नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: रताळ्याची भाजी

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: रताळ्याची भाजी

आपल्यामध्ये उपवासाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे उपवास असताना काही न खाणारा आणि दुसरा उपवासाचे पदार्थ खाणारा. त्यामुळे जे उपवासाच्या दिवशी जे उपवासाचे पदार्थ खाणारे असतात, त्याच्यासाठी एक खास पदार्थ दाखवणार आहे. नवरात्रीमध्ये सलग नऊ दिवस उपवास असतात. अशा वेळी सतत एकच पदार्थ खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण साबुदाण्याच्या पदार्था व्यतिरिक्त एका वेगळा पदार्थ पाहणार आहोत. त्या पदार्थाचं नाव रताळ्याची भाजी असं आहे. आज आपण रताळ्याची भाजी कशी करतात हे पाहणार आहोत.

साहित्य –

  • तीन ते चार रताळे
  • तुप
  • किसलेलं खोबर
  • शेंगदाण्याचा कुट
  • साखर
  • मीठ
  • लाल मिरची
  • जिरे

कृती –

प्रथम आपण एक चमचा तुप कडईत गरम करून घ्यायचे. तुप वितळेपर्यंत रताळ्याची साल काढून त्याच्या छोटे काप करायचे. त्यामध्ये किसलेलं खोबरं घालायाचं. त्यानंतर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कुट घालायचा. साखर एक चमचा आणि मीठ चवीनुसार घालावं. मग हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तापलेल्या तुपात लाल मिरची आणि एक चमचा जिरे घालायचं. मग जिरे थोडं लालसर झाल्यानंतर तयार केलेलं रताळ्याचं मिश्रण त्यामध्ये घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे जिरे आणि तुप व्यवस्थित रताळ्याला लागलं गेलं पाहिजं. मग व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनिटं वाफेवर शिजवण्यासाठी ठेवायचं. पाच मिनिटांनंतर तुम्हीची रताळ्याची भाजी तयार होईल. रताळ्याची भाजी तुम्ही उपवासाला जरूर खाऊ शकता.