घरफिचर्सव्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग आणि विमा सेवा

व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग आणि विमा सेवा

Subscribe

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात फेसबुक-ट्विटर-लिंक्डइन-इन्स्टाग्राम या सोशल-मीडियाने ठाण मांडलेले आहे. त्याचा उपयोग केवळ टाईमपाससाठी न करता ‘सेवा -सर्विस’ साठी करावा हे ओघाने आलेच. म्हणून तर इतर सर्विस सेक्टरप्रमाणे (हॉटेल -तिकीटबुकिंग-रेल्वे-विमान कंपन्या) बँकिंग-विमा क्षेत्राने वॉट्सअ‍ॅपवर सेवा देऊ केलेली आहे. म्हणजे नेमके काय? ती कोणाला व कशा प्रकारे मिळू शकते? यात काही धोके आहेत का? हे आपण पाहणार आहोत.

चार भिंतीच्या आड असलेली बँकिंग व्यवस्था आता ग्राहक-सेवा देण्यासाठी थेट संपर्क-कक्षेत येत आहेत. महंमदाने पर्वताकडे जावे की, पर्वताने महंमदाकडे याच धर्तीवर असे म्हणता येईल की, पूर्वी ग्राहक बँकेकडे जायचा आणि आज बदलत्या जमान्यात बँकाच आता कस्टमर मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करताना दिसत आहेत. याला कारण बँका-बँकांमध्ये असलेली तीव्र स्पर्धा. शिवाय ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा तुफान वाढलेल्या आहेत. कोणे एकेकाळी पैसे ठेवणे आणि काढणे इतकी पारंपरिक सेवाच अधिक प्रमाणात वापरली जायची. काळानुरूप बदल घडत गेले. त्यातील जे सोप्पे व सोयीचे होते ते राहिले आणि जवळपास सर्वच बँकांनी स्वीकारले. फरक असला तर सेवेच्या किमतीचा व गुणवत्तेचा.

- Advertisement -

एकेकाळची चार भिंत-कागदी रजिस्टर्स यात अडकलेली बँक संगणकीकरण आणि इंटरनेट यांच्या विस्ताराने पेपरलेस होत चालली आहे. तसेच डीजिटल होण्याच्या दिशेने हायस्पीडने प्रवास सुरू झालेला आहे. दरम्यान आपल्या प्रत्येकाच्या जीवनात फेसबुक-ट्विटर-लिंक्डइन-इन्स्टाग्राम या सोशल-मीडियाने ठाण मांडलेले आहे. त्याचा उपयोग केवळ टाईमपाससाठी न करता ‘सेवा -सर्विस’ साठी करावा हे ओघाने आलेच. म्हणून तर इतर सर्विस सेक्टरप्रमाणे (हॉटेल -तिकीटबुकिंग-रेल्वे-विमान कंपन्या) बँकिंग-विमा क्षेत्राने वॉट्सअ‍ॅपवर सेवा देऊ केलेली आहे. म्हणजे नेमके काय? ती कोणाला व कशा प्रकारे मिळू शकते? यात काही धोके आहेत का? हे आपण पाहणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅपच का? कशासाठी?- कोणतीही नवी गोष्ट सहजासहजी न स्वीकारणारे आपण हळूहळू नवीन साधन-सुविधा स्वीकारतो आणि पुढे तर अक्षरशः आहारी जातो, इतके की, दिवस-रात्र आपल्याला त्याखेरीज चैनच पडत नाही. जे मोबाईलचे झाले तेच नंतर सोशल मीडियाचे झाले. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपशिवाय आपण काही क्षण राहू शकत नाही. एक मात्र झाले आहे की, यातून काही व्यवसाय होऊ शकतो हे कळल्याने राजकीय पक्षांनी त्याला प्रचाराचे (चिखल-फेकीचे) माध्यम बनवले, तर व्यावसायिक कंपन्यांनी तसेच बँकांनी मार्केटिंगचे शस्त्र म्हणून वापरले. शिवाय नवी सेवा देणारे साधन म्हणूनदेखील उपयोगात आणून एकूण बिझनेस-विश्वच विस्तारले गेले आहे.

- Advertisement -

पहिली-वहिली व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा आणि आपल्याकडील प्रारंभ-जगातील अशी सेवा प्रथम सुरु करण्याचे श्रेय आफ्रिकेतील एबीएसए समुहाच्या (बार्कलेज) बँकेला जाते. बँकिंग अधिक सुलभ-जलद करण्याच्या हेतूने ‘चिट-चाट मेसेजिंग’ सेवा उपलब्ध केली, ज्याद्वारे त्यांनी आपल्या ग्राहकांना बेसिक बँकिंग सेवा-तात्काळ व्यवहार इत्यादी सेवा देऊ केली. ई-बँकिंग देणार्‍या या समुहाने सोशल मीडिया बँकिंगचे अनोखे दालन खुले केले. आणि बघता-बघता अनेक परदेशी बँकांनी आपली कार्यक्षमता-सेवा-प्राधान्य अधोरेखित करण्यासाठी पुढाकार घेतला.

आपल्या देशात अशी पहिली सेवा सुरू करण्याचा मान-कोटक बँक या खाजगी बँकेने मिळवला, पाठोपाठ सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सारस्वत बँकेने ‘बँक ओंन व्हॉट्सअ‍ॅप’ म्हणत दमदार सुरुवात केली आहे आणि आपणही खाजगी व परदेशी बँकेच्याइतकेच अग्रेसर आहोत हे दाखवून दिले आहे.

व्हॉट्स-अ‍ॅप बँकिंग-सेवेची वैशिष्ठ्ये –
सोपी-सुरक्षित
अहोरात्र म्हणजे (24 x 7)
लोकिंग सिस्टीम
इंग्रजीत आणि स्थानिक भाषेत उपलब्ध
थेट नोंदणीकृत मोबाईलपुरती सीमित
व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगसाठी काही किमान अटी-काही अपेक्षा अनिवार्य असतात –
१) तुमच्याकडे स्मार्ट-फोन असणे आवश्यक आहे. कारण साध्या मोबाईलवर अशी सेवा मिळू शकणार नाही. ज्यांच्याकडे फेसबुक, व्हॉट्स-अ‍ॅप, इन्स्टाग्राम असे काय काय असते त्यांच्याकडे स्मार्टफोन असतोच
२) अशी सेवा उपलब्ध व्हावी म्हणून बँकेकडे मोबाईल नंबरची नोंदणी आवश्यक असते,त्याशिवाय अशी सेवा सुरू होत नाही.
३) मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे जरुरीचे
मोबाईल बँकिंगचे फायदे –
१) वेळेची बचत – जलद-सेवा
२) ब्रांच किंवा एटीएम बुथवर जाण्याची गरज नाही
३) तुमच्या अडचणी-प्रश्नांचे लागलीच निवारण -इन्स्टन्ट
४) उच्च-दर्जाची ग्राहक-सेवा
५) सेवेतील सातत्य आणि सततचा संपर्क
६) व्यक्तिगत सेवा
७) अन्य साधने आणि सेवांची अद्ययावत माहिती

मोबाईल बँकिंग -काही अडचणी, तोटे –
१) मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास तात्पुरती गैरसोय होऊ शकते. पण वेळीच कळवल्यास आधी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरला ‘ब्लॉक’ करून नवीन मोबाईल नंबरची नोंदणी करून सेवा पुन्हा मिळवता येते.
२ ) तात्पुरत्या तांत्रिक अडचणी आल्या तरी त्यावर त्वरित हालचाली होऊन सेवा पुनश्च सुरू होऊ शकते.
३) संपूर्ण सिस्टीम चोरली गेली किंवा काही सार्वत्रिक व्हायरस उद्भवल्यास काही काळ सेवा खंडित होऊ शकते
४) सायबर दरोडा किंवा तत्सम प्रकार झाल्यास त्याचा फटका बसू शकतो.
५) मोबाईल आणि इंटरनेट सेवेबाबत असलेल्या अडचणी इथेदेखील अनुभवास येऊ शकतात.

