घरफिचर्सशहरात जंगली नक्षलवाद्यांचे प्रस्थ

शहरात जंगली नक्षलवाद्यांचे प्रस्थ

Subscribe

कालपर्यंत कलाकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरी नक्षलवादी असल्याचे सिद्ध झालेले होते. आता मात्र जंगली नक्षलवादी शहरात येऊन सुप्तावस्थेत राहत आहेत. भारतात दहशतवादाची पाळेमुळे खोलवर पसरली आहेत. तसेच आता नक्षलवादाविषयी झाले आहे. जंगली नक्षलवादी आकाश मुर्मू याचे चाकणमध्ये वास्तव्य करण्यामागील काय हेतू होता?, बिहारमधील नक्षलवादी चाकणमध्ये कसा आला?, पुण्यात किंवा महाराष्ट्रात नक्षलवादी कारवाया करण्याचा त्याचा उद्देश होता का?, या प्रश्नांची उत्तरे कालांतराने तपासात मिळतीलच. एक मात्र खरे, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर आदी राज्यांमध्ये सीमित असलेला जंगली नक्षलवाद आता शहरातही पसरू लागला आहे. बिहारमधील नक्षलवादी महाराष्ट्रात येतो आणि त्याही पुढे जाऊन तो महाराष्ट्रातील जंगली भागात वास्तव्य करण्याऐवजी राज्यातील ‘सांस्कृतिक शहर’ किंवा ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात वास्तव्य करतो, हे भयानक आहे.

मागील काही दिवसांपासून पोलिसांना शोधात असलेला नक्षलवादी आकाश मुर्मू याला बिहार पोलिसांनी पुण्यातील चाकणमध्ये अटक केली. पोलिसांचे हे मोठे यश मानले जाते. आकाश याच्या देशविघातक कृत्याची यादी मोठी आहे. 2013 मध्ये झारखंडमधील पातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमरजित बलीहार यांच्या गाडीवर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्यामागे आकाश याचा हात होता. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याने बिहारमधील काही मतदान केंद्रांवर बॉम्ब फेकून ती उडवली होती. त्याच्यावर 1 लाखाचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. त्यामुळे अशा नक्षलवाद्याला अटक होणे, हे स्वाभाविक असले तरी त्याला पुण्यात अटक होणे, ही गंभीर आहे. अटक होण्याआधी काही दिवस हा नक्षलवादी चाकण येथे मजूर म्हणून काम करत होता. वरवर अगदी सामान्य नागरिकासारखे जीवन जगणारा आकाश एक कट्टर नक्षलवादी होता, हे त्याच्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांनाही कळत नव्हते. म्हणूनच ही बाब आता अधिक चिंताजनक बनली आहे.

भविष्यात समाजामध्ये सामान्य नागरिक म्हणून वावरणारी माणसेही नक्षलवादी असू शकतात. ही शक्यता कालपर्यंत वाटत होती, आता ती वस्तुस्थितीत परिवर्तीत झालेली आहे. हे नक्षलवादी मजूर असू शकतात, टपरीवर वडापाव विकणारे, कामगार किंवा अन्य कोणीही असू शकतात, हे लक्षात घ्या. कालपर्यंत कलाकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरी नक्षलवादी असल्याचे सिद्ध झालेले होते, आता मात्र जंगली नक्षलवादी शहरात येऊन सुप्तावस्थेत राहत आहेत. भारतात दहशतवादाची पाळेमुळे खोलवर पसरली आहेत, तसेच आता नक्षलवादाविषयी झाले आहे. जंगली नक्षलवादी आकाश याचे चाकणमध्ये वास्तव्य करण्यामागील काय हेतू होता?, बिहारमधील नक्षलवादी चाकणमध्ये कसा आला?, पुण्यात किंवा महाराष्ट्रात नक्षलवादी कारवाया करण्याचा त्याचा उद्देश होता का?, या प्रश्नांची उत्तरे कालांतराने तपासात मिळतीलच. एक मात्र खरे, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर आदी राज्यांमध्ये सीमित असलेला जंगली नक्षलवाद आता शहरातही पसरू लागला आहे. बिहारमधील नक्षलवादी महाराष्ट्रात येतो आणि त्याही पुढे जाऊन तो महाराष्ट्रातील जंगली भागात वास्तव्य करण्याऐवजी राज्यातील ‘सांस्कृतिक शहर’ किंवा ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात वास्तव्य करतो, हे भयानक आहे.

- Advertisement -

पुणे आणि नक्षलवादी यांच्यातील नाते तसे जुने आहे. या नात्यावर प्रकाश पडला, तो ‘कबीर कला मंच’च्या कारवायांमुळे. शीतल साठे आणि सचिन माळी यांना काही वर्षांपूर्वी अटक झाल्यानंतर या ‘कम्युनिस्ट कला मंच’चा नक्षली तोंडवळा समाजाच्या समोर आला. गावोगावी जाऊन गाणी म्हणत फिरायचे आणि तरुणांची डोकी भडकवायची, हे यांचे काम. ही गाणी म्हणजे क्रांतीला उद्युक्त करणारी गाणी. येथे ‘क्रांती’ म्हणजे ‘कम्युनिस्टांना अभिप्रेत क्रांती’! त्यामुळे येथे राज्यव्यवस्था उलथवून टाकणे आणि त्यासाठी ‘सशस्त्र’ क्रांती अभिप्रेत आहे. अशा प्रकारे लढा देणे वगैरे आवाहनांना तरुणही भूलतात. अशांना नक्षलवादी चळवळींमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना रक्तरंजित कृती करण्यास उद्युक्त केले जाते. सामान्य तरुण ते नक्षलवादी बनणे हे धीम्या गतीने विषप्रयोग करण्यासारखे असते. हे काम शहरी नक्षलवादी करत असतात. या विषप्रयोगाचा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्यातून 9 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार नामक युवक छत्तीसगडमध्ये नक्षलवादी म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि चित्रे काढणारा हा युवक कबीर कला मंचच्या संपर्कात आला अन् होत्याचे नव्हते झाले. हीच कथा प्रशांत कांबळेची. पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि त्यानंतर अटक करण्यात आलेले शहरी नक्षलवादी हे प्रकरण सर्वांना ठाऊकच आहे. या सर्व घटनांवरून पुणे नक्षलवाद्यांचा अड्डा बनत चालल्याचे आपल्या लक्षात येईल.

नक्षलवाद्यांमध्ये 2 प्रकार आढळून येतात. एक म्हणजे शस्त्र चालवणार्‍यांचा गट, तर दुसरा ‘वैचारिक’ शस्त्र चालवणार्‍यांचा गट. दोघांचाही उद्देश हा हिंसाचार घडवणे हाच आहे. या दोघांमध्ये वैचारिक नक्षलवादी ओळखता येणे कठीण असते. कारण हे सर्वजण विचारवंत, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते अथवा मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून वावरत असतात. त्यांना वलय असते. सामाजिक परिवर्तन किंवा समाजकार्य या गोंडस नावाखाली ते तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना नक्षलवादाकडे वळवतात. गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, परेरा आदी शहरी नक्षलवादी वैचारिक शस्त्रे चालवून तरुणांची माथी भडकवत होती, जे सध्या गजाआड आहेत. आणखी गंभीर गोष्ट म्हणजे या शहरी नक्षलवाद्यांचे पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी असलेले संबंध. भारताला नेस्तनाबूत करू पाहणार्‍यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहाय्य मिळत आहे, हे यातून अधोरेखित होते. भारत तेेरे टुकडे होंगे, असे म्हणणार्‍यांना भारतातील काही प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे ही ‘भारताचे नायक’ म्हणून रंगवतात. यातून आपल्याला शहरी नक्षलवाद भारतातील कोणकोणत्या क्षेत्रात फोफावला आहे, हे दिसून येते.

- Advertisement -

अशांना ताळ्यावर आणण्यासाठी विशेष कायदे हवेतच; मात्र त्याहून अधिक शहरी नक्षलवादी जे तरुणांचा बुद्धिभेद करतात, त्यांचा सक्षमपणे वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे. विचार पालटले की कृती पालटते, या सिद्धांतानुसार तरुणांवर ‘नक्षली’ विषप्रयोग होऊ नये, यासाठी त्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देणे, व्यवस्थेतील त्रुटी संयत आणि वैध मार्गाने कशा दाखवायच्या अन् त्या दुरुस्त करायच्या, याचे कंगोरे समजावून सांगितले पाहिजे. अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत तरुणांसमोर स्टॅलिन, लॅनिन यांचा आदर्श नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचा आदर्श ठेवणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटना, लोकशाही, संसदीय राज्यप्रणाली, न्यायव्यवस्था, पोलीस इत्यादी व्यवस्थांवरील विश्वास तरुणांमध्ये पुनर्जीवित केला पाहिजे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -