एमआयएम प्रकाश आंबेडकरांचे समर्थन करणार – वारिस पठाण

माय महानगरच्या विशेष कार्यक्रमात एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी उपस्थिती लावली. राजकारण, काश्मीर प्रश्न, मतदारसंघातील प्रश्न याबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. आगामी निवडणुकीत एमआयएम पक्षाचे समर्थन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना असे असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Mumbai
We support Dalit leader Prakash Ambedkar said AIMIM MLA Waris Pathan
वारिस पठाण

महाराष्ट्रच्या राजकारणात विरोधकांवर जबर टीका करून एमआयएमचे आमदार वारिस पठाण हे नेहेमी चर्चेत राहीले आहेत. वकीली पासून ते एक राजकीय नेत्यापर्यंत असा त्यांचा जीवन प्रवास आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्ट असो किंवा सलमान खान हिट- एन- रन केस असो वारिस पठाण यांनी पूर्न हिमंतीने खटले लढवले आहेत. या खटल्यांमुळे पठाण यांच्या जीवनात कसे बदल घडत गेले या बद्दल आपलं महानगर/ माय महानगरशी पठाण यांनी खुल्लम खुल्ला या कार्यक्रमात चर्चा केली. या कार्यक्रमात त्यांनी दिलखूलास गप्पा मारल्यात. राजकीय जीवना व्यतिरिक्त त्यांच्या खासगी जीवनाबाबातही अनेक गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. एमआयएम पक्षाने केलेली काम, भाजप आणि काँग्रेसबद्दल त्यांचे मत आणि स्थानिकांचे प्रश्न याबद्दल त्यांनी माहिती दिली. फेसबुकवरून वारिस पठाण यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरे त्यांनी या कार्यक्रमात थेट दिली.

आंबेडकरांचे समर्थन करणार

आमचे समर्थन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आहे. लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच त्यांना फसवले. पूर्वी लोकांसमोर दोनच पक्ष होते. काँग्रेस लोकांना घाबरवून त्यांची मत घेत होती. भाजप याचाच फायदा घेऊन सत्तेवर आली. मात्र विकास न झाल्यामुळे लोकांची निराशा झाली. आता लोकांना काही बदल हवा आहे. पक्षातील वरिष्ठांनी केलेली टीका हे लोकांना झालेल्या त्रासातूनच येते. विरोधकांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा पण होत नाही, मात्र आम्ही थोडीही टीका केली तर त्याच्यावरून लगेच आम्हाला चुकीचे ठरवले जाते. एमआयएम पक्ष हा टीकांमुळेच चर्चेत आला आहे. मात्र आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून टीका करतो.

मतदार संघातील प्रश्न

आगामी निवडणुकीत समाजवादी पार्टीचे रईस शेख, काँग्रेसचे मधू अण्णा चव्हाण, गीता गवळी, शिवसेनेकडून यशवंत जाधव हे उमेदवार मतदारसंघातील तगडं आव्हान म्हणून ठरणार आहेत. मात्र आम्ही लोकांच्यासोबत राहिलो, त्यांची कामे केली आहेत बाकी हरणे-जिंकणे हे अल्लाच्या हातात आहे. आठड्यातून तीन दिवस मी टिव्ही चॅनलवर जातो. आपल्या अधिकारांचा आवाज उठवण्यासाठी मी टीव्ही चॅनलवर जातो. मात्र लोकांसाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे सकाळी १० पासून ते रात्री १२ पर्यंत खूले आहेत. माझ्या मतदारसंघात कमकूवत इमारती, गटारे, नाले दुरूस्ती अशा समस्या आहेत. या कामांना मी येत्या निवडणुकांमध्ये प्राधान्य देणार आहे. माझ्या कार्यकाळात १०३ इमारतींची दुरूस्ती झाली. अनेक इमारती १०० वर्षांहून अधिक जूण्या आहेत. मात्र सरकार निधी देत नसल्यामुळे काही इमारतींचे दुरूस्तीकरण थांबले आहे. निधीअभावी अनेकांच्या इमारतींचे दुरूस्त झाल्या नाहीत. दुर्घटना घडल्यावर सरकार मृतांना मदत देते मात्र जीवंतपणीच जर सरकार त्यांच्या इमारती दुरूस्त करेल तर दुर्घटना होणारच नाहीत. लोकांना ड्रग्स किंवा अम्लीपदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही मेडीकल कॅम्प सुरु कलेत. लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे पथक काम करते. रोजच्या जीवनात ज्या समस्या निर्माण होतात अशा मुद्द्यांना घेऊन आम्ही येत्या निवडणुकीत उतरणार आहोत. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे १२८ नगरसेवक आहेत ते याच दिशेने काम करतात.

काश्मीर मुद्दा

काश्मीर मुद्याचे खरे कारण सरकार आहे. चारवर्ष सत्तेत असताना सरकारने काश्मीरसाठी काही केले नाही. सरकारकडे पॉलिसी नाही त्यामुळे काश्मीरची अवस्था अजूनही बिघडत चालली आहे.