मोबाईल-बँकिंगतर्फे खालील प्रकारच्या सोयी-सुविधा मिळू शकतात-
१) बँकेतर्फे माहिती संदेश
२) खात्यातील रक्कम पाहणे
३) खात्याचे मिनी-स्टेटमेंट (तीन किंवा पाच दिवसांचे व्यवहार दर्शवणारे)
४) केवायसीबाबत
५) मोबाईल बँकिंगसाठी नोंदणी
६) ई-मेल आयडी नोंदणी
७) ग्राहक म्हणून केलेल्या तक्रारींचे निवारण
८) मोबाईल-बँकिंगची नोंदणी रद्द करणे

आता विमा-सुविधादेखील मोबाईलवर -बँकिंग आणि इन्शुरन्स ही खरे तर भारतीय अर्थव्यवस्थेतील जुळी भावंडे म्हणता येतील. साहजिकच आहे की, एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान आले तर दुसरीकडेही त्याचा वापर होणार. व्हॉट्स-अ‍ॅपचा आपल्या समाजात वाढलेला वापर पाहून बँकिंगप्रमाणे विमा-कंपन्यादेखील या लोकप्रिय समाज-माध्यमाचा विचार करू लागले. फेसबुकपेक्षा हे थेट ग्राहक-संपर्क म्हणून शिवाय व्यक्तिगत माहिती-व्यवहारासाठी सुरक्षित मानले गेले आहे, म्हणून तर केवळ माहितीचे साधन म्हणून न पाहता काही व्यावहारिक कामासाठी वापर करण्याचा विचार केला गेला. त्यातूनच बँकिंग व्यवहार मोबाईलवर आले. इन्शुरन्स कंपन्यादेखील येतील. नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार दिल्लीतील एका खाजगी विमा कंपनीने -भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीने मोबाईलवर विमा-सेवा सुरू करण्याचा ‘पहिला मान’ मिळवलेला आहे. विमासंदर्भातील सेवा-सुविधा आणि विमा पॉलिसी खरेदी करण्याची सोय असणार आहे.

सेवा-विस्तार स्वागतार्ह आहे, पण सुरक्षितता महत्वाची-इंटरनेट पाठोपाठ मोबाईल आणि स्मार्टफोन अशी माध्यम-क्रांती झाल्यावर केवळ टाईमपास आणि करमणूक याकरिता वापर न करता बिझनेस-व्यापार वृद्धीसाठी करणे हे अपरिहार्य. हे तसे आपण उपभोक्ते-ग्राहक म्हणून नक्कीच स्वागतार्ह आहे. कारण आजकाल आपले जीवन इतके वेगवान झालेले आहे की, वेळ वाचवणारी आणि आपल्याला बसल्याजागी-एका बोटावर -क्लिकने मिळणारी सेवा ही मस्त आणि मस्टच वाटते. त्यासाठी आपण हवे ते पैसे मोजायला व काही अटी स्वीकारायला राजी असतो. त्यासाठी अधिकचा पैसा-वेगळे शिकण्यासदेखील राजी होतो (एरवी आपल्याला नवे काही शिकणे नको वाटते. डोक्याला ताप.)

हे सगळे सोयीचे असले तरीही ‘जोखीम’ हा मुद्दा तितका लक्षात घेत नाही. ते आपले काम नाही, सुविधा देणार्‍यांनी काय ते बघून घ्यावे. असाच आपला बाणा असतो. पुढे काही गफला झाला तर त्यांना ब्लेम करण्यासाठी आपणच पुढे सरसावतो. त्याआधीच आपण जर सावधपणे चौकशी केली, माहिती मिळवली तर आपला सजगपणा दिसून येतो. ग्राहकच जागरूक असेल तर कुणी फसवणूक करण्याची किंवा गैर-फायदा घेण्याची चूक करणार नाही. तसेच कोणी नेट-शर्विलक (हॅकर) सायबर दरोडे टाकून यंत्रणा लंपास करत आपल्याला फसवू शकणार नाहीत. सतर्कतेचा नक्कीच भल्याची ठरू शकते. आजच्या जगात अनेक प्रकारच्या जोखमीना आपल्याला सामोरे जावे लागते. नवनवीन साधने आणि सोयी वापरात असताना आपणही जागृत आणि काळजीपूर्वक व्यवहार केले, तर अशा आधुनिक गोष्टी नक्कीच लाभदायक ठरतील आणि पुढे मनस्तापाचे -आर्थिक नुकसानीचे साधन म्हणून ठरणार नाहीत.

-राजीव जोशी-बँकिंग व अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -