घरसणवारDiwali 2020: 'या' दिवशी साजरी होणार दिपावली; जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

Diwali 2020: ‘या’ दिवशी साजरी होणार दिपावली; जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

Subscribe

वेगवेगळ्या शहरात लक्ष्मीपूजनाचा असा असेल मुहूर्त

हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. दिपावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक, अज्ञानावर ज्ञान, वाईटावर चांगले आणि निराशेवर आशा देणारा सण म्हणजे दिपावली.

बर्‍याच ठिकाणी दिवाळी पाच दिवस साजरी केली जाते. धनतेरसच्या दिवसापासून दिवाळीचा सण सुरू होतो. यानंतर नरक चतुर्दशीला यम नावाचा दिवा लावण्याची देखील परंपरा आहे. दुसर्‍या दिवशी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्या दिवशी साजरा केला जातो. दरवर्षी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरी केली जाते. यंदा १५ तारीखेला अमवस्या असून देखील दिवाळी १४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

- Advertisement -

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

१४ नोव्हेंबर २०२० रोजी शनिवारी लक्ष्मीपूजन साजरी करण्यात येणार आहे. या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त १७:२८ ते १९:२४ असा असणार आहे. साधारण या पूजनाचा कालावधी १ तास ५६ मिनिटे असणार आहे.

प्रदोष कालावधी -१७: २८ ते २०:०७
वृषभ कालावधी – १७:२८ ते १९.२४

- Advertisement -

तर १४ नोव्हेंबर २०२० रोजी १४:१७ वाजता अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे. तर ही अमावस्या तिथी १५ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १०:३६ वाजता संपणार आहे.

वेगवेगळ्या शहरात लक्ष्मीपूजनाचा असा असेल मुहूर्त

नवी दिल्ली – सायंकाळी ०५: २८ ते ०७: २४
गुडगाव – सायंकाळी ०५: २९ ते संध्याकाळी ०७:२५
नोएडा ०५: २८ ते ०७: २३
जयपूर – सायंकाळी ०५:३७ ते ०७:३३
चंदीगड – सायंकाळी ०५: २६ ते ०७: २१
अहमदाबाद – सायंकाळी ०५:५७ ते ०७:५५
कोलकाता – संध्याकाळी ०४:५४ ते ०६:५२ दुपारी
चेन्नई – संध्याकाळी ०५:४१ ते ०७:४३
हैदराबाद – सायंकाळी ०५:४२ ते ०७:४२
मुंबई – संध्याकाळी ०६:०१ ते रात्री ०८:०१
बंगळुरू – संध्याकाळी ०५:५२ ते ०७:५४
पुणे – सायंकाळी ०५:५८ ते ०७:५९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -