Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर सणवार Dussehra 2020: यंदा दसरा कधी साजरा होणार? जाणून घ्या, दसऱ्याचा शुभ मुहूर्त

Dussehra 2020: यंदा दसरा कधी साजरा होणार? जाणून घ्या, दसऱ्याचा शुभ मुहूर्त

दसरा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, नवीन वस्तू खरेदी, शुभकार्य यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो.

Related Story

- Advertisement -

आश्विन शुद्ध दशमीला ‘दसरा’ किंवा ‘विजयादशमी’चा सण साजरा करतात. दसऱ्याचा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास सुरुवात होते. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. देवीने महिषासुर नावाच्या दुष्ट राक्षसाशी सलग ९ दिवस युद्ध करुन दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून ‘विजयादशमी’ या नावाने ओळखला जातो. दसरा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, नवीन वस्तू खरेदी, शुभकार्य यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो. यंदा या शुभ सणावर कोविड-19 चे सावट असल्याने विशेष खबरदारी घेत सण साजरा करणे आवश्यक आहे.

ज्योतिषांच्या मते या दिवशी केलेल्या नवीन कार्यात यश मिळतं. दसऱ्याच्या दिवशी श्रीराम, देवी आई दुर्गा, श्री गणेश आणि हनुमानाची पूजा करून कुटुंबाच्या चांगल्या होण्याची प्रार्थना केली जाते. आख्यायिका आहे की दसऱ्याला रामायण पाठ, सुंदरकांड, श्रीराम रक्षा स्रोताचे वाचन केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

यंदा दसरा कधी साजरा होणार

- Advertisement -

हिंदू पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी दसरा किंवा विजयादशमीचा सण २५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. दसऱ्याचा सण दिवाळीचा २० दिवस आधी दरवर्षी साजरा केला जातो. तसे यंदाचे नवरात्र ९ दिवसाचे नसून ८ दिवसातच संपत आहेत. यंदाच्या वर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत आहे. यंदा २४ ऑक्टोबर सकाळी ६ वाजून ५८ मिनिटापर्यंत अष्टमी आहे, त्या नंतर नवमी लागत आहे. त्यामुळे दसरा यंदा २५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.

रामाने रावणाचा वधही याच दिवशी केला म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याच्या दिवशी देशातील विविध भागांत करण्यात येते. सूराचा असूरावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो. यंदा २५ ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध दशमी असल्याने त्यादिवशी दसरा साजरा केला जाणार आहे.

हे आहेत शुभ मुहूर्त

- Advertisement -

२५ ऑक्टोबर रोजी ७ वाजून ४१ मिनिटापासून दशमी तिथीची सुरूवात होणार आहे.तर सकाळी १.५५ ते दुपारी २ वाजून ४० मिनिटा पर्यंत विजय मुहूर्त असेल. दुपारी पूजेचा मुहूर्त हा १.११ मिनिटांपासून ते ३.२४ मिनिटांपर्यंत असणार आहे. दरम्यान २६ ऑक्टोबर ८.५९ मिनिटांपर्यंत दशमी तिथी समाप्ती होणार आहे.

- Advertisement -