घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: बाप्पाच्या सजावटीमधून कोरोना योध्यांना सलाम!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: बाप्पाच्या सजावटीमधून कोरोना योध्यांना सलाम!

Subscribe

गोरेगाव येथील गोकुळधाममध्ये राहणाऱ्या उमेश पोतनीस यांच्या घरी वंशपरंपरागत दीड दिवसाचा गणपती बसतो. पण पोतनीस कुटुंबाचा या उत्सवाबाबत एक हट्ट असतो तो म्हणजे हा उत्सव पर्यावरण पुरक साजरा झाला पाहिजे. त्यामुळे ते गेले अनेक वर्ष शाडूच्या मुर्तीचीच स्थापना करतात. केवळ इतकच नाही तर गेली १५ वर्ष गणपती भोवतालची आरासही पर्यावरणपूरक असेल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. दरवर्षी ते आपल्या सजावटीमधून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देतात.

- Advertisement -

मात्र यंदा गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आहे. पण तरीही पोतनीस कुटुंबियांनी आपल्या परंपरेला तडा न जाऊ देता १ फूटी गणपतीची शाडूच्या मुर्तीचीच स्थापना केली. मात्र सजावटीमध्ये पर्यावरण रक्षणाबरोबरच या सजावटीमार्फत समाजामध्ये त्या संदर्भात जागरूकता, सजगता आणि कोरोना योध्दयांप्रती सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

सजावटीसाठी वापरेलेलं साहित्य

संपूर्ण सजावट रद्दी वर्तमान पत्र व रंगीत कागदांपासून साकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -