घरफिचर्सक्षयरोग समजून घेताना - भाग १

क्षयरोग समजून घेताना – भाग १

Subscribe

जगभरात कर्करोग हा सर्वात धोकादायक आजार असून, कमी वयात येणार्‍या मृत्यूंसाठी तो सर्वाधिक कारणीभूत आहे, असा आपला समज असतो. पुन्हा विचार करा! सीडीसीनुसार जगभरात क्षयरोग हा सर्वात धोकादायक आजार आहे. या रोगामुळे वर्षभरात (२०१७) १३ लाख मृत्यू झाले.

क्षयरोगाच्या नव्या रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण असणार्‍या ८ देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार २०१६ पर्यंत भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार रुग्ण होते. या ओझ्यात भर म्हणून एवढ्याच संख्येने मुलेही क्षयरोगग्रस्त आहेत.

- Advertisement -

या आजाराचे कारण काय?
क्षयरोग हा जीवाणूमुळे (मायक्रेबॅक्टेरिअम प्रजाती) होणारा रोग आहे. हा जीवाणू सामान्यपणे फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि काही वेळा चेतासंस्था, हाडे व सांधे, प्रजनन-मूत्र यंत्रणेवरही याचा परिणाम होतो. हा जीवाणू हवेवाटे पसरतो, त्यामुळे विकसनशील देशांमध्ये आणि आरोग्याबाबतची स्वच्छता कमी असलेल्या ठिकाणी तो झपाट्याने फैलावतो.

या आजाराचे तीन टप्पे पुढीलप्रमाणे :

सुरुवातीचा संसर्ग / प्राथमिक टप्पा : एखादी व्यक्ती हवेतील जीवाणू
श्वसनाद्वारे आत घेते, तेव्हा या रोगाची लागण होते. क्षयरुग्णाचा खोकला, शिंक आणि थुंकी या वाटे हा रोग पसरतो. त्यामुळे तुम्ही सुदृढ असाल आणि स्वच्छता राखत असाल तरी सार्वजनिक अस्वच्छतेच्या ठिकाणांमुळे तुम्हाला या रोगाची लागण होऊ शकते. बहुतेक वेळा आपली प्रतिकारक यंत्रणा या जीवाणूवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते (त्यामुळे प्रत्येकालाच क्षयरोग होत नाही), पण ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल (एचआयव्ही पॉझिटिव्ह, मधुमेही इ.) त्यांना प्राथमिक संसर्ग झाल्यानंतर काही आठवड्यांमध्ये सक्रिय क्षयरोगाची लक्षणे दिसू लागतात.

- Advertisement -

सुप्तावस्था : हा टप्पा म्हणजे, जीवाणूचा संसर्ग झाल्यानंतर तो सुप्तावस्थेत असतो. प्रतिकार यंत्रणा कमकुवत होईपर्यंत हा जीवाणू प्रतीक्षा करतो. त्यामुळे आयुष्यभर क्षयरोगाचा जीवाणू आपल्या शरीरात आपण बाळगून असू शकतो, पण क्षयरोग विकसित होत नाही, असेही घडू शकते, पण वयोमानपरत्वे किंवा इतर आजारामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत झाली तर हा जीवाणू पुन्हा सक्रिय होतो. त्यामुळे असा धोका असलेल्या व्यक्तींना ओळखणे आवश्यक असते जेणेकरून हा संसर्गाचा फैलाव होण्याला प्रतिबंध घालता येईल.

सक्रिय टप्पा : या जीवाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये क्षयरोगाची लक्षणे दिसू लागतात आणि ही व्यक्ती इतरांनाही त्याचा संसर्ग करू शकते. यात चिंताजनक बाब ही की, सक्रिय क्षयरोग झालेली व्यक्ती वर्षभराच्या कालावधीत ज्यांच्या नियमित संपर्कात असते अशा १०-१५ व्यक्तींना क्षयरोगाचा संसर्ग करू शकते.

-डॉ. समीर गर्दे – कन्सल्टंट पल्मोनोलॉजीसेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -