Tuesday, April 9, 2024
घरमानिनीReligiousDiwali 2023 : 'या' दिवशी आहे धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज

Diwali 2023 : ‘या’ दिवशी आहे धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज

Subscribe

भारत म्हणजे सण उत्सवांचा देश. सर्व सण साजरे करणे ही आपली परंपरा आहे. त्यातही दसऱ्या नंतर 20 दिवसांनी येणाऱ्या दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. प्रभु रामचंद्र रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परतले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्यावासीयांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून रोषणाई केली होती. रामाच्या स्वागतासाठी अवघी अयोध्यानगरी रंगीबेरंगी पानं फुलांच्या तोरणांनी सजली होती. दरवाजासमोर पणत्या लावून सुवासिनींनी रामाचे मनोभावे स्वागत केले होते. तेव्हापासूनच दिवाळीचे पर्व सुरू झाले. जे आजतागयत सुरूच आहे.

Diwali 2022: Wishes, Messages, images and greetings to share on Facebook, WhatsApp and messages - Times of India

- Advertisement -

 

नकारात्मकेच्या अंधारात सकारात्मतेचा दिवा लावून दाही दिशा उजळवून टाकणारा हा सण. पण, दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, रांगोळ्यांचे पर्व नसून खरेदी करण्याचेही पर्व आहे. यामुळे यास व्यापाऱ्यांचे पर्वही म्हणतात. या नवीन पर्वात कपड्यांबरोबरच, नवीन सामान, सोने, चांदी यासह अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. कारण या दिवसात खरेदी करणे शुभ मानले जाते.

- Advertisement -

Diwali – Let the Divine Lamps Dispel the Darkness of Our Ignorance – Sadhvi Bhagawati Saraswati

 

दिवाळसणात ज्या घरात वस्तूंची, धातूंची खरेदी केली जाते त्या घरात वर्षभर कसलीही कमतरता जाणवत नाही. कारण लक्ष्मी म्हणजे धन, समृद्धी आणि गुंतवणूकीची देवता. यामुळे भारतात दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर सोने चांदीची खरेदी केली जाते.

वसूबारस

Vasu Baras 2021: वसुबारसनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज । happy vasu baras 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi

 

ग्रामीण भागात वसूबारस पासून दिवाळीची सुरुवात होते. यावर्षी वसूबारस 9 नोव्हेंंबर रोजी आहे.

धनतेरस

Dhanteras 2023 | Dhanteras Shubh Muhurat & Puja Timing

 

 

दिवाळीच्या पहील्या दिवशी धनतेरस असते. ज्याला त्रयोदशी असेही म्हटले जाते. या दिवशी लोक देवीला प्रसन्न करण्यासाठी, भक्ती गीत, आरत्या, मंत्राचे पठण करतात. या दिवशी एक तरी लहान मोठ भांड खरेदी करतात. कारण या दिवशी भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. अपमृत्यू टाळण्यासाठीही यमदीपदान केले जाते. यावर्षी 10 नोव्हेंबरला धनतेरस आहे.

नरक चतुर्दशी

Narak Chaturdashi is the festival of beauty | Chhoti Diwali: रूप और लावण्य का पर्व है नरक चतुर्दशी | Hindi News, एस्ट्रो/धर्म

 

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी असते. मात्र, यंदा नरक चतुर्दशी तिसऱ्या दिवशी असणार आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करुन पायाखाली कारेटे फोडले जाते. श्रीकृष्णाची पूजा केली जाते. कारण याच दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. भारतात विविध राज्यात नरक चतुर्दशी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. काहीजण या दिवशी पहाटे उठून तेलाने स्नान करतात. नंतर महाकालिकेची कुंकू लावून पूजा केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी 12 नोव्हेंबरला आहे.

लक्ष्मीपूजन

LAKSHMI PUJA - November 12, 2023 - National Today

 

या वर्षी लक्ष्मीपूजन देखील 12 नोव्हेंबरला आहे. या दिवशी सायंकाळी घराघरात लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.

दिवाळी पाडवा

diwali padwa gift for husband for Sale OFF 77%

 

दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे. पाडवा हा साडेतीन मुहुर्तातील अर्धा मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे. यावर्षी पाडवा आणि बलिप्रतिपदा एकाच दिवशी 14 नोव्हेंबरला आली आहे.

भाऊबीज

Bhaubeej Images – Browse 4,685 Stock Photos, Vectors, and Video | Adobe Stock

 

यंदा भाऊबीज 15 नोव्हेंबर रोजी साजरे केले जाईल. या दिवशी बहीण भावाला ओवाळते.

 


हेही वाचा : Diwali 2023 : ‘या’ दिवशी साजरा केला जाणार वसुबारस

- Advertisment -

Manini