घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: अनिकेत मुळे यांच्या बाप्पाचा देखावा कोरोना योद्ध्यांना समर्पित

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: अनिकेत मुळे यांच्या बाप्पाचा देखावा कोरोना योद्ध्यांना समर्पित

Subscribe

यंदाच्या वर्षी अनिकेत मुळे यांनी गणपतीसाठी इको फ्रेंडली देखावा तयार केला असून त्यांनी यंदा बाप्पाचा देखावा साकारत कोरोनाच्या लॉकडाऊन् काळात आपत्कालीन सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांचे आभार मानले आहे. त्यांच्या बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीची असून १० इंचाची आहे. त्यांच्या घरी गणपती बाप्पा हा १० दिवसांचा असून त्या काळात आम्ही सगळे घरातले मिळून बाप्पाची खूप सेवा करतो, असे त्यांनी सांगितले आहे.

सजावट/देखाव्या बाबत माहिती

दरवर्षी प्रमाणे काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाला आणि मग सगळेच बदलले. या काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या आपत्कालीन परिस्थितीत सेवा दिली त्या कोरोना योध्यांचा सन्मान करण्यासाठी यंदा बाप्पाच्या सजावटीच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती अनिकेत मुळे यांनी दाखवली आहे.

- Advertisement -

या देखव्यामध्ये दाखवण्यासाठी वेगवेगळी घरे, हॉस्पिटल, वाडा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, बिल्डिंग, पोस्ट ऑफिस, मंदिर, झाडे झुडपे, पक्षी, प्राणी, रस्ता, रस्त्यावरील लाईट, माणसे जसे ( पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, धान्य वितरक, बँक कर्मचारी, दुध देणारा, पोस्ट ऑफिस, शेतकरी -भाजी विक्रेते व खरेदी करणारी माणसे सामाजिक अंतरा मध्ये) तसेच, वाहने जसे रुग्णवाहिका सेवा, ट्रक, घंटागाडी, चारचाकी, बुलेट, अक्टिवा, सायकल, हातगाडी, दाखवले आहे.

- Advertisement -

देखावा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य 

संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी जुने कार्ड बोर्ड बॉक्स, माऊन बोर्ड शीट, हॅण्ड मेड पेपर, क्रेप पेपर, वर्तमान पत्र, वॉटर कलर इत्यादी साहित्य वापरून तयार करण्यात आले आहे. मी मागील १५ वर्षापासून गणेश उत्सव साजरा करत असून पहिल्या पासूनच मी शाडू मातीची मूर्ती बसवतो.मागील ४ ते ५ वर्षापासून मी इको फ्रेंडली देखावा तयार करतो, असे अनिकेत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -