घरदेश-विदेशकोलकात्यात ज्यांची मूर्ती तोडली ते विदयासागर कोण होते?

कोलकात्यात ज्यांची मूर्ती तोडली ते विदयासागर कोण होते?

Subscribe

विद्यासागर हे पुरोगामी समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलींच्या शाळांची सुरूवात असो, नाहीतर विधवांचा पुनर्विवाह, हे त्यांच्याच प्रयत्नांचे फलीत होते. काल अमित शाह यांच्या रॅली दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी विद्यासागर महाविद्यालयातील त्यांचा पुर्णाकृती पुतळा तोडल्याचा आरोप आहे

कोलकाता हिंसाचारानंतर विद्यासागर यांचे नाव सध्या माध्यमांतून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. त्यांच्या पुतळा फोडल्यानंतर संतप्त झालेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवरील ‘डीपी’ (छायाचित्र) बदलून त्याजागी विदयासागर यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यार प्रेरणेतून सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाची मोठीच कोंडी फुले दाम्पत्याने फोडली आणि तेव्हापासून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पश्चिम बंगालमधील विद्यान, दार्शनिक विद्यासागर म्हणजेच ईश्वरचंद्र बंदोपाध्याय हे स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांच्यार प्रयत्नांमुळेच कोलकाता आणि परिसरात मुलींच्या शाळा सुरू झाल्याकोलकाता आणि हावडा यांना जोडणाऱ्या पुलाला विदयासागर यांचे नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

द्रष्टे विचारवंत आणि समाजसुधारक होते विदयासागर

२६ सप्टेंबर, .. १८२० जन्मलेले ईश्वर चंद्र विद्यासागर हे थोर संस्कृत विद्वान होते . कलकत्याच्या फोर्ट विलियम कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. बंगाली भाषेच्या पुनरुत्थानात त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांचे मूळ नाव ईश्वरचंद्र बंदोपाध्याय होते. विद्यासागर अनेक विद्यापारंगत होते. त्यांनी बंगाली भाषेतील लिखाणाचे सुलभीकरण करण्यास हातभार लावला तसेच बंगाली लिपीचेही सुलभीकरण केले. ते एक दार्शनिक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, अनुवादक, मुद्रक, प्रकाशक आणि समाजसुधारकही होते. त्या काळी हिंदू समाजातील विधवांची स्थिती अतिशय शोचनीय होती. विद्यासागर यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी लोकमत तयार केले. इतके नव्हे तर आपल्या एकुलत्या पुत्राचा विवाह त्यांनी एका विधवेसोबत लावला होता. त्यांच्याच प्रयत्नाने १८५६मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारित झाला.

विद्यासागर यांचे जन्मस्थळ (सौजन्य : विकीपीडिया)

 विधवा पुनविर्वाहासाठी प्रयत्न; बंगाली भाषेसाठीही काम

विदयासागर यांना सुधारणांच्या संदर्भात राजा राममोहन राय यांचे उत्तराधिकारी समजले जाते. विधवांच्या पुनर्विवाहांसाठी त्यांनी आंदोलनही केले. १८५६ ते १८६० या काळात त्यांनी २५ विधवांचे पुनर्विवाह लावले. तर मुली व महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बैठुने शाळांची स्थापना केली. तसेच एकूण ३५ शाळा सुरू केल्या. ते एक उत्तम लेखक आणि द्रष्टे विद्वान होते. एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. बंगाली भाषेला सरळ आणि सोपी बनविण्यात तिचे पुरूत्थान करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांनी बंगाली वर्णमालेला सरळ आणि सोप्या पद्धतीने तयार केले. बांग्ला भाषा शिकण्यासाठी त्यांनी शेकडो शाळा स्थापन केल्या, त्यात रात्रशाळांचाही समावेश होता. त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठीही प्रयत्न केले. आपल्या शैक्षणिक काळात ते एक बुद्धीमान विद्यार्थी होते. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना ज्ञानाचा सागर असे संबोधले होते. वयाच्या ७० व्या वर्षी १८९१ मध्ये त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -