मराठमोळे खणांचे ‘कंदील’

रुबाबदार, राजेशाही आणि तेजोमय करणारे कंदील सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या कंदीलाचे स्वरुप देखील अगदी पर्यावरणपूरक वस्तू वापरुन तयार करण्यात आले आहे. यामध्ये जरीच्या साड्यांचा काठ, खण, दोरा यांची जोड देत बनवलेले नाविन्यपूर्ण कंदील प्रत्येकाच्या पसंतिस उतरत आहेत.