, पाऊस थांबलायपन दोन घंटे झालं..काळजी करनुका..व्हय.. हां..ठिवतो”
“इतने साल में बिवी को कभी कॅडललाइट डिनर नही कराया अब ओ रोज करा रही हैं”
“जा मम्मीचा फोन आण जा, इथं वाचमनअंकलच्या केबिनमध्ये चार्ज करून घेउत”
“साब आपका मोबाईल 50 टक्के हो गया ना बस है. सोबको चार्ज चाहीये, कल इनबरटरके लिये तेल लाना भी मुश्किल है”
“कल कूच बी हो मुजे काम पे जानाही पडेगा, emi है ना भाय”
“अहो काही जायचं नाही ऑफिसला काढून टाका म्हणावं, त्या रस्तोगी भाभीच्या मोनूचा मित्र काल रस्त्यात करंट लागून मेला म्हणे, तुम्ही नाही जायचं…”
“भावेस निकल गया…ऑफिस के लिये”
“तृप्तीबेन भावेस भाईचा नंबर द्या ना”
“नेटवर्क प्रॉब्लेम नुस्ता…. लागला एकदाचा.. भावेसभाई …कुठं पोहचा? खार रोड… उधर बारीश है? …ईदर से कम? …ट्रेन ?… लेट तो लेट चल रही है ना बस…”
“तुमच्या ब्येगेत उद्याचे कपडे ठिवलेत, फोन करा, लागला तर मी सांगते यायचं का नाही ते, नाही लागला तर थांबा ऑफिसमध्ये”
“आपण तर बरे गरिबाघरी काय वाट लागली आसंल…”
चुकचुक… चिडीचूप
नमस्कार मुंबईकर! परिस्थिती कशीही असो आपली मुंबई कधी थांबत नाही. सलाम मुंबईच्या या स्पिरिटला… फलाण्या ढिमकान्या fmवर फलाना ढिमकाना मी आपके साथ …
बॅकग्राउंडला ‘संदेसे आते है मुझे तडपाते है’ सुरु नसतानासुद्धा बॉर्डरवर निघाल्यासारखा. उरात घरची काळजी डोक्यात जड झालेल्या इयमआईचं टेंगशन अन खांद्यावर एक्सट्राच्या कपड्याचं ओझं घेऊन निघालेला मी मुंबईकर…
’साचल्या’ पाण्यातुन रस्ता काढत उशिरा धावणार्‍या लोकलची वाट बघत स्टेशनवर उभा…
आजही स्टेशनवर गर्दीच पण रोजच्यापेक्षा उगं नक्कर मिठाइतकी कमी.

- Advertisement -

-प्रसाद कुमठेकर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -