घरफिचर्स१९८३ चे ‘डार्क हॉर्स’

१९८३ चे ‘डार्क हॉर्स’

Subscribe

२५ जून १९८३ रोजी कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने भारताला पहिल्यांदाच विश्वचषक मिळवून दिला.

२५ जून १९८३. भारताच्या खेळविश्वातील सोनेरी दिवस. विश्वकप १९८३ चा अंतिम सामना कर्णधार कपिल देवच्या पष्ठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण भारतात एकच जल्लोष झाला. भारताच्या बेभरवशाच्या संघापुढे आव्हान होते ते बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचे. बेभरवशाचा संघ आणि क्रिकेटमधील बलाढ्य संघ त्यामुळे विश्वचषक भारत जिंकेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. मात्र, तरीही कपिल देवच्या पष्ठ्यांनी विश्वचषक जिंकण्याची किमया साधलीच. आतापर्यंत भारताने लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तीन वेळा विश्वचषक आपल्या नावे केला आहे. तीनही विश्वचषक भारतासाठी अविस्मरणीयच ठरले. मात्र, १९८३ साली कर्णधार कपिल देवच्या पष्ठ्यांनी जिंकलेला विश्वचषक विशेष नोंदीचा ठरला आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत. राष्ट्रीय खेळ क्रिकेट असणार्‍या इंग्लंडकडे त्यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद होते. भारतातर्फे कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वखाली सुनिल गावस्कर, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी (यष्टीरक्षक), यशपाल शर्मा, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील, श्रीकांत आणि बलविंदर संधू या संघाची विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. कर्णधार कपिल देवचा संघ इंग्लडला रवाना झाला. त्यावेळी ६० षटकांचा सामना असे. पहिल्याच सामन्यात भारतापुढे आव्हान होते बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचे. इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजच्या भेदक मार्‍याचा सामना करत भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात २६३ एवढी धावसंख्या उभी केली. या सामन्यात भारताकडून यशपाल शर्माने ८९ तर संदीप पाटील यांनी ३६ धावा केल्या. भारताकडून रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यामुळे ५४.१ षटकांतच वेस्ट इंडिजचा संघ २२८ धावांवर गारद झाला. भारताने पहिला सामना जिंकत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली.विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी कपिल शर्माच्या भारतीय फलंदाजांना त्यांच्या गटातील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे संघाशी कडवी झुंज द्यावी लागली. कर्णधार कपिल शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत उपांत्यफेरी गाठली.
२२ जून १९८३ रोजी इंग्लंडमधील मँचेस्टरच्या मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य लढत रंगली. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून मोहिंदर अमरनाथ यांनी या सामन्यात गोलंदाजीसह उत्तम फलंदाजीसुद्धा केली. त्यामुळे भारताने ५४.४ षटकांत २१७ धावा करत विश्वचषक १९८३ च्या अंतिम लढतीत धडक दिली. भारताचा उपांत्यफेरीपर्यंतचा प्रवास पाहता थोडा डळमळीत राहिल्याचे निदर्शनात येते. मात्र, बेभरवशाच्या भारतीय संघाने अंतिम लढत गाठली होती आणि तेच वास्तव होते. २५ जून १९८३ रोजी क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. बेभरवशाच्या भारतीय संघापुढे मागील सलग तीन वेळा विश्वचषकाचा अंतिम सामना गाठलेल्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचे आव्हान होते. फलंदाजी, गोलंदाजी या सर्वच बाबतीत वेस्ट इंडिज संघ भारतीयांपेक्षा सरसच होता. कस लागणार होता तो भारतीय संघाचा. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत हा सामना रंगला. दूरदर्शनच्या जमान्यात थेट प्रक्षेपणाच्या गैरसोईमुळे भारतीयांचे लक्ष रेडिओवरील समालोचनाकडे लागले होते. प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाला २ धावांवर पहिला धक्का बसला. भारताचे आघाडीचे फलंदाज सुनिल गावस्कर केवळ दोन धावा करून बाद झाले. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या भेदक मार्‍यापुढे ठरावीक फरकाच्या कालावधीत भारतीय फलंदाज ५४.४ षटकांत १८३ धावा करत तंबूत परतले. वेस्ट इंडिजसमोर माफक १८४ धावांचे आव्हान होते. भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये निराशजनक वातावरण होते. हे आव्हान वेस्ट इंडिज एक हाती पार करणार अशीच कुजबूज क्रिकेटप्रेमींमध्ये होती. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या षटकातच ५ धावसंख्येवर वेस्टइंडिजचा बिनिचा फलंदाज गॉर्डन ग्रीनीजला संधूंनी तंबूचा रस्ता दाखवला. भारतीयांनी जल्लोष केला. त्यानंतर डेसमॉन्ड हायनेस, सर विवियन रिचर्ड्स यांनी वेस्ट इंडिजच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाज मदनलालच्या अचूक गोलंदाजीने दोघांनाही परतीची वाट दाखवली. अशाप्रकारे केवळ ५७ धावसंख्येवर वेस्ट इंडिजने महत्त्वाचे तीन फलंदाज गमावले. लयात आलेल्या भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा सुरूच ठेवला. त्यामुळे १८३ धावांचा पाठलाग करणार्‍या वेस्ट इंडिज संघाला केवळ १४० धावाच करता आल्या. कर्णधार कपिल देवच्या बेभरवशाच्या संघाने १९८३ चा विश्वचषक भारताच्या नावे केला. भारतीयांनी तुफान जल्लोष केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील टीम कपिल देवचे जंगी स्वागत केले. मुंबईत दाखल होताच विजेत्या भारतीय संघाची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली. विश्वचषक १९८३ ला सुरुवात होण्यापूर्वी एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार किम ह्यूजने यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ ‘डार्क हॉर्स’ ठरेल असे त्याला वाटत असल्याची भविष्यवाणी केली होती. त्याच्या तोंडात साखर पडो. कारण खरच कर्णधार कपिल देवच्या संघाने विश्वचषक १९८३ भारताच्या नावे करत ऑस्ट्रेलियन कर्णधाराची डार्क हॉर्सची भविष्यवाणी खरी ठरवली. खरचं, १९८३ च्या विश्वचषकात भारत डार्क हॉर्सच्याच भूमिकेत दिसला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -