‘बाप्पा स्पेशल रेसिपी व्हिडिओ’ स्पर्धेचा निकाल पाहाण्यासाठी क्लिक करा!

ganpati recipe contest
गणपती बाप्पा रेसिपी स्पर्धा

यंदाच्या वर्षी सगळ्याच सणांवर कोरोनाचं सावट असल्याचं दिसून येत असताना लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सगळेच भक्त सज्ज झाले होते. आवश्यक त्या नियमांचं पालन करून घरोघरी त्याच उत्साहात बाप्पा विराजमान झाले आणि त्याच प्रेमळ आणि भरल्या मनाने बाप्पांना भक्तांनी निरोप देखील दिला. बाहेर कोरोना असला, तरी घराघरात मात्र वातावरण बाप्पामय झालं होतं. या वातावरणात लाडक्या बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली. गृहिणींच्या याच कौशल्याला वाव देण्यासाठी आपलं महानगर-माय महानगरतर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी स्पर्धा’ घेण्यात आली. महानगरतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इको फ्रेंडली स्पर्धेसोबत यंदा रेसिपी स्पर्धेचं हे पहिलं वर्ष होतं. पण त्याला गणेशभक्त गृहिणींनी जबरदस्त प्रतिसाद दिला. माय महानगरच्या वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये ही स्पर्धा दणक्यात पार पडली.

स्पर्धेच्या नियमांनुसार ज्या स्पर्धकाच्या रेसिपीच्या व्हिडिओला युट्यूबवर सर्वाधिक व्यूज मिळतील, त्या स्पर्धकाला विजेता म्हणून घोषित करण्यात येणार होतं. त्यामुळे ठरल्यानुसार व्यूजच्या आधारावर विजेते स्पष्ट झाले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळवणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचं आपलं महानगर – माय महानगरतर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

प्रथम पारितोषिक – रोख रुपये ३ हजार आणि सन्मानचिन्ह

नाव – ग्रीष्मा महाजन, पुणे
पदार्थाचे नाव – विड्याच्या पानाचे मोदक
परीक्षणावेळी व्यूज – २७०३


द्वितीय पारितोषिक – रोख रुपये २ हजार आणि सन्मानचिन्ह

नाव – मनिषा पालेकर, मुंबई
पदार्थाचे नाव – कोकोनट जगरी केक
परीक्षणावेळी व्यूज – २४५५


तृतीय पारितोषिक – रोख रुपये १ हजार आणि सन्मानचिन्ह

नाव – ज्योती पाटील, मुंबई
पदार्थाचे नाव – बाजरी-चणाडाळ खिचडा
परीक्षणावेळी व्यूज – २४३८